कृषी, कृषिपूरक उद्योगांची वाहतूक सुरू राहणार : भुसे 

कृषी संबंधित बियाणे, खते, पीक कापणी आदी कारणास्तव असलेली वाहतूक लॉकडाऊनमध्ये सुरळीतपणे सुरू राहतील.
dada-bhuse
dada-bhuse

नाशिक : कृषी संबंधित बियाणे, खते, पीक कापणी आदी कारणास्तव असलेली वाहतूक लॉकडाऊनमध्ये सुरळीतपणे सुरू राहतील. सर्व शेतकरी, व्यापारी व ग्राहकांनी कुठल्याही प्रकारची गर्दी न करता व घाबरून न जाता प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे.  कृषिमंत्री श्री.भुसे गुरुवारी (ता.२६) जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी व शेतीपूरक उद्योग यांना लॉकडाऊनमध्ये येणाऱ्या अडचणी संदर्भात जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याशी चर्चा करण्यासाठी आले होते. यावेळी उपस्थित पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. 

श्री.भुसे यांनी सांगितले की, जिल्ह्यात कलम १४४ लावल्यानंतर शेती व शेतीपूरक उद्योगव्यवसाय यांच्या वाहतुकीत काही अडथळे निर्माण झाल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली. शेतीविषयक कुठल्याही कामकाजाच्या वाहतुकीत अडथळा येणार नाही या संदर्भात प्रत्येक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या आहेत. वाहतूक करणाऱ्या वाहनांना ऑनलाइन परवाने व स्टिकर देण्याची व्यवस्था केलेली आहे. त्याचा लाभ सर्व संबंधितांनी घ्यावा असे त्यांनी सांगितले. 

कृषी मालवाहतुकीसाठी नाशिक जिल्ह्याला जोडल्या गेलेल्या मुंबई, पुणे या जिल्ह्यांच्या सेवा सुरू राहतील यासाठी नियोजन करण्यात आले आहे. काही द्राक्षे निर्यात झाले आहेत. काही काढणीला आहेत, यासंदर्भात द्राक्षे बागायतदार संघाशी व शेतकऱ्यांशी चर्चा झाली असून त्यांचे कंटेनर्सद्वारे वाहतुकीचे नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासनास दिले आहेत. स्थानिक पातळीवर द्राक्ष वाहतूक करण्यास कुठलाही अडथळा निर्माण होणार नाही, यासंदर्भात निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. 

मांडलेले प्रमुख मुद्दे: 

  • नागरिकांनी सोशल डिस्टंन्सीच्या नियमांचे काटेकारेपणे पालन करावे. 
  • अन्नधान्य,भाजीपाला,फळे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. कुठल्याही प्रकारची साठेबाजी करू नका. 
  • भाजीपाला, फळे विक्रेत्यांकडे गर्दी करू नये. 
  • चार ते पाच व्यापारी मिळून माल एकत्र करून नागरिकांना सोशल डिस्टंन्स राखून माल विकण्यावर भर द्यावा. 
  • शेतकऱ्यांनी व व्यापाऱ्यांनी एकाच बाजारात गर्दी न करता वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या मालाची विक्री करावी. 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com