agriculture news in marathi, tree plantation planning, pune, maharashtra | Agrowon

पुणे विभागासाठी साडेपाच कोटींवर वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 23 मे 2019

पुणे  ः पर्यावरणाचे संतुलन अबाधित राखण्यासाठी दरवर्षी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम शासनामार्फत राबविण्यात येतो. यंदाही हा पावसाळ्यात हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. पुणे विभागासाठी पाच कोटी ४५ लाख ४६ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यासाठी चार कोटी ४६ कोटी खड्ड्यांची कामे झाले असल्याची माहिती विभागीय आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिली. 

पुणे  ः पर्यावरणाचे संतुलन अबाधित राखण्यासाठी दरवर्षी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम शासनामार्फत राबविण्यात येतो. यंदाही हा पावसाळ्यात हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. पुणे विभागासाठी पाच कोटी ४५ लाख ४६ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यासाठी चार कोटी ४६ कोटी खड्ड्यांची कामे झाले असल्याची माहिती विभागीय आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिली. 

गेल्या काही वर्षांपासून पर्यावरणाचे संतुलन बिघडत चालले आहे. ते अबाधित राखण्यासाठी शासनाकडून दरवर्षी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात येतो. यंदाही हा कार्यक्रम हाती घेतला जाणार आहे. त्यासाठी पुणे विभागात ३३ कोटी वृक्ष लागवड २०१९ अंतर्गत ५.४८ कोटी या एकूण लक्ष्यांकापैकी ४६.४० लाख झाडांचे वन विभाग पुनरुज्जीवन करणार असून, शिल्लक पाच कोटी एक लाख वृक्ष लागवडीसाठी खड्डे खोदले गेले आहेत. राज्यात वृक्ष लागवडीसाठी खड्डे खोदण्याची ५१.३१ टक्के कामे पूर्ण झाली आहेत. पुणे विभागात ही कामे प्रगतिपथावर आहेत. यामध्ये सातारा जिल्ह्यात १०० टक्के, पुणे जिल्ह्यात ८६ टक्के, सांगली जिल्ह्यात ९० टक्के, कोल्हापूर जिल्ह्यात ९५ टक्के, सोलापूर जिल्ह्यात ७४ टक्के कामे पूर्ण झाली आहेत.

वृक्ष लागवडीसाठी ४८४.३९ लाख रोपे आवश्यक आहे. विभागात ५४६.४० लाख रोपेनिर्मिती झाली असून, ती गरजेपेक्षा ६२ लाखांनी अधिक आहेत. त्यामुळे वृक्षलागवडीसाठी रोपांची कमतरता भासणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले. यामध्ये वन विभागाकडे दोन कोटी ३७ लाख, तर सामाजिक वनीकरण विभागाकडे तीन कोटी ९ हजार अशी एकूण पाच कोटी ४६ लाख ४० हजार रोपे वृक्ष लागवडीसाठी उपलब्ध होतील. 
 

जिल्हा वृक्ष लागवडीचा लक्ष्यांक उपलब्ध होणारी रोपे
पुणे  १,५२,३८,००० १,६१,३१,०००
सातारा १,२४,०१,००० १,०४,१६,०००
सांगली  ७२,२९,००० ७७,४२,०००
सोलापूर  ८३,४८,०००  ८५,६२, ०००
कोल्हापूर १,१३,३०,०००  १,१७,८९,००० 

 

इतर ताज्या घडामोडी
हवामान बदलाच्या अभ्यासासाठी नियामक मंडळ...मुंबई : हवामान बदलाचा मानवी आरोग्यावर होणाऱ्या...
शेतकऱ्यांना अनुदानावर सेफ्टी किटचा...यवतमाळ  ः दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यात...
राष्ट्रीय पशू वाहतूक बंदीचा आर्थिक फटका...इंग्लंडमध्ये लाळ्या खुरकुत (एफएमडी), बोव्हाईन...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन डोंगर...सिंधुदुर्ग : अतिवृष्टीने खचलेल्या डोंगरांपैकी...
कॉंग्रेसच्या आजपासून ‘महापर्दाफाश' सभा...मुंबईः संपूर्ण राज्य भयंकर दुष्काळ आणि...
जानकर साहेबांची ताकत चौकात नाही; शिवाजी...मुंबई : राज्यात राष्ट्रीय समाज पक्षाची ताकत ...
ड्रायझोनमधील वरुडला ठिबक अनुदानातून...अमरावती  ः सर्वाधिक संत्रा लागवड व...
जलसमस्येवरील उपायांच्या प्रयत्नात...औरंगाबाद: मराठवाड्यासह राज्यात निर्माण होणाऱ्या...
नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यात...नांदेड  : नांदेड, परभणी, हिंगोली...
पुण्यात भाजीपाल्याची आवक, दर स्थिरपुणे  ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
पंतप्रधान शेतकरी मानधन योजनेच्या...वाशीम : केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी सुरू...
झरे परिसरात महावितरणकडून वीजजोडणीस...झरे, जि. सांगली : झरे व परिसरातील घरगुती व...
परभणी जिल्ह्यात पीक कर्जवाटपाच्या गतीला...परभणी : चालू आर्थिक वर्षातील पहिल्या साडेचार...
देवळा तालुक्यातील ‘त्या’...नाशिक : मागील पंधरवड्यात कळवण, सुरगाणा तालुक्यात...
सोलापूर जिल्ह्यात दोन लाख वीज...सोलापूर : घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...अकोला  ः भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय...
देश, राज्यात बेरोजगारी हेच मोठे आव्हान...नगर : मागील पाच वर्षांत नोटबंदीसारख्या...
साताऱ्यातील भूस्खलन बाधितांचा पुनर्वसन...सातारा  : अतिवृष्टी व भूस्खलनामुळे बाधित...
नगर झेडपीत सहा महिन्यांत माहिती...नगर  ः जिल्हा परिषदेतून विविध योजनांची...
...तर बारामतीची जागाही जिंकता आली असती...नागपूर  ः ‘ईव्हीएम’मध्ये गडबड करायची असती तर...