Agriculture news in Marathi Tribal Corporation procures 49 lakh quintals of paddy | Agrowon

आदिवासी महामंडळातर्फे ४९ लाख क्विंटल धान खरेदी

टीम अॅग्रोवन
सोमवार, 10 ऑगस्ट 2020

आदिवासी विकास महामंडळामार्फत दीड लाख शेतकऱ्यांकडून आदिवासी उपयोजना क्षेत्रात ४९.१८ लाख क्विंटल धान प्रतिक्विंटल १ हजार ८१५ या किमान आधारभूत किमतीने केंद्र शासनाच्या दराने खरेदी करण्यात आले आहे.

नाशिक : कोरोनाच्या संकट काळात आदिवासी विकास महामंडळामार्फत दीड लाख शेतकऱ्यांकडून आदिवासी उपयोजना क्षेत्रात ४९.१८ लाख क्विंटल धान प्रतिक्विंटल १ हजार ८१५ या किमान आधारभूत किमतीने केंद्र शासनाच्या दराने खरेदी करण्यात आले आहे.

या अंतर्गत राज्य शासनामार्फत धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून प्रतिक्विंटल ७०० रुपये जास्तीचा बोनस देण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत साधारण ९०० कोटी रुपयांची धान्य खरेदी करण्यात आली असल्याची माहिती आदिवासी विकास विभाग व महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक नितीन पाटील यांनी दिली.

कोविड कालावधीमध्ये चार हजार शेतकऱ्यांकडून मका हे १ हजार ७६० रुपये तर ज्वारी हे २ हजार ५५० रुपये प्रतिक्विंटल या हमी दराने ३० कोटींचे भरडधान्य आदिवासी उपयोजना क्षेत्रात खरेदी करण्यात आले असून शेतकऱ्यांना या मार्फत किमान हमी दर मिळवून दिला आहे. या भरडधान्य खरेदीची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ऑनलाइन पद्धतीने जमा करण्यात आली असल्याचेही श्री. पाटील यांनी कळविले आहे.

आदिवासी विकास महामंडळ त्यांच्याकडील ३२ हजार क्विंटल धान्य व कडधान्य अति गरीब आदिम आदिवासी कुटुंबांना वाटप करण्यात येत आहे. त्यापैकी आत्तापर्यंत ४० हजार कुटुंबांना तीन हजार क्विंटल धान्याचे वाटप करण्यात आले असून उर्वरित धान्य वाटपाचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.


इतर अॅग्रो विशेष
‘पोकरा’मधून फळबाग, वनशेती, बांबू, तुती...औरंगाबाद: नानाजी देशमुख कृषी संजीवनी...
पावसाळ्यापूर्वीच कापूस खरेदीचे नियोजन अमरावती : गेल्या हंगामात पावसामुळे कापसाचे नुकसान...
सुधारित शेती, पूरक व्यवसायाचा ‘निवजे...निवजे (ता.कुडाळ,जि.सिंधुदुर्ग) गावकऱ्यांनी शेती...
मॉन्सूनचा परतीचा प्रवास लांबला पुणे : देशभरात गेले तीन ते चार महिने समाधानकारक...
राज्यात पावसाचा जोर ओसरला पुणे : राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे. परंतु काही...
पपईला अतिपावसाचा फटका जळगाव ः अतिपावसात खानदेशात पपईचे पीक खराब झाले...
कृषी विधेयकांविरोधात आज ‘भारत बंद’ नगर/कोल्हापूर: केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन...
कपाशी सल्ला कपाशीच्या बोंडे सडण्याच्या समस्येवर उपाययोजना...
कोकण, खानदेशात पावसाचा धुमाकूळ पुणे ः कोकण आणि खानदेशला पावसाने झोडपून काढले....
हलका ते मध्यम पावसाची शक्यता पुणे ः कोकण, मध्य महाराष्ट्र व खानदेशात दोन...
कृषी विधेयकांविरोधात शेतकरी रस्त्यावरचंडीगड ः केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी...
नाशिकमध्ये खरीप कांदा लागवडी बुरशीजन्य...नाशिक: खरीप हंगामातील पोळ कांदा लागवडी पूर्ण...
कुलगुरू निवडीचे निकष ऐरणीवर पुणे: राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये...
काजू बागायतदारांना गंडा घालणाऱ्या...सिंधुदुर्ग: काजू बागायतदारांना जादा दराचे आमिष...
सोयाबीन ठरेल ‘मॅजिकबीन’ नागपूर: देशात यावर्षी सोयाबीन खालील क्षेत्रात घट...
ऊस उत्पादक पट्ट्यात पेरूचा यशस्वी प्रयोगसांगली जिल्ह्यातील अंकलखोप (ता. पलूस) या ऊस...
झेंडू ठरलंय हमखास उत्पन्नाचे पीकशहरी बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन मोह (ता.सिन्नर...
पावसाचा जोर ओसरणार पुणे ः गेले काही दिवस मराठवाडा, मध्य महाराष्ट्र,...
मोडून पडली काढणीला आलेली केळी औरंगाबाद: काही दिवसांत जवळपास दोन वर्ष...
निर्यातबंदीनंतरही कांदा खाणार भाव पुणे: निसर्ग चक्रीवादळात कांदा रोपवाटिकांचे...