रंगतविहीर येथे महिला बचत गटांच्या माध्यमातून वृक्ष लागवड

रंगतविहीर येथे महिला बचत गटांच्या माध्यमातून वृक्ष लागवड
रंगतविहीर येथे महिला बचत गटांच्या माध्यमातून वृक्ष लागवड

नाशिक : बचत गटांच्या महिलांनी वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून सुरगाणा तालुक्यातील रंगतविहीर गावाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.   वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून व जयम फाउंडेशन यांच्या सहकार्याने सुरगाणा तालुक्यात रंगतविहीर व कोसवन या गावांमध्ये बचत गटांच्या माध्यमातून ६००० वृक्ष लागवडीचा कार्यक्रम घेण्यात आला. सोमवार, दि.२२ ते २४ जुलैदरम्यान हा कार्यक्रम पार पडला. यामध्ये सीताफळ, डाळिंब, काजू ,आवळा, कडुनिंब, पेरू आणि लिंबू अशा फळझाडांची लागवड करण्यात आली. नऊ महिला बचत गट व त्यांच्या सदस्यांच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्यात आले. ही झाडे त्याने स्वमालकीच्या जागेत लावायची आहेत. यात १७८ सदस्यांनी यात उत्स्फूर्त सहभाग घेतला.  या वेळी वनवासी कल्याण आश्रमाचे नाशिकचे संजय शाह, जयम फाउंडेशनचे डॉ. इंगळे आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वितेसाठी रंगतविहिर ग्रामस्थ प्रतिनिधी श्री कांतिलाल गावित, संकुल ग्रामोदय विकास सहयोगी योगेश गावित, गाव जलदूतचे प्रतिनिधी पोपट गांगुर्डे, कोसवन येथील अजित गावीत, वनवासी कल्याण आश्रम, जलदूत संस्था व सेवावर्धिनी (पुणे) या संस्थेचे कार्यकर्ते आदींनी परिश्रम घेतले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com