agriculture news in Marathi, transaction of grapes will be in Pimpalgaon Baswant APMC, Maharashtra | Page 2 ||| Agrowon

पिंपळगाव बसवंत बाजार समितीत होणार द्राक्षाचे व्यवहार

टीम अॅग्रोवन
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

नाशिक: बाजार समितीचे कार्यक्षेत्र निफाड तालुक्यातील ६९ गावाचे असून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. देशातील अनेक व्यापारी या ठिकाणी येऊन द्राक्ष बागेतच खरेदीचे व्यवहार करतात. मात्र, व्यवहार व खरेदीत पारदर्शकता कमी असते. यावर पुढचे पाऊल म्हणून पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये द्राक्षाचे व्यवहार सुरू करण्याबाबत बाजार समितीचे सभापती दिलीप बनकर यांच्या उपस्थितीत नुकतीच बैठक पार पडली.

नाशिक: बाजार समितीचे कार्यक्षेत्र निफाड तालुक्यातील ६९ गावाचे असून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. देशातील अनेक व्यापारी या ठिकाणी येऊन द्राक्ष बागेतच खरेदीचे व्यवहार करतात. मात्र, व्यवहार व खरेदीत पारदर्शकता कमी असते. यावर पुढचे पाऊल म्हणून पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये द्राक्षाचे व्यवहार सुरू करण्याबाबत बाजार समितीचे सभापती दिलीप बनकर यांच्या उपस्थितीत नुकतीच बैठक पार पडली.

द्राक्ष खरेदी-विक्रीचे व्यवहार कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत करण्यासाठी संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. टोमॅटो, कांदा, भाजीपाला व इतर भुसार मालाप्रमाणे आडत्यांमार्फत बाजार समितीचा परवाना घेऊन व्यापारी द्राक्ष खरेदी करतील. शेतकऱ्यांचे पैसे हे आडत्यामार्फत तत्काळ दिले जातील. बाजार समिती ज्याप्रमाणे टोमॅटो, कांदा या शेतीमालाचे पैसे २४ तासांच्या आत देण्याची व्यवस्था करते. त्याचप्रमाणे द्राक्ष उत्पादकांना तत्काळ पैसे दिले जातील, अशी व्यवस्था पिंपळगाव बसवंत बाजार समिती करेल, असे बैठकीत सांगण्यात आले. 

गेल्या अनेक वर्षांपासून अनेक शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये बुडाल्याच्या तक्रारी पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाल्या आहेत. पोलिस विभाग या व्यापाऱ्यांना शोधून आणतात. काही व्यापारी सापडत नाहीत. पोलिसांनी अटक केलेले व्यापारी जामीन घेऊन पुन्हा दुसरीकडे व्यापार करण्यास करतात. पण, शेतकऱ्यांचे पैसे काही मिळत नाहीत. यावर उपाय म्हणून हा निर्णय शेयकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे.

चालू वर्षीच्या हंगामापासून बाजार समिती द्राक्षाचे व्यवहार प्रायोगिक तत्त्वावर सुरू करीत आहे. ज्या शेतकऱ्यांना परवानाधारक व्यापाऱ्यांकडून आपल्या द्राक्षाचे व्यवहार करावयाचे आहे, त्यांनी फक्त व्यापाऱ्यांचा परवाना व बाजार समितीची पावती घेऊन आपल्या पूर्वीच्या पद्धतीने म्हणजे व्यापारी आपल्या द्राक्ष बागेत येऊन व्यवहार करतील, तिथेच पॅकिंग करून पाठवतील. त्यामुळे द्राक्ष विक्रीमध्ये पारदर्शकता येईलच शिवाय शेतकऱ्यांची होणारी शिवार खरेदीतील फसवणूकही थांबेल.


इतर अॅग्रो विशेष
सांगलीत तूर खरेदी ठप्पसांगली ः जिल्ह्यात हेक्टरी २५७ किलोच तूर खरेदी...
राज्यात गारठा वाढलापुणे  : उत्तरेकडून थंड वाऱ्यांचे प्रवाह...
चीनला द्राक्ष निर्यात सुरूसांगली ः जिल्ह्यात गेल्या वर्षी झालेल्या...
‘लिंकिंग’बाबत कंपन्यांना नोटिसापुणे  : रासायनिक खतांच्या बाजारपेठेत होत...
बाजार समित्यांच्या निवडणुका होणार...मुंबई  ः राज्यातील कृषी उत्पन्न बाजार...
भाजीपाला शेतीतून पेलल्या साऱ्या...लग्नानंतर अवघ्या तीन वर्षातच पतीच्या निधनामुळे...
कांद्यावरील निर्यातबंदी हटविली;...नवी दिल्ली : चार महिन्यापूर्वी कांद्यावर...
सूक्ष्म सिंचन योजनेचा सात वर्षानंतर...अकोला ः सूक्ष्म सिंचनाचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना...
कोल्हापुरातील गूळ हंगाम अंतिम टप्प्यातकोल्हापूर : यंदाचा गूळ हंगाम अंतिम टप्प्यात येत...
पाणीवापराचे तंत्र समजून निर्यातक्षम...सिंचन व्यवस्थापन हा प्रयोगशील व प्रगतिशील शेतीतील...
सकाळी गारठा, तर दुपारी चटकापुणे : राज्यात कमाल तापमानातील वाढीबरोबरच किमान...
थेट सरपंच निवड रद्दमुंबई: थेट सरपंच निवड रद्द करणारे विधेयक मंगळवारी...
निर्यात न करणाऱ्या कारखान्यांच्या साखर...कोल्हापूर : देशातील ज्या साखर कारखान्यांनी...
कर्जमाफीची पहिली यादी जाहीर; ६८...मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री...
राज्यात उन्हाचा चटका कायम पुणे : राज्याच्या हवामानात वेगाने बदल होत आहेत....
‘पीएम-किसान’ योजनेत शेतकऱ्यांना ५१ हजार...नवी दिल्ली: केंद्र सरकारने गेल्या वर्षी पंतप्रधान...
शेतकरी कर्जमाफीवरून विरोधकांचा गदारोळ मुंबई: शेतकरी कर्जमाफीबाबत सरकारने एकही आश्वासन...
खारपाणपट्ट्यात पिकले गोड अॅपेल बोरअंधेरा कितना भी घना क्यू ना हो, दिया जलाना कहाँ...
कृषी शिक्षणाचा खर्चही आता लाखाबाहेर पुणे : राज्यातील खासगी कृषी शिक्षण संस्थांच्या...
निवृत्त जवानाचा अनुकरणीय शेळी-...सुर्डी (जि. सोलापूर) येथी हिरोजीराव शेळके यांना...