Agriculture news in Marathi On transfer of transfers in agriculture department | Agrowon

कृषी खात्यातील बदल्या लांबणीवर

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 13 मे 2021

ऐन कोरोना कालावधीत बदल्यांचा घाट रचलेल्या कृषी खात्यातील अधिकाऱ्यांना एक महिना काहीच हालचाल करता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

पुणे ः ऐन कोरोना कालावधीत बदल्यांचा घाट रचलेल्या कृषी खात्यातील अधिकाऱ्यांना एक महिना काहीच हालचाल करता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. शासनाने कृषीसह सर्वच खात्यातील बदल्यांना राज्य शासनाच्या एका आदेशामुळे स्थगिती मिळाली आहे.

मंत्रालयातून सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिव गीता कुलकर्णी यांनी सोमवारी (ता. १०) जारी केलेल्या एका आदेशानुसार, कोणत्याही पदावरील बदल्या करण्यास तूर्त मनाई करण्यात आली आहे. ‘‘राज्यात कोविड १९ च्या संसर्गजन्य रोगाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेता ३० जूनपर्यंत बदलीच्या अधिनियमानुसार कोणत्याही बदल्या करू नका. सर्वसाधारण बदल्या, अपवादात्मक परिस्थितीमुळे किंवा विशेष कारणास्तव करावयाच्या बदल्या करू नये,’’ असे शासनाने स्पष्ट केले आहे.

कोरोना संसर्गामुळे कृषी खात्यात आतापर्यंत ६० कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. ५०० पेक्षा जास्त कर्मचारी बाधित आहेत. त्यामुळे कर्मचारी जीव मुठीत धरून कामे करीत असताना दुसऱ्या बाजूला बदल्यांच्या जोरदार हालचाली काही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सुरू होत्या. बदल्यांमध्ये आर्थिक घडामोडी होत असल्याने काही घटकांसाठी बदल्यांचे पर्व सुगीचे वाटते. मात्र कोरोना स्थिती विचारात घेता प्रशासकीय बदल्या लांबणीवर टाकण्याची जोरदार मागणी सर्व संघटनांकडून वारंवार केली जात होती, अशी माहिती सूत्रांनी दिली.

रिक्त पदे भरता येतील
बदल्यांबाबत काही कारणांसाठी मात्र शासनाने सूट दिली आहे. निवृत्तीमुळे रिक्त होणारी पदे भरता येणार आहेत. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अत्यावश्यक सेवेतील रिक्त पदे देखील भरता येतील. याशिवाय कोणत्याही कर्मचाऱ्याच्या विरोधात गंभीर स्वरूपाची तक्रार असल्यास सक्षम प्राधिकाऱ्याची खात्री पटल्यास अशा कर्मचाऱ्याची बदली करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.


इतर ताज्या घडामोडी
सातव्या वेतन आयोगासाठी महामंडळांमधील...नगर : राज्यातील विविध महामंडळांमधील अधिकारी-...
रत्नागिरी, संगमेश्‍वर, राजापूरला ...रत्नागिरी : सलग दुसऱ्या दिवशी रत्नागिरी...
चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्यांना...वडाळी जि. अकोला : या हंगामाला सुरुवात होताच...
पशुचिकित्सा व्यावसायिक संघटना करणार...नागपूर : पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेच्या...
जागोजागी होणारी लुट थांबवा, ...नगर : ‘‘राज्यात जागोजागी प्रत्येक क्षेत्रात...
‘घटनादुरुस्ती करून आरक्षण देणे  हाच...कोल्हापूर : घटनादुरुस्ती करून मराठा आरक्षण देणे...
कोकणातील डच, पोर्तुगाल वखारींचे होणार...पुणे : भारतातील आंतरराष्ट्रीय सागरी व्यापारासाठी...
गोसीखुर्द प्रकल्प पूरनियंत्रणासाठी ...मुंबई ः गोसीखुर्द प्रकल्प पूरनियंत्रणाबाबत...
प्रकल्पग्रस्तांच्या जमिनींना पाच पट...नाशिक : देशातील पहिला सेमी हायस्पीड रेल्वेमार्ग...
आरक्षण देण्याची राज्यकर्त्यांची इच्छाच...पुणे : मराठा समाजाला आरक्षण देण्याची राजकीय...
नांदेडमध्ये थकीत ‘एफआरपी’साठी धरणेनांदेड : ऊस गाळप होऊनही पैसे न दिल्याने...
सांगली जिल्ह्यात खरिपाची दहा टक्के...सांगली : जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पेरणीस प्रारंभ...
आर्थिक दुर्बल घटकांना बियाणे वाटपाचे...नाशिक : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत विविध...
‘विष्णुपुरी’तून ४७१ क्सुसेकने विसर्गनांदेड : गोदावरी नदीवरील डॉ. शंकरराव चव्हाण...
परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ७४ मंडळांत...परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ७४ मंडळांमध्ये...
टोमॅटोवरील टुटा ॲबसोलुटा किडीची ओळख,...टोमॅटो पिकात टुटा ॲबसोलुटा या किडीचा प्रादुर्भाव...
नागपुरात सोयाबीन दरात तेजीनागपूर : सोयाबीन दरातील तेजी कायम असून कळमना...
सागरी शेवाळ उत्पादनात व्यावसायिक संधीसागरी शेवाळ उत्पादनामुळे व्यावसायिक संधी उपलब्ध...
नगरमध्ये दोडका, वांगी, भेंडीच्या दरात...नगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
सांगलीत वीस लाखांचा खतसाठा जप्तसांगली : विना परवाना खत विक्री प्रकल्पावर कृषी...