पिंपळगाव बसवंत बाजार समितीत होणार द्राक्षाचे व्यवहार

पिंपळगाव बसवंत बाजार समितीत होणार द्राक्षाचे व्यवहार

नाशिक: बाजार समितीचे कार्यक्षेत्र निफाड तालुक्यातील ६९ गावाचे असून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. देशातील अनेक व्यापारी या ठिकाणी येऊन द्राक्ष बागेतच खरेदीचे व्यवहार करतात. मात्र, व्यवहार व खरेदीत पारदर्शकता कमी असते. यावर पुढचे पाऊल म्हणून पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये द्राक्षाचे व्यवहार सुरू करण्याबाबत बाजार समितीचे सभापती दिलीप बनकर यांच्या उपस्थितीत नुकतीच बैठक पार पडली. द्राक्ष खरेदी-विक्रीचे व्यवहार कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत करण्यासाठी संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. टोमॅटो, कांदा, भाजीपाला व इतर भुसार मालाप्रमाणे आडत्यांमार्फत बाजार समितीचा परवाना घेऊन व्यापारी द्राक्ष खरेदी करतील. शेतकऱ्यांचे पैसे हे आडत्यामार्फत तत्काळ दिले जातील. बाजार समिती ज्याप्रमाणे टोमॅटो, कांदा या शेतीमालाचे पैसे २४ तासांच्या आत देण्याची व्यवस्था करते. त्याचप्रमाणे द्राक्ष उत्पादकांना तत्काळ पैसे दिले जातील, अशी व्यवस्था पिंपळगाव बसवंत बाजार समिती करेल, असे बैठकीत सांगण्यात आले.  गेल्या अनेक वर्षांपासून अनेक शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये बुडाल्याच्या तक्रारी पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाल्या आहेत. पोलिस विभाग या व्यापाऱ्यांना शोधून आणतात. काही व्यापारी सापडत नाहीत. पोलिसांनी अटक केलेले व्यापारी जामीन घेऊन पुन्हा दुसरीकडे व्यापार करण्यास करतात. पण, शेतकऱ्यांचे पैसे काही मिळत नाहीत. यावर उपाय म्हणून हा निर्णय शेयकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे. चालू वर्षीच्या हंगामापासून बाजार समिती द्राक्षाचे व्यवहार प्रायोगिक तत्त्वावर सुरू करीत आहे. ज्या शेतकऱ्यांना परवानाधारक व्यापाऱ्यांकडून आपल्या द्राक्षाचे व्यवहार करावयाचे आहे, त्यांनी फक्त व्यापाऱ्यांचा परवाना व बाजार समितीची पावती घेऊन आपल्या पूर्वीच्या पद्धतीने म्हणजे व्यापारी आपल्या द्राक्ष बागेत येऊन व्यवहार करतील, तिथेच पॅकिंग करून पाठवतील. त्यामुळे द्राक्ष विक्रीमध्ये पारदर्शकता येईलच शिवाय शेतकऱ्यांची होणारी शिवार खरेदीतील फसवणूकही थांबेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com