agriculture news in Marathi transportation of agriculture and allied products remain open Maharashtra | Agrowon

कृषी, कृषिपूरक उद्योगांची वाहतूक सुरू राहणार : भुसे 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 27 मार्च 2020

कृषी संबंधित बियाणे, खते, पीक कापणी आदी कारणास्तव असलेली वाहतूक लॉकडाऊनमध्ये सुरळीतपणे सुरू राहतील.

नाशिक : कृषी संबंधित बियाणे, खते, पीक कापणी आदी कारणास्तव असलेली वाहतूक लॉकडाऊनमध्ये सुरळीतपणे सुरू राहतील. सर्व शेतकरी, व्यापारी व ग्राहकांनी कुठल्याही प्रकारची गर्दी न करता व घाबरून न जाता प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे. 

कृषिमंत्री श्री.भुसे गुरुवारी (ता.२६) जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी व शेतीपूरक उद्योग यांना लॉकडाऊनमध्ये येणाऱ्या अडचणी संदर्भात जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याशी चर्चा करण्यासाठी आले होते. यावेळी उपस्थित पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. 

श्री.भुसे यांनी सांगितले की, जिल्ह्यात कलम १४४ लावल्यानंतर शेती व शेतीपूरक उद्योगव्यवसाय यांच्या वाहतुकीत काही अडथळे निर्माण झाल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली. शेतीविषयक कुठल्याही कामकाजाच्या वाहतुकीत अडथळा येणार नाही या संदर्भात प्रत्येक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या आहेत. वाहतूक करणाऱ्या वाहनांना ऑनलाइन परवाने व स्टिकर देण्याची व्यवस्था केलेली आहे. त्याचा लाभ सर्व संबंधितांनी घ्यावा असे त्यांनी सांगितले. 

कृषी मालवाहतुकीसाठी नाशिक जिल्ह्याला जोडल्या गेलेल्या मुंबई, पुणे या जिल्ह्यांच्या सेवा सुरू राहतील यासाठी नियोजन करण्यात आले आहे. काही द्राक्षे निर्यात झाले आहेत. काही काढणीला आहेत, यासंदर्भात द्राक्षे बागायतदार संघाशी व शेतकऱ्यांशी चर्चा झाली असून त्यांचे कंटेनर्सद्वारे वाहतुकीचे नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासनास दिले आहेत. स्थानिक पातळीवर द्राक्ष वाहतूक करण्यास कुठलाही अडथळा निर्माण होणार नाही, यासंदर्भात निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. 

मांडलेले प्रमुख मुद्दे: 

  • नागरिकांनी सोशल डिस्टंन्सीच्या नियमांचे काटेकारेपणे पालन करावे. 
  • अन्नधान्य,भाजीपाला,फळे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. कुठल्याही प्रकारची साठेबाजी करू नका. 
  • भाजीपाला, फळे विक्रेत्यांकडे गर्दी करू नये. 
  • चार ते पाच व्यापारी मिळून माल एकत्र करून नागरिकांना सोशल डिस्टंन्स राखून माल विकण्यावर भर द्यावा. 
  • शेतकऱ्यांनी व व्यापाऱ्यांनी एकाच बाजारात गर्दी न करता वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या मालाची विक्री करावी. 

इतर बातम्या
पुण्यात पोलिस बंदोबस्तात बाजार समिती...पुणे : कोरोनामुळे शहरात लॉकडाऊन असतानाही...
पुणे बाजार समिती आजपासून सुरु; मात्र...पुणे : कोरोना विषाणूमुळे सुरू असलेल्या...
देशातील रुग्णसंख्या ९०० च्या घरातनवी दिल्ली : महासत्ता अमेरिकेसह संपूर्ण जगात...
देशातील वस्त्रोद्योगाला दोन लाख कोटींचा...जळगाव ः देशात शेतीनंतर रोजगाराचा व आर्थिक...
राज्यातील कोरोना रुग्णाची संख्या १८१;...मुंबई : राज्यात शनिवारी (ता.२९) आणखी २८ कोरोना...
मुंबई बाजार समितीत आज व्यापाऱ्यांचा...मुंबई : राज्य शासनाच्या आदेशामुळे सुरू...
फळे, भाजीपाला पुरवठ्यासाठी राज्यभर...पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना फळे व...
‘कोरोना’चा सामना करण्यासाठी ११ हजार...अकोला  ः कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे...
नगर जिल्हा बॅंकेने दिले कर्जवसुलीचे...नगर ः कोरोना व्हायरसचा संसर्ग कमी करण्यासाठी...
वाशीममधील कृषी निविष्ठा केंद्रे सुरू...वाशीम : ‘कोरोना’ विषाणूच्या पार्श्वभूमीवर...
नगर, पुणे, सोलापूरात हजारवर वाहतूक...पुणे ः शहरांमध्ये भाजीपाला, फळे, दुध अशा...
वऱ्हाडातील ६५ हजारांवर नागरिक गावी परतलेअकोला ः रोजगार, नोकरीच्या निमित्ताने शहरांमध्ये...
अकोल्यातील दिड हजारांवर शेतकऱ्यांची...अकोला ः कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव...
जिल्हा परिषदेचे दीड लाख कर्मचारी देणार...नगर ः कोरोना संसर्गाबाबत उपाययोजना करण्यासाठी...
राज्यात पुर्वमोसमी पावसाचा आजही अंदाज पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुर्वमोसमी...
नगर जिल्ह्यात तिसऱ्या दिवशी पावसाचा...नगर  ः नगर जिल्ह्यामध्ये सलग तिसऱ्या दिवशी...
शेतमाल निर्यातीसाठी वाणिज्य मंत्रालयाने...नागपूर  ः राज्यात जारी करण्यात आलेल्या...
औरंगाबाद, जालना जिल्ह्यात पाऊस औरंगाबाद/जालना: दोन्ही जिल्ह्यातील जवळपास ६७...
कलिंगड, खरबूज उत्पादक शेतकऱ्यांना फटकासोलापूर ः खास उन्हाळी हंगाम डोळ्यासमोर ठेवून...
राज्य तलाठी संघांकडून एक दिवसाचे वेतन...परभणी ः कोरोना बाधितांच्या मदतीसाठी तलाठी, मंडल...