शिरूर तालुक्‍याच्या पूर्व भागात रोहित्रांच्या पेट्यांची दुरवस्था

शिरूर तालुक्‍याच्या पूर्व भागात रोहित्रांच्या पेट्यांची दुरवस्था
शिरूर तालुक्‍याच्या पूर्व भागात रोहित्रांच्या पेट्यांची दुरवस्था

रांजणगाव सांडस, जि. पुणे  : शिरूर तालुक्‍यातील पूर्व भागातील रांजणगाव सांडस, आलेगाव पागा, उरळगाव, आरणगाव, नागरगाव, वडगाव रासाई, दहिवडी, पारवडी राक्षेवाडी, आंधळगाव, शिवतक्रार म्हाळुंगी आदी गावात व वाड्यावस्त्यांवर रोहित्रांच्या फ्युज पेट्यांची दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी लोकवस्तीत असलेल्या रोहित्रांच्या फ्युज पेट्यांचे जमिनीपासूनचे अंतर कमी असल्याने या पावसाळ्याच्या दिवसांत विजेच्या संपर्काने अपघाताची शक्‍यता नाकारता येत नाही. 

शिरूर तालुक्‍याचा पूर्व भाग पूर्णपणे बागायती आहे. नदीकाठी व गावांमध्ये रोहित्राचे जाळे मोठ्या प्रमाणात आहे. शेतीला व लोक वस्तीला वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणने या ठिकाणी रोहित्राची उभारणी केली आहे. परंतु पेटीत फुटलेले फ्यूज असल्याने स्थानिकांनी थेट तारा जोडून वीजपुरवठा सुरू ठेवला आहे. फ्यूज पेटीला झाकण नसल्याने तारांमधून शॉक बसण्याचा धोका आहे. त्यामुळे पावसाळ्यात रोहित्राच्या जवळ जाणे धोक्‍याचे झाले आहे. रोहित्र रस्त्यालगत, वस्तीजवळ किंवा शेतात आहे.

लहान मुले व शेतात चरणारी जनावरे या फ्यूज बॉक्‍सच्या आसपास फिरत असतात. त्यामुळे अपघाताची शक्‍यता आहे. परिसरात कमी वीज दाबामुळे अनेक विद्युत पंप व विद्युत उपकरणे ना दुरुस्त होण्याचे प्रकार घडले आहे. या परिसरातील रोहित्रा मधून आईल गळती होते. महावितरणे तातडीने लक्ष देऊन दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com