खत विक्रीत येणार पारदर्शकता,  पॉस मिशनच्या जोडीला क्यूआर कोड 

खत खरेदी-विक्रीत कोट्यवधीच्या उलाढालीत पारदर्शकता येण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून पॉस मशिनचा वापर सुरू आहे. त्याच्या जोडीला आता क्यूआर कोड प्रणाली आली आहे.
खत विक्रीत येणार पारदर्शकता,  पॉस मिशनच्या जोडीला क्यूआर कोड  Transparency in fertilizer sales, QR code to pair of POS missions
खत विक्रीत येणार पारदर्शकता,  पॉस मिशनच्या जोडीला क्यूआर कोड  Transparency in fertilizer sales, QR code to pair of POS missions

राजापूर, जि. रत्नागिरी : खत खरेदी-विक्रीत कोट्यवधीच्या उलाढालीत पारदर्शकता येण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून पॉस मशिनचा वापर सुरू आहे. त्याच्या जोडीला आता क्यूआर कोड प्रणाली आली आहे. डिजिटल पेमेंट वा कॅशलेस असलेल्या, या प्रणालीमुळे शेतकऱ्यांना खताचे पैसे थेट विक्रेत्याला अदा करणे सुरळीत होणार आहे. 

खत विक्रीच्या आर्थिक व्यवहारातील काळ्या बाजाराला आळा घालण्यामध्ये क्यूआर कोडप्रणाली महत्त्वपूर्ण ठरणार असली तरी, अनेक ठिकाणी मोबाइल रेंज वा इंटरनेट सुविधेचा अभाव असल्याने या प्रणालीचा अवलंब होण्यामध्ये अडथळे येणार आहेत. तालुक्यामध्ये परवानाधारक २३ खत विक्रेते असून त्यांना क्यूआर कोड काढण्याची सूचना कृषी विभागाने दिली होती. त्याप्रमाणे २३ परवानाधारक खतविक्रेत्यांनी क्यूआर कोड काढल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली. 

पिकाची उत्पादकता वाढावी म्हणून शेतकऱ्यांकडून पिकांना विविध प्रकारच्या खतांची मात्रा दिली जाते. कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात तयार होणाऱ्या हापूस आंब्यांच्या झाडांनाही जादा उत्पादन यावे म्हणून विविध प्रकारच्या खतांची मात्रा आंबा बागायतदारांकडून दिली जाते. त्यातून खतांच्या खरेदी-विक्रीतून दर वर्षी कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. त्यामध्ये पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले आहेत.

गेल्या दोन वर्षांपासून खरेदी-विक्रीतील आर्थिक व्यवहारासाठी पॉस मशीनचा अवलंब केला जात आहे. पॉस मशीनच्या जोडीला आता क्यूआर कोड प्रणालीही विकसित करण्यात आली आहे. त्यामुळे खरेदीदाराला बाजारमूल्याप्रमाणे खत खरेदी करणे शक्य होणार आहे. 

कनेक्टिव्हिटी अभावी वादात  क्यूआर कोडद्वारे पैसे स्वीकारले जाणार असल्याने शेतकऱ्यांकडून मूळ रक्कमेपक्षा विक्रेत्यांकडून जादा रक्कम घेऊन लुबाडणूकही केली जाणार नाही. पॉस मशीन सध्या कनेक्टिव्हिटी अभावी वादात सापडल्या आहेत. तीच स्थिती कायम राहिल्यास क्यूआर कोड प्रणाली शेतकऱ्यांसह दुकानदारांसाठी डोकेदुखी ठरणार आहे. 

दृष्टिक्षेपात राजापूर  परवानाधारक खतविक्रेते ः २३  खत खरेदी विक्री ः ३ हजार ७०० टन  उलाढाल ः सुमारे पाच कोटी 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com