लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये वृक्षलागवडीची हॅटट्रिक

हा राज्यातील पर्यावरणस्नेही लोकांनी एकत्र येऊन साजरा केलेल्या वृक्षोत्सवाचा सन्मान आहे. वन विभाग, शासनाचे विविध विभाग, स्वयंसेवी संस्था, अध्यात्मिक संस्था, व्यापारी-उद्योजक, शेतकरी, कामगार वर्ग, गृहनिर्माण संस्था, सिनेक्षेत्रातील मान्यवर, शालेय- महाविद्यालयीन विद्यार्थी व शिक्षक, लोकप्रतिनिधी, माध्यम प्रतिनिधी या सर्वांनी योगदान दिले आहे. - सुधीर मुनगंटीवार, वनमंत्री
वृक्षलागवड
वृक्षलागवड

मुंबई: राज्यात होत असलेल्या वृक्षलागवडीची सलग तिसऱ्यांदा लिम्का बुक ऑफ रेकॉर्डने नोंद घेतली असून नुकतेच मागील वर्षी २०१८ मध्ये झालेल्या तेरा कोटी वृक्षलागवडीसाठी वन विभागाला लिम्का बुक ऑफ रेकॉर्डचे प्रमाणपत्र प्राप्त झाले. या तीन व कांदळवन विकासात राज्याने केलेल्या भरीव प्रयत्नाचा सन्मान म्हणून लिम्का बुक ऑफ रेकॉर्डने केलेल्या नोंदीचे एक असे मिळून वन विभागाला आतापर्यंत लिम्का बुक ऑफ रेकॉर्डची ४ प्रमाणपत्रे मिळाली आहेत. राज्यात १ जुलै ते ३१ जुलै २०१८ या कालावधीत वन विभागाने लोकसहभागातून तेरा कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठेवले होते. प्रत्यक्षात १५ कोटी ८८ लाखांहून अधिक वृक्षलागवड झाली.  तर ३८ लाखांहून अधिक लोक या वृक्षलागवडीत सहभागी झाले. यासंबंधीचे लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड चे प्रमाणपत्र वन विभागास नुकतेच प्राप्त झाले. यापूर्वी राज्यास ४ कोटी वृक्षलागवडीसाठी लिम्का बुक ऑफ रेकॉर्डचे प्रमाणपत्र प्राप्त झाले होते. या वेळी वन विभागाने १ ते ७ जुलै २०१७ या कालावधीत लोकसहभागातून ५ कोटी ४३ लाखांहून अधिक वृक्षलागवड केली होती. यात सोळा लाख लोक सहभागी झाले होते. १८५ प्रजातींची झाडे यात लावली गेली होती. २०१६ मध्ये १ जुलै २०१६ रोजी एकाच दिवशी दोन कोटी वृक्षलागवडीचा संकल्प २ कोटी ८१ लाखांहून अधिक वृक्षलागवड होऊन पूर्णत्वाला गेला होता. यात सहा लाखांहून अधिक लोक सहभागी झाले होते. १२ तासात झालेल्या या वृक्षलागवडीसही लिम्का बुक ऑफ रेकॉर्डचे प्रमाणपत्र प्राप्त झाले होते. राज्यात जुलै ते सप्टेंबर २०१९ या कालावधीत लोकसहभागातून ३३ कोटी वृक्षलागवडीचा संकल्प आहे. आजपर्यंत राज्यात २९ कोटी १८ लाख ८५ हजार १६७ वृक्षलागवड झाली आहे. यात ८४ लाख १८ हजार ३५५ लोकांनी सहभाग नोंदवला आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com