सहकार सुधारणांसाठी कॉर्पोरेट कंपन्यांकडून प्रशिक्षण ः सहकारमंत्री देशमुख

सहकार सुधारणांसाठी कॉर्पोरेट कंपन्यांकडून प्रशिक्षण
सहकार सुधारणांसाठी कॉर्पोरेट कंपन्यांकडून प्रशिक्षण

नाशिक : ‘‘शेतमालावर प्रक्रिया व्हावी, यातून शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी सहकार विभाग प्रयत्न करणार आहे. उत्पादन शक्य आहे मात्र विक्रीव्यवस्था निर्माण करण्यासाठी व पुन्हा नवे दिवस आणण्यासाठी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुन्हा सुरू करणार असून सहकाराला लागलेली कीड प्रशिक्षणाच्या माध्यमातून घालविण्यासाठी आगामी काळात कॉर्पोरेट कंपन्यांना बरोबर घेऊन प्रशिक्षण देण्यात येईल, असे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले.

शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागांतर्गत नाशिक येथे आयोजित सहकार पुरस्कार वितरण समारंभात मंगळवारी (ता. १०) ते बोलत होते. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. नंतर सहकार गौरव या पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सतीश सोनी यांनी केले. यावेळी खासदार डॉ. भारती पवार, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, सहकार आयुक्त सतीश सोनी, पणन संचालक डॉ. किशोर तोष्णीवाल, राज्य बँकेच्या प्रशासक मंडळाचे सदस्य अविनाश महागावकर, विभागीय सहनिबंधक व्ही. पी. पाटील, विभागीय सहनिबंधक लेखापरीक्षण आर. सी. शहा, जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने, जिल्हा विशेष लेखापरीक्षक डी. एन. काळे यांसह सहकार, पणन विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे, जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी पाठ फिरवली. तर शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनी येणे टाळले. फक्त खासदार डॉ. भारती पवार पूर्णवेळ उपस्थित होत्या. 

मदतीच्या आवाहनाला प्रतिसाद सांगली, कोल्हापूर येथे पूरस्थिती निर्माण झाल्याने मदतीचे आवाहन मदत व पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख यांनी केले होते. त्याला आवाहनाला प्रतिसाद देत अनेक सहकारी संस्था व बँकांनी भरभरून मदत करत धनादेश सुपूर्द केले. सर्वोच्च असलेला १ लाख रुपयांचा सहकार महर्षी पुरस्कार ज्ञानदिप को. ऑप. क्रेडीट सोसायटी लि. विक्रोळी, (पू.) मुंबई यांना देण्यात आला. या संस्थेने यावेळी १ कोटी रुपयांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com