Agriculture news in Marathi Tree, crop information by QR code | Agrowon

'क्यूआर कोड'द्वारे वृक्ष, पिकांची २१० एकरांमध्ये माहिती

राजकुमार चौगुले
बुधवार, 24 फेब्रुवारी 2021

क्यूआर कोडचे महत्त्व वाढत आहे. याचा प्रभावी वापर आता शेतीच्या उपयुक्त माहितीसाठी ही करण्यात आला आहे. तळसंदे (ता. हातकणंगले) येथे २१० एकरांमध्ये असलेल्या डी. वाय. पाटील ॲग्रिकल्चर फार्मवर हा प्रयोग राबवण्यात आला आहे.

कोल्हापूर : अलीकडच्या काळात क्यूआर कोडचे महत्त्व वाढत आहे. याचा प्रभावी वापर आता शेतीच्या उपयुक्त माहितीसाठी ही करण्यात आला आहे. तळसंदे (ता. हातकणंगले) येथे २१० एकरांमध्ये असलेल्या डी. वाय. पाटील ॲग्रिकल्चर फार्मवर हा प्रयोग राबवण्यात आला आहे.

फार्मवरील वृक्षांना व पिकांना क्विक रिस्पॉन्स म्हणजे क्यूआर कोड दिले जात आहेत. स्मार्टफोनने क्यूआर कोड स्कॅन करताच त्या वृक्षांची व पिकांची
संपूर्ण माहिती मोबाईल स्क्रीनवर येते. संबंधित पिकाचे अथवा वृक्षाचे शास्त्रीय नाव, कुळ, उगम स्थान, वाण, कीड व रोग व्यवस्थापन, पाणी व खत व्यवस्थापन, उत्पादन इत्यादी सविस्तर माहिती काही सेकंदात मिळवता येईल.

कार्यालयीन वेळेनंतर व सुट्टीच्या दिवशीही ही माहिती उपलब्ध व्हावी हा या मागील प्रमुख उद्देश असल्याचे प्राचार्य डॉ. एस. बी. पाटील, प्राचार्य  डी. एन. शेलार व फार्म इन्चार्ज ए. बी. गाताडे यांनी सांगितले. या पिकांची सविस्तर माहिती व क्यूआर कोड बनवण्यासाठी प्रा. योगेश चिमटे व प्रा. आर. एन. व्हनकट्टे यांच्यासह अन्य प्राध्यापकांनी परिश्रम घेतले.

संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील व कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला आहे. अध्यक्ष डॉ. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

 १३९ वृक्ष, पिकांची माहिती
ॲग्रिकल्चर फार्मवर फळ पिके, भाजीपाला, परदेशी भाजीपाला, नगदी पिके, शोभिवंत वनस्पती, औषधी व सुगंधी वनस्पती तसेच जंगली वृक्ष अशा एकूण १३९ वृक्षांची व पिकांची माहिती डिजिटल स्वरूपात नोंदवण्यात आली आहे. झाडावरील हा कोड स्कॅन केल्यास तुम्हाला थेट त्याची माहिती मिळू शकेल. डी. वाय. पाटील ॲग्रिकल्चर कॅम्पस येथे बी. टेक. ॲग्रिकल्चर  इंजिनिअरिंग, बी. एस्सी. ॲग्रिकल्चर, ॲग्रिकल्चर पदविका, कृषी विज्ञान केंद्र व यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्राच्या माध्यमातून २००० हून अधिक विद्यार्थी कृषी शिक्षण घेत आहेत. अनेक शेतकरी, पालक व पाहुणे या ॲग्रिकल्चर फार्मला भेट देत असतात. आता या सर्वांना या उपक्रमाचा लाभ घेता येणार आहे. या फार्मवरील प्रत्येक झाड व पिकांची माहिती माहिती लक्षात ठेवणे किंवा लिहून घेण्यापेक्षा क्यू आर कोडद्वारे काही सेकंदात संपूर्ण माहिती देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.


इतर बातम्या
दूध विक्री कमिशनवर नियंत्रण आणा पुणे : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना...
किमान तापमानात वाढ पुणे ः मध्य महाराष्ट्राच्या परिसरात चक्रीय...
देशी कोंबडी पिलांच्या मागणीत ७० टक्के...नगर ः बर्ड फ्लूची लाट ओसरली आहे. मात्र तरीही...
‘पीएम-किसान’चे काम करण्यास महसूलचा नकार अकोला ः पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना...
अकोला : अवकाळी, गारपीटग्रस्तांना १७...अकोला ः गेल्या वर्षात जिल्ह्यात फेब्रुवारी ते मे...
खरिपात सोयाबीन पेरणीवेळी जोड ओळ पद्धत...जालना ः ‘‘येणाऱ्या खरीप हंगामात सोयाबीन पिकात जोड...
अकोला परिमंडळात ४८ तासांत ३४० चोऱ्या उघडअकोला ः अकोला परिमंडळात वीजचोरीच्या घटनांमध्ये...
मराठवाडा रेशीम शेतीचा केंद्र बिंदू ः डॉ...जालना : ‘‘हवामान बदलानुसार योग्य त्या पिकांच्या...
‘पोकरा’मध्ये कामाची प्रक्रिया आता ऑनलाइनमुंबई/औरंगाबाद : नानाजी देशमुख कृषी संजीवनी...
राज्यात गहू क्षेत्रात ३८ टक्क्यांनी वाढनगर ः परतीच्या पावसाने पाण्याची बऱ्यापैकी...
‘महाबीज’चे २१० हेक्टरवर सोयाबीन...परभणी ः ‘महाबीज’च्या परभणी विभागांतर्गत सहा...
‘युटोपियन’कडून पाच लाख मेट्रिक टन उसाचे...सोलापूर ः ‘‘यंदा जास्त ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले...
म्हैसाळच्या आवर्तनासाठी पाणी मागणीची...सांगली ः मिरज पूर्व भागासह कवठेमहांकाळ, जत तालुक्...
`सुधारित शिफारशींसाठी शेतकऱ्यांमध्ये...परभणी ः ‘‘सोयाबीन उत्पादकता वाढ तसेच उत्पादन खर्च...
बूथ कमिट्या सक्षम करा : नाना पटोले मुंबई : काँग्रेस पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी सर्व...
प्रत्येक गावांनी पाण्याचे अंदाजपत्रक...पुणे : गावात पडणारा पाऊस व पिकांना लागणारे पाणी...
नेपाळच्या कांदा व्यापाऱ्याला ...नाशिक : जिल्ह्यात शेतमाल विक्री पश्चात...
वीज जोडणी तोडल्यास राज्यभर आंदोलन :...अकोला : आधीच कोरोनामुळे गेले वर्षभर शेतकरी व...
पालखेड उपबाजार आवारात द्राक्ष मण्यांचे...नाशिक : पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीचा...
तीनच दिवसांत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ...नाशिक : सोमवारी ४२३०, बुधवारी ३४८१ आणि गुरुवारी...