Agriculture news in Marathi Traps are beneficial for pest control in citrus crop | Agrowon

मोसंबी पिकात कीड नियंत्रणासाठी सापळे फायदेशीर

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 15 सप्टेंबर 2020

आंबिया बहराच्या मोसंबी फळांमध्ये साखर निर्मितीस सुरुवात होत असतांनाच फळांवर रस शोषण करणारे पतंग, फळमाशी आदींचा प्रादुर्भाव होतो. त्याच्या प्रभावी नियंत्रणासाठी सापळ्यांचा वापर फायदेशीर ठरतो, असे प्रतिपादन मोसंबी संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. संजय पाटील यांनी केले.

बीड : आंबिया बहराच्या मोसंबी फळांमध्ये साखर निर्मितीस सुरुवात होत असतांनाच फळांवर रस शोषण करणारे पतंग, फळमाशी आदींचा प्रादुर्भाव होतो. त्याच्या प्रभावी नियंत्रणासाठी सापळ्यांचा वापर फायदेशीर ठरतो, असे प्रतिपादन मोसंबी संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. संजय पाटील यांनी केले.

रौळसगाव (ता. बीड) येथे शनिवारी (ता. १२) आयोजित प्रक्षेत्र भेटीदरम्यान ते बोलत होते. या दरम्यान त्यांच्यासमवेत मोसंबी बागायतदार सूर्यकांत हजारे, अविनाश शिंदे, जिल्हा परिषद सदस्य अशोकराव लोढा आदींची उपस्थिती होती.

डॉ. पाटील म्हणाले की, फळातील रस शोषण करणारे पतंग निशाचर असल्याने सायंकाळी बाहेर पडून पिकलेल्या फळांच्या सालीत छिद्र करून रस शोषून घेतात. परिणामी फळात बुरशी वा जिवाणूंची वाढ होऊन फळे सडून गळतात. त्यासाठी बागेत धूर करावा. बाधित फळे नष्ट करून बाग स्वच्छ ठेवल्यास नक्कीच नुकसान कमी होते.

यासोबतच नर माशांना करण्यासाठी मिथिल उजेनॉल सापळ्यांचा वापर केल्यास फळमाशीच्या पुढील पिढीस अटकाव होण्यास मदत मिळते. वेळोवेळी कृषी विद्यापीठाकडून मार्गदर्शन मिळाल्यास शेतकऱ्यांना चांगलाच फायदा होईल, असे अशोकराव लोढा यांनी सांगितले. या वेळी मोसंबी बागायतदारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना डाॅ. पाटील यांनी सविस्तर उत्तरे दिली.


इतर बातम्या
सोलापूर जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी...सोलापूर  : मराठा समाजाला आरक्षण...
मुक्त विद्यापीठात कृषीविषयक अभ्यासक्रम...नाशिक : ‘‘यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त...
खानदेशातील सिंचन प्रकल्प भरलेजळगाव : खानदेशात या महिन्यातील जोरदार पावसाने...
सोलापूर जिल्ह्यात दहा हजार हेक्‍टरवर...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून...
सोलापूर जिल्हा बॅंक देणार अल्प मुदतीचे...सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
परभणी, हिंगोलीत ओल्या दुष्काळाचे सावटपरभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील अनेक मंडळांत...
जळगाव जिल्ह्यात उडीद, मूग खरेदीची...जळगाव : शासकीय उदीद, मूग खरेदीसंबंधीची प्राथमिक...
मराठवाड्यात कपाशी काळवंडली, सोयाबीन...औरंगाबाद : सततच्या पावसाने औरंगाबाद, जालना, बीड...
खानदेशातील कांदेबाग केळी काढणीला वेगजळगाव : खानदेशात कांदेबाग केळी काढणी सुरू झाली...
परभणीत भरपाईसाठी ‘स्वाभिमानी’ची पिकांसह...परभणी : अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान...
नाशिक जिल्ह्यात खरिपासह भाजीपाला पिके...नाशिक : जिल्ह्याच्या सर्वदूर भागात शनिवारी (...
`औरंगाबाद जिल्ह्यातील नुकासानग्रस्त...औरंगाबाद : सतत सुरू असलेल्या पावसाने कोणत्या...
ऊसतोडणी दर ठरविताना उत्पादकांवरील बोजा...पुणे : दहा लाख ऊसतोडणी कामगारांच्या वतीने विविध...
शेती विधेयकांविरोधात शुक्रवारी बंदपुणे ः केंद्र सरकारने लोकसभेत पास केलेल्या...
मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती उठवावीमुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च...
राहुरी कृषी विद्यापीठासाठी नव्या...पुणे: महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या...
‘मुळा’तून विसर्ग बारा हजार क्युसेकवर...नगर ः नगर जिल्ह्यातील मुळा धरणाच्या पाणलोटात पाऊस...
शेतकऱ्यांना कॉर्पोरेट कंपन्यांच्या...कोल्हापूर : पाशवी बहुमताच्या बळावर भलेही तुम्ही...
कांदा बियाण्याची टंचाईनगरः गेल्यावर्षी पाऊस व बदलत्या वातावरणामुळे...
मोताळा तालुक्यात वादळी पावसाने नुकसानबुलडाणा ः जिल्ह्यात शनिवारी (ता. १९) वादळी...