घोटभर पाण्यासाठी आदिवासी महिलांचा संघर्ष

पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. जगण्यासाठी मोठा संघर्ष सुरू आहे. कुणीही राजकारणी व लोकप्रतिनिधी आमच्याकडे लक्ष देत नाही. मोठ्या प्रयत्नांतून पाणी उपलब्ध होते. ते ही गढूळ असते. त्यामुळे टॅंकरने पाणीपुरवठा व्हावा. - हिरामण कातोरे, ग्रामस्थ, अडसरे.बु या ठिकाणी कुठलीही विकासकामे झाली नाहीत. रस्ते, पाण्याची मोठी समस्या आहे.दोन किलोमीटरवरून पाणी पायी आणावे लागते. जनावरांची स्थिती बिकट आहे. महिलांची मोठी वणवण होते. कसे जगावे हा मोठा प्रश्न आहे. - शिवा फोडसे, चौराईवाडी
घोटभर पाण्यासाठी आदिवासी महिलांचा संघर्ष
घोटभर पाण्यासाठी आदिवासी महिलांचा संघर्ष

नाशिक : धरणांचा तालुका म्हणून इगतपुरी तालुक्याची राज्यात ओळख आहे. मात्र सध्या पाणीटंचाईमुळे धरणाजवळ राहणाऱ्या आदिवासी महिलांवर घोटभर पाण्यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. तालुक्यातील पूर्व भागातील म्हैसवळण घाटमाथ्याच्या पायथ्यावरील अडसरे. बु  ग्रुपग्रामपंचायतीमधील चौराईवाडी, फळवीरवाडीत पाण्याचा प्रश्न बिकट आहे. पाणी मिळविण्यासाठी नागरिकांना रोजगार बुडवून रानोमाळ भटकंती करावी लागत आहे.

आदिवासी बांधवांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे. तोच पाण्याचे संकट ओढवले आहे. भर उन्हात पाण्याचा शोध घ्यावा लागतो. मागील काही वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीतर्फे अडसरे गावांसह चौराईवाडी, फळवीरवाडी या दोन्ही आदिवासी वाड्यांना पाण्याच्या टाकीसह नळ पाणीपुरवठा योजना मंजूर झाली होती. कागदोपत्री ही योजना पूर्ण आहे. योजनेचा मंजूर निधी खर्च झाला आहे. त्यामुळे पाणीही फक्त कागदावरच पोचल्याची स्थिती आहे. या ठिकाणी बांधण्यात आलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टाक्या कोरड्याठाक आहेत. 

पाइपलाइन उपलब्ध नाही. मागील वर्षी फळवीरवाडीतील जिल्हा परिषदेच्या शाळा व अंगणवाडीसाठी शिक्षकांच्या मार्गदर्शनातून आणि ग्रामस्थांच्या सहभागातून पाण्याची पाइपलाइन झाली. ती फुटली असून तिच्याकडेही दुर्लक्ष झाले आहे. 

महिलांना दूषित पाणी उपलब्ध होते. त्यासाठीदेखील पायपीट सुरू आहे. रात्री खासगी मालकीच्या विहिरीतून पाणी आणावे लागते. ग्रामपंचायतने बसविलेला हातपंप व परिसरातील विहिरींनी तळ गाठला आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com