अकोल्यात बाजार समित्या बंदमुळे व्यवहारही ठप्प

सध्या वऱ्हाडातील तीनही जिल्ह्यांत कडक लॉकडाउन लावण्यात आलेला असल्याने बाजार समित्या बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. बाजार समित्या बंद असल्याने शेतकऱ्यांची मोठी कोंडी झाली आहे.
Akola due to closure of market committees
Akola due to closure of market committees

अकोला : सध्या वऱ्हाडातील तीनही जिल्ह्यांत कडक लॉकडाउन लावण्यात आलेला असल्याने बाजार समित्या बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. बाजार समित्या बंद असल्याने शेतकऱ्यांची मोठी कोंडी झाली आहे. आगामी हंगामासाठी पैशांची जुळवाजुळव करताना नाकीनऊ येत आहेत. सध्याचा लॉकडाउन कुठे १५ तर कुठे २० मेपर्यंत लावण्यात आलेला आहे.

कोरोनाचा संसर्ग वाढल्याने खळबळून जागे झालेल्या प्रशासनाने तडकपणे लॉकडाउनची घोषणा केली. अकोला, वाशीम जिल्ह्यात ९ ते १५ मे, असा या लॉकडाउनचा कालावधी आहे. तर बुलडाण्यात १० ते २० मे काळात लॉकडाउन पाळला जात आहे. या आदेशात पहिल्यांदाच बाजार समित्या, कृषी आधारित विक्री केंद्रांवरही निर्बंध लादले आहेत. याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. उन्हाळी भुईमूग, उन्हाळी सोयाबीन काढणी करून तयार आहे. परंतु शेतकऱ्यांना हा शेतीमाल विक्रीची व्यवस्थाच सध्या उपलब्ध नाही.

या भागात अकोला, अकोट, मूर्तिजापूर, खामगाव, वाशीम, मेहकर, देऊळगावराजा, मलकापूर या प्रमुख व मोठ्या बाजार समित्या आहेत. यापैकी काही बाजार समित्यांमधील दरावर इतर ठिकाणचे दर काढले जातात. खेडोपाडी व्यापारी खरेदी करतात. सध्या याच बाजारांमधील व्यवहार ठप्प पडलेले असल्याने गाव-खेड्यातील व्यापारी अत्यंत कमी दराने शेतमालाची मागणी करीत आहेत. पैशांची गरज असलेले शेतकरी मिळेल त्या दराने शेतमाल देत आहेत. वास्तविक लॉकडाउन लागण्यापूर्वी बाजारात सोयाबीन, हरभरा, तुरीचे दर चांगले स्थिरावलेले होते. आता बाजारांचा पर्याय नसल्याने आर्थिक अडचण निर्माण झाली आहे.

भाजीपाला फेकून देण्याची वेळ एकीकडे बाजार समित्या बंदमुळे धान्य विक्रीची अडचण निर्माण झालेली असताना दुसरीकडे भाजीपाला, टरबूज विक्रीही बंद ठेवण्यात आल्याने प्रचंड दर घसरले. भाजीपाला फेकून देण्याची दुर्दैवी वेळ आली. टरबूजाचे सौदे व्यापारी सोडून देत आहेत. साधारण १५ दिवसांपूर्वी ८०० ते १००० रुपयांपर्यंत मिळणारा टरबुजाचा दर आता ४००च्या आत आलेला आहे.

कांद्याचे व्यवहार ठप्प अकोल्यात स्थानिकसह नाशिक, नगर भागांतून कांद्याची मोठी आवक होत असते. उन्हाळी कांद्याचा हंगाम सुरू झालेला असतानाच आता लॉकडाउनमुळे गेल्या पाच दिवसांपासून कांद्याचे सौदे झालेले नाहीत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com