दिवेकर, ताटेंसह १४ कृषी उपसंचालकांच्या बदल्या 

राज्याच्या कृषी आयुक्तालयातील ठिबक कक्षाचे प्रमुख दत्तात्रय दिवेकर यांच्यासह उपसंचालक दर्जाच्या १४ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत.
agriculture department
agriculture department

पुणे ः राज्याच्या कृषी आयुक्तालयातील ठिबक कक्षाचे प्रमुख दत्तात्रय दिवेकर यांच्यासह उपसंचालक दर्जाच्या १४ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. 

कृषी विभागाचे सहसचिव सुग्रीव धपाटे यांनी कृषी सेवा गट ‘अ’मधील उपसंचालकांच्या बदल्यांचे आदेश २९ जुलैला जारी केले आहेत. दिवेकर आता सिंधुदुर्ग आत्मा कक्षाचे प्रकल्प उपसंचालक म्हणून काम पाहतील. 

बदली झालेल्या इतर अधिकाऱ्यांची नावे अशी ः (कंसात बदली झालेले पद व स्थळ) उपविभागीय कृषी अधिकारी, बारामती, बालाजी ताटे (उपविभागीय कृषी अधिकारी, खोपोली), उपविभागीय कृषी अधिकारी,पालघर, दिलीप नेरकर (कृषी विकास अधिकारी, ठाणे), बीज परीक्षण अधिकारी, पुणे प्रयोगशाळा, रोहिणी भोसले (उपविभागीय कृषी अधिकारी, माणगाव), उपविभागीय कृषी अधिकारी, श्रीरामपूर, संजय काचोळे (कृषी उपसंचालक, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, कृषी आयुक्तालय), विभागीय बीज प्रमाणीकरण अधिकारी, जालना, शीतल चव्हाण (उपविभागीय कृषी अधिकारी, जालना), उपविभागीय कृषी अधिकारी, यवतमाळ, कैलास वानखेडे (उपविभागीय कृषी अधिकारी, अलिबाग), कृषी आयुक्तालयातील मृद्‌ सर्वेक्षण व मृद्‌ चाचणी विभागाचे उपसंचालक अशोक बाणखेले (उपसंचालक, बीज परीक्षण प्रयोगशाळा, पुणे), कृषी आयुक्तालयातील फलोत्पादन कक्ष ३ चे उपसंचालक माणिक त्र्यंबके (उपविभागीय कृषी अधिकारी, अमरावती), आत्मा प्रकल्प उपसंचालक, कोल्हापूर, जालिंदर पांगरे (उपविभागीय कृषी अधिकारी, करवीर), नगर जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी सुनीलकुमार राठी (आत्मा प्रकल्प उपसंचालक, धुळे), सांगली जिल्हा परिषदेतील कृषी विकास अधिकारी विवेक कुंभार (कृषी विकास अधिकारी, सोलापूर जिल्हा परिषद), नागपूरच्या वनामतीचे उपसंचालक प्रभाकर शिवणकर (कृषी उपसंचालक, नंदूरबार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय), चंद्रपूर जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी शंकर किरवे (कृषी विकास अधिकारी, नगर जिल्हा परिषद) 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com