डिझेलच्या दरवाढीमुळे वाहतूक व्यवसाय अडचणीत

नाशिक : डिझेलच्या दरात दिवसेंदिवस होत असलेली वाढ अत्यंत चिंताजनक असून, अगोदरच अडचणीत सापडलेला ट्रान्स्पोर्ट व्यवसाय अधिक अडचणीत सापडला असून, डिझेलची दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी नाशिक ट्रान्स्पोर्ट असोसिएशन व नाशिक गुडस ट्रान्स्पोर्ट असोसिएशनकडून केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान, रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.
Transport business in trouble due to diesel price hike
Transport business in trouble due to diesel price hike

नाशिक : डिझेलच्या दरात दिवसेंदिवस होत असलेली वाढ अत्यंत चिंताजनक असून, अगोदरच अडचणीत सापडलेला ट्रान्स्पोर्ट व्यवसाय अधिक अडचणीत सापडला असून, डिझेलची दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी नाशिक ट्रान्स्पोर्ट असोसिएशन व नाशिक गुडस ट्रान्स्पोर्ट असोसिएशनकडून केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान, रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.

असोसिएशनच्या वतीने दिलेल्या पत्रात म्हटले आहे, की देशात आणि राज्यात कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना उद्योग- व्यवसाय व सामान्य नागरिकांचे अर्थचक्र पूर्णपणे कोलमडले आहे. अशापरिस्थितीतही गेल्या वीस दिवसांहून अधिक काळापासून डिझेलच्या दरात सातत्याने दरवाढ होत असून, डिझेल दरवाढीने ऐतिहासिक उंची गाठली आहे. याचा सर्वांत मोठा परिणाम म्हणजे संपूर्ण देशातील ट्रान्स्पोर्ट व्यवसाय अडचणीत सापडला आहे. सातत्याने डिझेलमध्ये दरवाढ होत असल्याने वाहतूक खर्च अधिक वाढत आहे. त्याचा वस्तूंच्या किमतींवर परिणाम होत असून महागाई अधिक वाढून नागरिकदेखील अडचणीत येणार आहे.

अगोदरच कोरोनाच्या संकटाने अनेकांच्या उपजीविकेवर परिणाम होत असून, त्यात महागाईची झळ बसल्यास उद्योग- व्यवसायासोबतच नागरिकांच्या रोषाला शासनाला सामोरे जावे लागणार आहे. बऱ्याच वेळा आम्ही कळविले आहे, की वाहतूकदराचे व कारखान्यांचे इतर माल वाहतूक कंत्राट हे वार्षिक केलेले असते, त्यासाठी तीन ते चार महिन्यांत नियोजित दरवाढ असेल तर आगोदर आम्हाला कारखान्यांना कंत्राट नियम अटीमध्ये टाकता येते; परंतु रोजच दरवाढ होत असेल तर ते त्वरित थांबवावे, असे म्हटले आहे. देशातील ट्रान्स्पोर्ट व्यवसाय एकीकडे अनेक अडचणींचा सामना करत असताना दिवसेंदिवस त्या अडचणी कमी होण्यापेक्षा त्या वाढतच चालल्या आहेत. त्यामुळे शासनाने अडचणीत सापडलेल्या या व्यवसायाला वाचविण्यासाठी आणि नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने डिझेल दरवाढ तातडीने मागे घेऊन दिलासा द्यावा, अशी मागणी ट्रान्स्पोर्ट असोसिएशनच्या माध्यमातून अध्यक्ष राजेंद्र फड व पी. एम. सैनी यांनी केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com