सूक्ष्म सिंचन साधनांमुळे आदिवासी शेतकरी समृद्ध : कुलगुरू डॅा. ढवण;

Tribal farmers rich with micro irrigation equipment : Dr. Dhawan
Tribal farmers rich with micro irrigation equipment : Dr. Dhawan

हिंगोली : ‘‘वसंतराव नाईक मराठावाडा कृषी विद्यापीठातर्फे गेल्या चार वर्षात वाई येथील अनेक आदिवासी शेतकऱ्यांना सिंचनासाठी ठिबक आणि तुषार संच दिले. त्यामुळे या गावातील पीक पध्दती बदलली. हळद, ऊस, भूईमूग, हरभरा आदी नगदी पीकांचे उत्पादन शेतकरी घेऊ लागले आहेत. सूक्ष्म सिंचन साधनांव्दारे पाण्याचा काटेकोर, कार्यक्षम वापर होऊ लागल्याने रब्बी, उन्हाळी हंगामात सिंचनासाठी पाणी मिळत आहे. उत्पादन, उत्पन्नात वाढ झाली. गावात समृध्दी आली. येत्या काळात शेतमालाच्या मुल्यवर्धनासाठी प्रक्रिया उद्योग सुरु करण्यासाठी विद्यापीठातर्फे तांत्रिक मदत केली जाईल,’’ अशी ग्वाही कुलगुरु डॉ. अशोक ढवण यांनी दिली. 

रविवारी (ता.२६) प्रजासत्ताक दिनानिमित्त वाई येथे शिवार फेरीसह तुषार संच, ठिबक संचाच्या उपनळ्या वितरण कार्यक्रम झाला. येथील ३ तीन शेतकऱ्यांना तुषार, तर १६ शेतकऱ्यांना ठिबक संचाच्या उपनळ्यांचे वाटप करण्यात आले.

संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, संशोधन उपसंचालक डॉ. अशोक जाधव, अखिल भारतीय समन्वित सिंचन व पाणी व्यवस्थापन प्रकल्पाचे प्रमुख डॉ. अशोक कडाळे, ज्वार संशोधन केंद्राचे प्रभारी डॉ. के. आर. कांबळे, बैल शक्तीचा वापर योजनेच्या प्रमुख डॉ. स्मिता सोळंकी, प्रा.गजानन गडदे, सरपंच शकुराव मुकाडे, जनसंपर्क अधिकारी डॉ. प्रविण कापसे, प्रा.अनुराधा लाड आदी उपस्थित होत्या. 

शास्त्रज्ञांकडून हळद, हरभरा पिकांची पाहणी 

विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वित सिंचन व पाणी व्यवस्थापन प्रकल्पातंर्गंत या संचाचे वाटप करण्यात येत आहे. डॉ. ढवण यांच्यासह शास्त्रज्ञांनी शिवारातील हळद, हरभरा, भाजीपाला पीकांची पाहणी केली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com