राज्य सरकारचे निर्णय जनतेपर्यंत पोचवा ः मुख्यमंत्री ठाकरे

Transfer state government's decision to the people: Chief Minister Thackeray
Transfer state government's decision to the people: Chief Minister Thackeray

मुंबई  : मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे सोमवारी (ता. २३) पहिल्यांदाच शिवसेना भवनात आले. त्यांनी राज्यभरातील जिल्हाप्रमुख आणि शिवसेना नेत्यांची बैठक घेतली. पक्षवाढीकडे लक्ष देताना राज्य सरकार म्हणून शेतकरी आणि जनतेच्या प्रश्‍नांवर घेतलेले निर्णय जनतेपर्यंत पोचवा, असे आदेश त्यांनी शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांना दिले.

निवडणुकीची तुम्ही चिंता करू नका; आपली महाविकास आघाडी सक्षम आहे, असा विश्‍वास मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुखांना दिला. महाराष्ट्रानंतर आता झारखंड हे राज्यही भाजपकडून निसटले आहे. झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस बहुमताच्या मार्गावर आहेत. त्या राज्यातील भाजपची सत्ता टिकवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी मोठी ताकद लावली होती. सीएए या नवीन कायद्याचा निवडणुकीत फायदा होईल, अशा प्रकारची भाषणे झाली होती; मात्र भाजपला झारखंडमध्ये बहुमत सिद्ध करता आले नाही, असे ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पहिल्यांदाच शिवसेना भवनात आल्यामुळे कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात आणि आरती ओवाळून श्री. ठाकरे यांचे उत्साहात स्वागत केले. या वेळी ठाकरे यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख आणि नेत्यांची बैठक घेतली. 

मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी घेतलेले निर्णय शिवसेना जिल्हाप्रमुखांना सांगण्यात आले. शेतकरी कर्जमाफी आणि जनतेचे अडलेले प्रश्‍न सोडवण्यासाठी पहिल्यांदाच जिल्हा पातळीवर मुख्यमंत्री कार्यालय सुरू करण्यात येणार असल्याची माहितीही देण्यात आली. शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी कामाला लागा, असा आदेश त्यांनी दिला.

महाविकास आघाडीतर्फेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका लढवण्यात येतील. महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका आघाडीतील तिन्ही पक्षांतील नेत्यांच्या आदेशानेच लढवण्याचे निश्‍चित झाले आहे, असेही बैठकीत सांगण्यात आल्याचे कळते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com