कृषी अधीक्षक, उपसंचालकांच्या बदल्या

कोविड १९ रोगाच्या पार्श्वभूमीवर कार्यरत पदांच्या केवळ १५ टक्के बदल्या करण्याची भूमिका कृषी विभागाने ठेवत काही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी (एसएओ) व उपसंचालकांच्या बदल्या केल्या आहेत.
कृषी अधीक्षक, उपसंचालकांच्या बदल्या
कृषी अधीक्षक, उपसंचालकांच्या बदल्या

पुणे : कोविड १९ रोगाच्या पार्श्वभूमीवर कार्यरत पदांच्या केवळ १५ टक्के बदल्या करण्याची भूमिका कृषी विभागाने ठेवत काही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी (एसएओ) व उपसंचालकांच्या बदल्या केल्या आहेत. त्यात गुणनियंत्रण विभागातील दोघा उपसंचालकांचा समावेश आहे. पुणे ‘रामेती’च्या प्राचार्या मेघना केळकर यांची पोकरामध्ये तर पुणे महसूल आयुक्तालयातील ‘रोहयोचे एसएओ विनयकुमार आवटे यांची कृषी उपायुक्तपदी (कृषीगणना) बदली झाली आहे. यशदामधील उज्वला बाणखेले यांना रायगडचे ‘एसएओ’पद तर ‘वसुंधरा’मधील ज्ञानेश्वर बोटे यांना पुण्याचे ‘एसएओ’पद मिळाले आहे. अमरावती ‘रामेती’चे प्राचार्य उदय नलावडे यांना अकोल्याचे ‘एसएओ’पद तर सोलापूरचे ‘एसएओ’ बसवराज बिराजदार ‘एनएचएम’मध्ये प्रकल्प व्यवस्थापकपद देण्यात आले. गडचिरोलीचे ‘एसएओ’ अनंत पोटे यांची नंदूरबारला त्याच पदावर बदली झाली. पोटेंच्या जागी ‘पोकरा’तील भाऊसाहेब बऱ्हाटे यांची नियुक्ती झाली आहे. राजगुरूनगरच्या ‘एसडीएओ’ संगीता माने आता कृषी आयुक्तालयात उपसंचालिका झाल्या आहेत. मानेंच्या आधीच्या जागेवर आता ठाण्याचे कृषी विकास अधिकारी (एडीओ) मनोजकुमार ढगे यांची नियुक्ती झाली आहे. अहेरीचे ‘एसडीएओ’ सुरेश जगताप आता पुणे बीज परीक्षण प्रयोगशाळेचे काम बघतील. याच प्रयोगशाळेतील आधीच्या रोहिणी भोसले आता माणगावच्या ‘एसडीएओ’ झाल्या आहेत. फलटणचे ‘एसडीएओ’ प्रकाश सूर्यवंशी आता चिपळूणला याच पदावर गेले आहेत. चिपळूणचे ‘एसडीएओ’ दौलत चव्हाण आता याच पदावर कराडला गेले आहेत. गोंदियाचे ‘एडीओ’ मनोहर मुंढे यांची आयुक्तालयात पाणलोट उपसंचालकपदी बदली झाली आहे. गडचिरोली ‘एसएओ’ कार्यालयातील उपसंचालक धनश्री जाधव यांना आयुक्तालयात फलोत्पादन उपसंचालकपद देण्यात आले आहे. चंद्रपूरचे ‘एडीओ’ शंकर किरवे यांना नगर जिल्हा परिषदेत याच पदावर नियुक्त करण्यात आले आहे. तर, नगरचे ‘एडीओ’ सुनील राठी यांना थेट भंडाऱ्यात साकोलीमध्ये ‘एसडीएओ’ म्हणून पाठविण्यात आले आहे. पंढरपूरचे ‘एसडीएओ’ रवींद्र कांबळे यांची त्याच पदावर कुर्डूवाडी येथे बदली झाली आहे. वाडा येथील ‘एसडीएओ’ प्रवीण गवांदे आता त्याच पदावर कर्जतला गेले आहेत. कर्जतचे आधीचे ‘एसडीएओ’ राजाराम गायकवाड नगरमध्ये आत्माचे प्रकल्प उपसंचालक बनले आहेत.

अजय कुलकर्णी गुणनियंत्रण उपसंचालक कृषी आयुक्तालयातील गुणनियंत्रण उपसंचालक चंद्रकांत गोरड यांची बदली वाईचे उपविभागीय कृषी अधिकारिपदी (एसडीएओ) झाली आहे. अकोला येथील ‘एसडीएओ’ अजय कुलकर्णी यांची नियुक्ती आता गुणनियंत्रण उपसंचालकपदी झाली आहे. आयुक्तालयातील खते विभागाच्या उपसंचालिका अश्विनी भोपळे यांचीही बदली झाली. त्यांना माहिती उपसंचालकपद देण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com