Agriculture news in marathi transplanting of paddy seedlings by using machine | Agrowon

यंत्राद्वारे भात रोपांची लावणी

चेतन सावंत, भास्कर गायकवाड
गुरुवार, 18 जून 2020

भात लावणी यंत्राचे वॉकिंग टाईप आणि रायडींग टाईप असे दोन प्रकार आहेत. वॉकिंग टाईपमध्ये चालकास यंत्राच्या पाठीमागे चालावे लागते किंवा चालकास त्यास चालवावे लागते. रायडींग टाईप मध्ये चालकास यंत्रावर बसण्यासाठी सीट असते. हे यंत्र डिझेल/पेट्रोल इंजीनवर चालते.
 

भात लावणी यंत्राचे वॉकिंग टाईप आणि रायडींग टाईप असे दोन प्रकार आहेत. वॉकिंग टाईपमध्ये चालकास यंत्राच्या पाठीमागे चालावे लागते किंवा चालकास त्यास चालवावे लागते. रायडींग टाईप मध्ये चालकास यंत्रावर बसण्यासाठी सीट असते. हे यंत्र डिझेल/पेट्रोल इंजीनवर चालते.

वॉकिंग टाईप भात पेरणी यंत्र
वॉकिंग टाईप भात पेरणी यंत्रामध्ये मनुष्य चलित आणि डिझेल/पेट्रोल इंजीनवर चालणारे यंत्र असे प्रकार आहेत. यासाठी मुळे धुतलेली भाताची रोपे किंवा खास मॅट टाईप नर्सरी पद्धतीने तयार केलेली रोपे लागतात.

मानव चलित भात लावणी यंत्र 

 • यंत्राचा उपयोग कमी क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना होतो. यंत्राची क्षमता हाताने लावणी करण्यापेक्षा जास्त आहे.
 • यंत्र चालवण्यासाठी चिखलणी करून पाण्याचा निचरा केलेली जमीन लागते.
 • रोप लावताना यंत्र ओढत उलटे चालावे लागते. मॅट टाईप नर्सरीमध्ये लावलेली २० ते २५ दिवसांची रोपे यासाठी वापरतात.
 • रोपे जमिनीमध्ये लावण्यासाठी चालकास यंत्राचे हॅंडल उचलून थोडा खाली दाबावा लागतो आणि पुन्हा पाठीमागे चालावे लागते.
 • यंत्राद्वारे एका दिवसामध्ये ०.१२ ते ०.२८ हेक्‍टर क्षेत्रावर लावणी करता येते.

हॅंड क्रेंकींग टाईप भात लावणी यंत्र

 • भाताची मुळे धुतलेली रोपे एका ओळीत लावण्यासाठी या यंत्राचा उपयोग होतो. एका ओळीत रोपांची लावणी केल्याने त्यामध्ये सायकल कोळपे किंवा इतर यंत्राने भांगलणी करणे सोपे जाते.
 • वाकून हाताने रोप लावणी करताना जो त्रास होतो, तो या यंत्रामुळे टाळता येतो.
 • यंत्राने एका दिवसामध्ये ०.२४ हेक्‍टर जमिनीमध्ये लावणी करता येते.

पॉवर ऑपरेटेड वॉक बिहाइंड टाईप भात लावणी यंत्र

 • रायडींग टाईप भात लावणी यंत्राची किंमत जास्त असते. तसेच वाकून हाताने रोप लावणी करणेही खूप त्रासाचे, वेळ घेणारे आणि खर्चिक असल्याने पॉवर ऑपरेटेड वॉक बिहाइंड टाईप भात पेरणी यंत्राचा वापर फायदेशीर ठरतो.
 • यंत्रासाठी मॅट टाईप नर्सरीची रोपे लागतात. ही रोपे ४० ते ५० मी.मी खोलीवर लावली जातात.
 • यंत्राने एका दिवसात ०.२८ ते ०.३६ हेक्‍टर जमिनीमध्ये रोप लावणी करता येते.

रायडींग टाईप भात लावणी यंत्र

 • रायडींग टाईप भात लावणी यंत्र एका किंवा चार चाकासोबत येते.
 • एका दिवसामध्ये १.२ ते १.६ हेक्‍टर शेतात भात रोपांची लावणी पुर्ण होते.
 • यंत्राने मॅट टाईप पद्धतीने तयार केलेली १४ दिवसांची रोपे लावता येतात. यंत्राच्या सहाय्याने रोप लावणी केल्याने वेळ, मनुष्यबळ आणि खर्चाची बचत होते.

संपर्क - चेतन सावंत, ७५५२५२१२३०
(चेतन सावंत हे केंद्रीय कृषी अभियांत्रिकी संस्था, भोपाळ येथे आणि गायकवाड हे राष्ट्रीय अजैविक ताण संशोधन संस्था,बारामती,जि.पुणे येथे कार्यरत आहेत)


इतर टेक्नोवन
कमी खर्चातील सौर ऊर्जा आधारीत...ग्रामीण भागातील लोक पिण्याच्या पाण्यासाठी...
जांभूळ प्रक्रिया उद्योगासाठी आवश्यक...औषधी गुणधर्म असूनही व्यावसायिक तत्त्वावरील लागवड...
यंत्राद्वारे कमी खर्चात भात पेरणी शक्यभाताची रोपवाटिका करणे, जगवणे, रोपांची वाहतूक,...
एका कुटुंबासाठी स्वयंपूर्ण शिवार वसाहतअर्धा एकर शेतजमीन (दोन हजार चौ.मी. सूर्यप्रकाश) व...
कोरडवाहू सोयाबीनसाठी नावीण्यपूर्ण पेरणी...कोरडवाहू परिस्थितीत सोयाबीनच्या लागवडीसाठी जोळओळ...
सुधारीत वाण, एकात्मिक तंत्रज्ञानातून...तेलबियांचे घटते क्षेत्र, उत्पादकतेची समस्या...
यंत्राद्वारे भात रोपांची लावणीभात लावणी यंत्राचे वॉकिंग टाईप आणि रायडींग टाईप...
भात पेरणीसाठी सुधारित यंत्रेभात लागवडीसाठी सुधारित यंत्राचा वापर फायदेशीर...
पेरणी यंत्राद्वारे पेरणी करताना...प्रशिक्षित ट्रॅक्‍टरचालक हवा    ...
जनावरांतील निदानासाठी क्ष-किरण तपासणीक्ष-किरण तपासणीद्वारे जनावरांतील जठराचा दाह,...
कामाच्या स्वरूपानुसार करा ट्रॅक्टरची...आज बाजारामध्ये वेगवेगळ्या कंपनीचे व क्षमतेचे...
रासायनिक खतातील भेसळ कशी ओळखाल?खरीप हंगामातील पेरणीला सुरवात होणार असून, शेतकरी...
‘शनेश्‍वर’ शेतकरी कंपनीने उभारली अवजारे...राघोहिवरे (ता. पाथर्डी, जि. नगर)) या दुष्काळी...
पीक व्यवस्थापनामध्ये ड्रोन...पीक व्यवस्थापन, कीडनाशकांची फवारणी, सिंचन,...
काजूबोंडावरील प्रक्रियेसाठी आवश्यक...काजू हे कोकणातील मुख्य पीक आहे. कोकणात काजूपासून...
आव्हाने जाणून उतरा गूळ उद्योगातगुळाची मागणी गेल्या काही वर्षामध्ये वाढू लागली...
स्प्रेअरची निवड करताना राहा जागरूकपारंपरिक पाठीवरील पंपापासून अत्याधुनिक स्प्रेअरचा...
नेमकेपणाने फवारणी करण्यासाठी यंत्रमानव...सध्या पुणे येथील टाटा टेक्नॉलॉजी या संस्थेमध्ये...
कृषी उत्पादनांच्या विक्रीसाठी सामाजिक...छोट्या उद्योगापासून बहुराष्ट्रीय कंपन्यापर्यंत...
लसूण प्रक्रिया उद्योगासाठी पेस्ट अन्‌...हाताने लसूण सोलण्यासाठी वेळखाऊ व कष्टदायक ठरू...