मर्जीनेच स्थलांतरित केले कृषी कार्यालय

तालुका कृषी अधिकारी यांच्या सुचनेवरुनच तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील मंडळ अधिकाऱ्याचे कार्यालय स्थलांतरीत करण्यात आले आहे. आष्टी येथे जागा नसल्याने कृषी विभागाच्या मालकीच्या तळेगाव रोपवाटीकेतील परिसरात हे कार्यालय तात्पुरते नेण्यात आले. शेतकऱ्यांची मागणी असल्यास परत ते आष्टीला हलविले जाईल. - श्री. सांगळे, उपविभागीय कृषी अधिकारी, आर्वी
मर्जीनेच स्थलांतरित केले कृषी कार्यालय
मर्जीनेच स्थलांतरित केले कृषी कार्यालय

वर्धा ः कोणताही शासकीय आदेश नसताना स्वमर्जीनेच आष्टी (शहीद) येथे सुरू असलेले मंडळ कृषी अधिकारी कार्यालय हलविण्यात आले. शेतकऱ्यांनी याचा तीव्र विरोध करीत हे कार्यालय पूर्वीप्रमाणे आष्टीमध्ये सुरू न झाल्यास कुलूपबंद करण्याचा इशारा दिला आहे.  मंडळ कृषी अधिकारी कार्यालय वर्षभरापूर्वी आष्टी येथे सुरू करण्यात आले. सदरचे कार्यालय वरिष्ठ तसेच प्रशासकीयस्तरावर कोणाचीच परवानगी न घेता स्थलांतरित करण्यात आले. मंडळ कृषी अधिकारी जे. व्ही. घरत यांनी स्वतःच्या मर्जीनेच कार्यालय तळेगाव येथे स्थलांतरित केल्याचा आरोप आहे. तालुका व उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या लक्षात हा प्रकार येताच त्यांनी मंडळ कृषी अधिकारी घरत यांना यासंदर्भाने जाब विचारला.  आष्टी तालुक्‍यातील शेतकऱ्यांपर्यंत हे गंभीर प्रकरण पोचल्यानंतर त्यांनी तालुका कृषी अधिकारी एम. जे. तोडकर यांना लेखी निवेदन दिले. मंडळ कृषी अधिकारी कार्यालय आष्टीला सुरू न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यातून देण्यात आला आहे.  मंडळ कृषी अधिकारी कार्यालय कुलूपबंद करण्याच्या इशाऱ्याचा देखील शेतकऱ्यांनी दिला. निरज भार्गव, साकीब खान, अंकुश पोकळे, दीपक डाखोळे, मुकेश चाफले, रवी सोनोने, वकार  अहमद, अभिजीत जयस्वाल, लोकेश सव्वालाखे या शेतकऱ्यांनी याविषयी निवेदन दिले. याप्रकरणी वरिष्ठ  स्तरावरून घरत यांच्याविरोधात काय कारवाई होते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष्य लागले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com