Agriculture news in marathi The trend towards onion cultivation in the girna area | Agrowon

गिरणा परिसरात कांदा लागवडीकडे कल

टीम अॅग्रोवन
रविवार, 16 फेब्रुवारी 2020

मेहुणबारे, जि. जळगाव  ः चाळीसगाव तालुक्‍यात या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने विहिरींना चांगले पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे बहुतांश शेतकरी कांदा पिकाकडे वळले आहेत.

फेब्रुवारीच्या सुरुवातीला जवळपास सहा हजार हेक्‍टर क्षेत्रावर उन्हाळी कांद्याची लागवड झाली आहे. त्यामुळे मागील वर्षापेक्षा यंदा चार हजार हेक्‍टर जास्तीच्या क्षेत्रावर कांदा लागवड झाल्याचे तालुका कृषी कार्यालयातील नोंदींवरून दिसून येत आहे. कांद्यांना चांगले भाव असल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. त्यामुळे कांदा लागवडीच्या क्षेत्रात आणखी वाढ होण्याची शक्‍यता आहे. 

मेहुणबारे, जि. जळगाव  ः चाळीसगाव तालुक्‍यात या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने विहिरींना चांगले पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे बहुतांश शेतकरी कांदा पिकाकडे वळले आहेत.

फेब्रुवारीच्या सुरुवातीला जवळपास सहा हजार हेक्‍टर क्षेत्रावर उन्हाळी कांद्याची लागवड झाली आहे. त्यामुळे मागील वर्षापेक्षा यंदा चार हजार हेक्‍टर जास्तीच्या क्षेत्रावर कांदा लागवड झाल्याचे तालुका कृषी कार्यालयातील नोंदींवरून दिसून येत आहे. कांद्यांना चांगले भाव असल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. त्यामुळे कांदा लागवडीच्या क्षेत्रात आणखी वाढ होण्याची शक्‍यता आहे. 

चाळीसगाव तालुक्‍यात या वर्षी पाऊस चांगला झाल्याने बेभरवशाचे पीक असलेल्या कांद्याला पुरेसे पाणी उपलब्ध झाले आहे. अवकाळी पावसाचा फटका बसलेले शेतकऱ्यांनीही यंदा कांदा लागवडीवर भर दिलेला आहे. तालुक्‍यात मागील वर्षी १५०० हेक्‍टरवर उन्हाळी काद्यांची लागवड झाली होती. या वर्षी ही लागवड वाढली असून, तालुका कृषी कार्यालयाकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, सहा हजार हेक्‍टरवर उन्हाळी कांदा लागवड झाली आहे. तालुक्‍याचे एकूण क्षेत्र ९५ हजार हेक्‍टर असून, यात ऊस, मका, केळी आदी पिकांचा समावेश आहे. सततची दुष्काळी परिस्थिती, पाण्याचे दुर्भिक्ष यामुळे इतर पिकांबरोबरच बागायती पिकांनाही धोका निर्माण झाला होता.

कांद्याला सध्या बाजारात मोठी मागणी आहे. यामुळे लागवड वाढली आहे. हवी तशी शी थंडी  पडली नाही. आताही कधी ढगाळ तर कधी दमट वातावरण असते. अशा बदलत्या वातावरणामुळे कांद्यांच्या उगवण शक्तीवर काही भागात विपरीत परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. अशा स्थितीत कृषी विभागाने त्यांना मार्गदर्शन करावे, अशी मागणी होत आहे. 


इतर ताज्या घडामोडी
जळगावात खासगी डेअरी चालक,...जळगाव  ः जिल्ह्यात दुधाच्या वितरणात येणाऱ्या...
पुणे जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, सदस्य...पुणे  : ‘कोरोना’ या राष्ट्रीय आपत्ती...
अत्यावश्यक सेवेतील शेतीमाल वाहतुकीस...सोलापूर  ः अत्यावश्यक सेवा म्हणून माल वाहतूक...
`तुम्ही घरी थांबा,आम्ही अखंडित...नाशिक : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
अकोल्यात शेतकरी उत्पादक गटांकडून घरपोच...अकोला  ः कृषी विभागाच्या कृषी तंत्रज्ञान...
सिन्नर तालुक्यात गारपिटीच्या तडाख्यात...नाशिक : सिन्नर तालुक्यातील पूर्व भागात दातली...
बेदाणा निर्मितीसाठी प्रोत्साहनपर अनुदान...नाशिक: कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशात...
विरवडे येथील सीना नदीत वाळू उपसा करणारे...सोलापूर  ः विरवडे (ता.मोहोळ) येथे सीना...
‘किराणा मालाचा काळाबाजार बंद करा’नगर ः ‘कोरोना’च्या संकटावर मात करण्यासाठी अनेक...
पुणे बाजार समितीत तिसऱ्या दिवशीही...पुणे: कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊनमध्ये बाजार...
मुंबईत मंत्रालयातील चौथ्या मजल्यावर आगमुंबई : मुंबईत मंत्रालयातील चौथ्या मजल्यावर...
सकस चाऱ्यासाठी पेरा बाजरी,मकाजनावरांच्या पोषणामध्ये हिरवा चारा महत्वाचा आहे....
उन्हाळी चारा मका पिकातील लष्करी अळीचे...बऱ्याच भागांमध्ये चाऱ्यासाठी उन्हाळ्यात मका...
हवामान सुसूत्रीकरण करणारी जागतिक हवामान...पृथ्वीच्या बदलत्या वातावरणामध्ये तापमान वाढीसोबतच...
खामसवाडीतील फुल उत्पादकांना दररोज...खामसवाडी, जि. उस्मानाबाद : ऐन लग्नसराईत जरबेरा...
भंडाऱ्यात ‘बीटीबी’ भाजी बाजाराच्या...भंडारा ः ‘कोरोना’ विषाणूच्या विरोधातील शासनाच्या...
खानदेशात बाजार समित्यांमधील लिलाव...जळगाव ः खानदेशात कलिंगडाची शिवार खरेदी ठप्प...
नँचरल उद्योग समूह सुद्धा करणार...शिराढोण, जि. उस्मानाबाद ः अन्न व औषध प्रशासन तसेच...
सांगलीत खतांची दुकाने सुरू; पोलिसांची...सांगली : जिल्ह्यातील ग्रामीण भागात असणारे कृषी...
अकोल्यात पीककर्ज व्यवहारास ३१ मेपर्यंत...अकोला ः ‘कोरोना’ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या...