agriculture news in marathi transportation of sheep and goats | Agrowon

वाहतूक शेळ्या, मेंढ्यांची...

डॉ. सचिन टेकाडे
मंगळवार, 25 फेब्रुवारी 2020

तापमानात जास्त वाढ झाल्यास, शेळ्यांना शरीराचे तापमान स्थिर ठेवण्यास अतिरिक्त प्रयत्न करावे लागतात. यामध्ये शरीरातील ऊर्जेचा वापर, शरीराच्या स्थितीमध्ये बदल करणे, जास्त खाणे, तोंडाने श्‍वास घेण्याचा प्रयत्न करणे अशी उष्माघातासारखी लक्षणे दिसतात.

उन्हाळ्यामध्ये वाहतुकीदरम्यान शेळ्या, मेंढ्यांमध्ये उष्णतेचा ताण निर्माण होतो. याकरिता वाहनातील वायुवीजनाबाबत अतिरिक्त दक्षता घ्यावी. वाहनामध्ये हवेचा प्रवाह खंडित होणार नाही याची काळजी घ्यावी.

तापमानात जास्त वाढ झाल्यास, शेळ्यांना शरीराचे तापमान स्थिर ठेवण्यास अतिरिक्त प्रयत्न करावे लागतात. यामध्ये शरीरातील ऊर्जेचा वापर, शरीराच्या स्थितीमध्ये बदल करणे, जास्त खाणे, तोंडाने श्‍वास घेण्याचा प्रयत्न करणे अशी उष्माघातासारखी लक्षणे दिसतात.

उन्हाळ्यामध्ये वाहतुकीदरम्यान शेळ्या, मेंढ्यांमध्ये उष्णतेचा ताण निर्माण होतो. याकरिता वाहनातील वायुवीजनाबाबत अतिरिक्त दक्षता घ्यावी. वाहनामध्ये हवेचा प्रवाह खंडित होणार नाही याची काळजी घ्यावी.

वाहनामध्ये शेळ्यांची जास्त गर्दी होऊ देऊ नये. प्रवास सुरू केल्यानंतर प्रथम एक तासाने व नंतर प्रत्येक २ ते ३ तासांनी शेळ्यांची तपासणी करावी. वाहतुकीदरम्यान वाहन थांबवल्यास सावलीच्या ठिकाणी थांबवावे. उन्हामध्ये वाहन थांबवू नये. वाहतूक करतेवेळी तापमान व सापेक्ष आर्द्रता विचारात घेऊन वाहतूक करावी. वाहतुकीसाठी २५ अंश सेल्सिअसपर्यंतचे तापमान अनुकूल असते.

तापमानात जास्त वाढ झाल्यास, शेळ्यांना शरीराचे तापमान स्थिर ठेवण्यास अतिरिक्त प्रयत्न करावे लागतात. यामध्ये शरीरातील ऊर्जेचा वापर, शरीराच्या स्थितीमध्ये बदल करणे, जास्त खाणे, तोंडाने श्‍वास घेण्याचा प्रयत्न करणे अशी उष्माघातासारखी लक्षणे दिसतात. अशा वेळी शेळ्यांच्या डोक्यावर गार पाणी टाकल्यास शरीराचे तापमान कमी होण्यास मदत होते.

वाहतुकीनंतर घ्यावयाची दक्षता

 • वाहतुकीनंतर शेळ्या,मेंढ्या वाहनामधून काळजीपूर्वक उतरवून घ्याव्यात.
   
 • वाहतुकीच्या संपूर्ण प्रक्रियेदरम्यानचा कालावधी शेळ्यांकरिता फार तणावजणक असतो. याचा परिणाम शेळ्यांच्या प्रतिकारशक्ती वर होतो.
   
 • वाहतुकीचा कालावधी १२ तासांचा असल्यास, वाहतुकीनंतरचे साधारणपणे ३ दिवस शेळ्या तणावग्रस्त स्थितीत राहतात. यादरम्यान शेळ्यांमध्ये शारीरिक तापमानामध्ये वाढ, हृदयाचे ठोके तसेच श्‍वास घेण्याचा वेग वाढणे इ. लक्षणे दिसतात. या कालावधीत शेळ्या आजारी पडण्याचे प्रमाण वाढते. शेळ्यांना प्रामुख्याने श्‍वसन संस्थेचे आजार जसे निमोनिया, घटसर्प, पीपीआर इ. यांसारखे आजार होण्याची शक्यता असते.
   
 • वाहतुकीनंतर शेळ्यांना तीन दिवस इलेक्ट्रोल पावडर तसेच १० लिटर पाण्यामध्ये १ किलो गुळाचे मिश्रण करून प्रति शेळी ५०० मि.ली. पाजावे.
   
 • वाहतुकीचा ताण कमी करण्याकरिता शेळ्यांना ताणविरोधी औषधे जसे व्हिटामिन-सी, व्हिटामिन-एडी ३ यासोबतच वेदनाशामक व प्रतिजैविक औषधे द्यावीत.

संपर्कः डॉ. सचिन टेकाडे, ९३७०३४००५८
(सहायक संचालक, पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ, पुणे)


इतर कृषिपूरक
धिंगरी अळिंबीचे उत्पादन तंत्रधिंगरी आळिंबी ही कमी खर्चात चांगला आर्थिक फायदा...
जनावरातील सर्पदंशाचे निदान अन्‌ उपचार सध्याच्या काळात चराईला जाणाऱ्या जनावरांच्यामध्ये...
गाभण शेळी तपासणीसाठी आधुनिक तंत्रज्ञानशेळी गाभण झाल्यानंतर शरीरात विविध बदल होतात....
मधमाशीपालनातून मिळवा प्रोपोलिस, रॉयल...प्रोपोलिस मानवी आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत....
मधमाशी पालनामध्ये मोठी व्यावसायिक संधीमधमाशी पालनामध्ये मधाच्या बरोबरीने सात विविध...
पावसाळ्यामध्ये कोंबड्यांचे व्यवस्थापनपावसाळ्यामध्ये वातावरणातील दमटपणा वाढलेला असतो....
`मनरेगा‘च्या माध्यमातून पशुसंवर्धन योजनाग्रामीण भागात राहणाऱ्या अकुशल कामगारांना गावातच...
स्वच्छ दूध निर्मितीसाठी उपाययोजनागोठा नेहमी स्वच्छ, कोरडे, खाच खळगेविरहित असावा....
प्रयोगशाळांतून होईल पशू आजाराचे योग्य...जनावरांचे आरोग्य अबाधित राखणे, जनावरातील आजारांचे...
स्वच्छ दूधनिर्मितीवर लक्ष द्यादुधाची प्रत ही दुधातील फॅट, एस.एन.एफ.चे प्रमाण...
नवजात वासराची घ्यावयाची काळजीआरोग्याच्या दृष्टीने वासराचे जीवन हे  पहिले...
गोड्या पाण्यातील कोळंबी संवर्धनकोळंबी संवर्धनासाठी तलावाचे क्षेत्रफळ ०.१ ते ०.२...
जनावरांतील सर्पदंशांवर प्राथमिक उपचारसर्पदंश झालेले जनावर बेचैन होते.हालचाल करत नाही....
जनावरांच्या आजाराकडे नको दुर्लक्षपशूतज्ज्ञ आजार निदानासाठी जनावर आजारी असतानाची...
शेळ्यांना द्या सकस आहार...शेळ्यांच्या विविध शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी...
बायोफ्लाक मत्स्यपालनाचे तंत्रबायोफ्लाक तंत्रज्ञानातील महत्त्वाचे घटक म्हणजे...
व्यवस्थापन गाई-म्हशींचेसाधारणपणे गाई,म्हशींचा गाभण काळ अनुक्रमे २८० ते...
दुग्ध व्यवसाय ठरतोय शेतीला आधारपनवेल येथील बांधकाम व्यावसायिक अनिल लक्ष्मण...
जनावरांच्या आहारात असावीत खनिज मिश्रणेखनिज कमतरतेचा परिणाम जनावरांची वाढ तसेच प्रजनन...
सामूहिक प्रयत्नातूनच प्राणिजन्य आजारावर...जगातील सुमारे ७० टक्के आजार हे प्राणिजन्य आहेत,...