Agriculture news in Marathi, Training from corporate companies for cooperative improvement | Page 2 ||| Agrowon

सहकार सुधारणांसाठी कॉर्पोरेट कंपन्यांकडून प्रशिक्षण ः सहकारमंत्री देशमुख
टीम अॅग्रोवन
बुधवार, 11 सप्टेंबर 2019

नाशिक : ‘‘शेतमालावर प्रक्रिया व्हावी, यातून शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी सहकार विभाग प्रयत्न करणार आहे. उत्पादन शक्य आहे मात्र विक्रीव्यवस्था निर्माण करण्यासाठी व पुन्हा नवे दिवस आणण्यासाठी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुन्हा सुरू करणार असून सहकाराला लागलेली कीड प्रशिक्षणाच्या माध्यमातून घालविण्यासाठी आगामी काळात कॉर्पोरेट कंपन्यांना बरोबर घेऊन प्रशिक्षण देण्यात येईल, असे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले.

नाशिक : ‘‘शेतमालावर प्रक्रिया व्हावी, यातून शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी सहकार विभाग प्रयत्न करणार आहे. उत्पादन शक्य आहे मात्र विक्रीव्यवस्था निर्माण करण्यासाठी व पुन्हा नवे दिवस आणण्यासाठी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुन्हा सुरू करणार असून सहकाराला लागलेली कीड प्रशिक्षणाच्या माध्यमातून घालविण्यासाठी आगामी काळात कॉर्पोरेट कंपन्यांना बरोबर घेऊन प्रशिक्षण देण्यात येईल, असे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले.

शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागांतर्गत नाशिक येथे आयोजित सहकार पुरस्कार वितरण समारंभात मंगळवारी (ता. १०) ते बोलत होते. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. नंतर सहकार गौरव या पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सतीश सोनी यांनी केले. यावेळी खासदार डॉ. भारती पवार, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, सहकार आयुक्त सतीश सोनी, पणन संचालक डॉ. किशोर तोष्णीवाल, राज्य बँकेच्या प्रशासक मंडळाचे सदस्य अविनाश महागावकर, विभागीय सहनिबंधक व्ही. पी. पाटील, विभागीय सहनिबंधक लेखापरीक्षण आर. सी. शहा, जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने, जिल्हा विशेष लेखापरीक्षक डी. एन. काळे यांसह सहकार, पणन विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे, जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी पाठ फिरवली. तर शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनी येणे टाळले. फक्त खासदार डॉ. भारती पवार पूर्णवेळ उपस्थित होत्या. 

मदतीच्या आवाहनाला प्रतिसाद
सांगली, कोल्हापूर येथे पूरस्थिती निर्माण झाल्याने मदतीचे आवाहन मदत व पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख यांनी केले होते. त्याला आवाहनाला प्रतिसाद देत अनेक सहकारी संस्था व बँकांनी भरभरून मदत करत धनादेश सुपूर्द केले. सर्वोच्च असलेला १ लाख रुपयांचा सहकार महर्षी पुरस्कार ज्ञानदिप को. ऑप. क्रेडीट सोसायटी लि. विक्रोळी, (पू.) मुंबई यांना देण्यात आला. या संस्थेने यावेळी १ कोटी रुपयांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिली.

इतर अॅग्रो विशेष
संत्र्याच्या आंबिया बहराला गळती; भाव...अकोला : संत्र्याच्या आंबिया बहाराला गळती...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यतापुणे ः परतीचा मॉन्सून देशातून परतल्यानंतर...
दुधाचे थकीत अनुदान देण्याच्या हालचालीपुणे: राज्यातील डेअरी उद्योगांचे अडकलेले...
अमरावती विभागात सोयाबीन उत्पादकता घटलीअमरावती  ः गेल्या काही वर्षांत कापसाला...
‘महाॲग्री ते महाॲग्रीटेक’ एक स्वप्नरंजन राज्यात शेतकऱ्यांची सर्व कामे ऑनलाईन होतील असे एक...
शेततळ्यातील पाण्यावर फुलले शेडनेटमधील...पावसाचे कायम दुर्भिक्ष, त्यामुळे शेती अर्थकारणाला...
राज्यात गाजर ११०० ते ८००० रुपये...जळगावात ११०० ते १८०० रुपये दर जळगाव कृषी...
ऋतुचक्र बदलया वर्षीचा मॉन्सून अनेक बाबींनी वैशिष्ट्यपूर्ण...
प्रतिष्ठेचं वलय होतंय द्राक्ष...द्राक्ष शेतीने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय...
उडीद, मूग, सोयाबीन ऑनलाइन नोंदणीला...औरंगाबाद: हमीदराने उडीद, मूग, सोयाबीन...
सांगली जिल्ह्यात डाळिंबावर रसशोषक...सांगली : मृग हंगाम धरलेल्या बहाराच्या डाळिंबाच्या...
कडधान्य आयातीला मुदतवाढीचा प्रस्तावनवी दिल्लीः देशात यंदा खरिप काडधान्य पिकांची...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाजपुणे: वाढलेल्या उन्हामुळे राज्यात चटका वाढला आहे...
परतीचा मॉन्सून आठ दिवसात माघारीपुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
आदर्श वनसंवर्धनातून ग्रामविकास साधलेले...वनसंपत्तीचे संवर्धन, वनविकासासह शेतीतही दिशादर्शक...
येतो मी... मॉन्सूनने घेतला देशाचा निरोप...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बुधवारी...
शेतकऱ्यांच्याच कपाळावर पुन्हा ‘मिऱ्या’दिनांक ३ जुलै २०१९ रोजी केरळचे खासदार डीन...
आश्वासनांचा पाऊसराज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम...
आबासाहेब झाले ग्लॅडिओलस पिकातील मास्टरअभ्यासू, तंत्रशुद्ध व प्रयोगशील शेतीचे उत्तम...
दूध पावडर निर्यात अनुदान नाकारल्याने...पुणे : निर्यात केलेल्या दूध पावडरला प्रोत्साहन...