परभणी ः ‘‘परभणी जिल्हा परिषदेच्या यंदाच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात कृषी तसेच पशुसंवर्धन
अॅग्रो विशेष
'क्यूआर कोड'द्वारे वृक्ष, पिकांची २१० एकरांमध्ये माहिती
क्यूआर कोडचे महत्त्व वाढत आहे. याचा प्रभावी वापर आता शेतीच्या उपयुक्त माहितीसाठी ही करण्यात आला आहे. तळसंदे (ता. हातकणंगले) येथे २१० एकरांमध्ये असलेल्या डी. वाय. पाटील ॲग्रिकल्चर फार्मवर हा प्रयोग राबवण्यात आला आहे.
कोल्हापूर : अलीकडच्या काळात क्यूआर कोडचे महत्त्व वाढत आहे. याचा प्रभावी वापर आता शेतीच्या उपयुक्त माहितीसाठी ही करण्यात आला आहे. तळसंदे (ता. हातकणंगले) येथे २१० एकरांमध्ये असलेल्या डी. वाय. पाटील ॲग्रिकल्चर फार्मवर हा प्रयोग राबवण्यात आला आहे.
फार्मवरील वृक्षांना व पिकांना क्विक रिस्पॉन्स म्हणजे क्यूआर कोड दिले जात आहेत. स्मार्टफोनने क्यूआर कोड स्कॅन करताच त्या वृक्षांची व पिकांची
संपूर्ण माहिती मोबाईल स्क्रीनवर येते. संबंधित पिकाचे अथवा वृक्षाचे शास्त्रीय नाव, कुळ, उगम स्थान, वाण, कीड व रोग व्यवस्थापन, पाणी व खत व्यवस्थापन, उत्पादन इत्यादी सविस्तर माहिती काही सेकंदात मिळवता येईल.
कार्यालयीन वेळेनंतर व सुट्टीच्या दिवशीही ही माहिती उपलब्ध व्हावी हा या मागील प्रमुख उद्देश असल्याचे प्राचार्य डॉ. एस. बी. पाटील, प्राचार्य डी. एन. शेलार व फार्म इन्चार्ज ए. बी. गाताडे यांनी सांगितले. या पिकांची सविस्तर माहिती व क्यूआर कोड बनवण्यासाठी प्रा. योगेश चिमटे व प्रा. आर. एन. व्हनकट्टे यांच्यासह अन्य प्राध्यापकांनी परिश्रम घेतले.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील व कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला आहे. अध्यक्ष डॉ. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
१३९ वृक्ष, पिकांची माहिती
ॲग्रिकल्चर फार्मवर फळ पिके, भाजीपाला, परदेशी भाजीपाला, नगदी पिके, शोभिवंत वनस्पती, औषधी व सुगंधी वनस्पती तसेच जंगली वृक्ष अशा एकूण १३९ वृक्षांची व पिकांची माहिती डिजिटल स्वरूपात नोंदवण्यात आली आहे. झाडावरील हा कोड स्कॅन केल्यास तुम्हाला थेट त्याची माहिती मिळू शकेल. डी. वाय. पाटील ॲग्रिकल्चर कॅम्पस येथे बी. टेक. ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग, बी. एस्सी. ॲग्रिकल्चर, ॲग्रिकल्चर पदविका, कृषी विज्ञान केंद्र व यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्राच्या माध्यमातून २००० हून अधिक विद्यार्थी कृषी शिक्षण घेत आहेत. अनेक शेतकरी, पालक व पाहुणे या ॲग्रिकल्चर फार्मला भेट देत असतात. आता या सर्वांना या उपक्रमाचा लाभ घेता येणार आहे. या फार्मवरील प्रत्येक झाड व पिकांची माहिती माहिती लक्षात ठेवणे किंवा लिहून घेण्यापेक्षा क्यू आर कोडद्वारे काही सेकंदात संपूर्ण माहिती देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
- 1 of 674
- ››