कृषी विभागात बदल्यांची धूम

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  : राज्यात ऐन खरिपाच्या नियोजनात कृषी अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या करण्यात आलेल्या आहेत. विशेष म्हणजे न्यायालयीन वादात बदल्यांची यादी अडकून पडू नये, यासाठी यादी जाहीर न करता यंदा प्रत्येक अधिकाऱ्याचे स्वतंत्र बदली आदेश काढण्याची शक्कल लढविण्यात आली आहे.

महाराष्ट्र कृषी सेवा गट ‘अ’ आणि ‘ब’ संवर्गातील बदल्यांचे शेकडो आदेश काढण्यात आलेले आहेत. “कोणत्या संवर्गाच्या किती बदल्या झाल्या, हे सध्या सांगणे अवघड आहे. कारण नावांची यादी यंदा देण्यात आलेली नाही. अन्यायग्रस्त अधिकारी न्यायालयात गेल्यानंतर संपूर्ण यादीला स्थगिती मिळते. त्यामुळेच प्रत्येकाचे बदली आदेश स्वतंत्रपणे काढण्यात आले,” अशी माहिती सूत्रांनी दिली. “राज्यातील एसएओंच्या बदल्यांचा घोळ अद्यापही मिटलेला नाही. तसेच, विनंती बदल्यादेखील रखडल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या विशेष मान्यतेनंतर उर्वरित बदल्यांचे स्वतंत्र आदेश निघू शकतात,” असेही सूत्रांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, बदल्यांच्या धूमधडाक्यात महाडमधील कृषी उपसंचालक विष्णू साळवे आता कृषी आयुक्तालयाच्या गुणनियंत्रण विभागातील कीटकनाशके कक्षाचे उपसंचालक बनले आहेत. लातूर एसएओ कार्यालयातील उपसंचालक विश्वंभरनाथ सरोदे आता आयुक्तालयाच्या आत्मा विभागातील प्रशिक्षण कक्षाचे उपसंचालक झाले आहेत.

महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पातील कृषी अधिकारी बाळराजे मुळीक आता कृषी आयुक्तांच्या कक्षात काम करणार आहेत. आयुक्तालयातील बदल्या झालेल्या अधिकाऱ्यांची नावे अशीः (कंसात बदलीचे पद व स्थळ देण्यात आलेले आहे.) तंत्र अधिकारी टी. के. चौधरी, मृदसंधारण विभाग, आयुक्तालय (बदलीचे ठिकाण- तालुका कृषी अधिकारी आंबेगाव, पुणे), तंत्र अधिकारी रवींद्र वाडकर, एनएचएम, पुणे (पुणे जिल्हा मृद सर्वेक्षण व मृदा चाचणी अधिकारी), तंत्र अधिकारी संजय फडतरे, येरवडा कारागृह (तंत्र अधिकारी, नियोजन व अंदाजपत्रक विभाग, आयुक्तालय), कृषी अधिकारी वसंत ढेपे, झेडपी, पुणे (तंत्र अधिकारी, एनएचएम,पुणे), मोहीम अधिकारी अशोक पवार, झेडपी, रायगड (तंत्र अधिकारी, महाराष्ट्र राज्य औषधी सुगंधी वनस्पती मंडळ, पुणे), 

फलोत्पादन, विस्तार विभाग; तसेच राष्ट्रीय फलोत्पादन अभियान मुख्यालयातील अधिकाऱ्यांच्या देखील बदल्या झालेल्या आहेत. त्यात समावेश असलेल्या अधिकाऱ्यांची नावे अशीः  तंत्र अधिकारी कांतीलाल पवार, जेडीए, पुणे (बदलीचे ठिकाण- तंत्र अधिकारी, एनएचएम, पुणे), तंत्र अधिकारी बसवराज महाजन, एनएचएम, पुणे (तंत्र अधिकारी, विस्तार प्रशिक्षण, आयुक्तालय), वेल्हा तालुका कृषी अधिकारी विठ्ठल सोनवणे (तंत्र अधिकारी, विस्तार प्रशिक्षण, आयुक्तालय), मालेगाव तालुका कृषी अधिकारी गोकुळ अहिरे (तंत्र अधिकारी, मृदसंधारण विभाग, आयुक्तालय), उपसंचालक पल्लवी देवरे कोंढाळकर (उपसंचालक, फलोत्पादन, आयुक्तालय)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com