Agriculture news in Marathi, Trichocard Production Training by Department of Insectology | Agrowon

कीटकशास्‍त्र विभागातर्फे ट्रायकोकार्ड निर्मिती प्रशिक्षण
टीम अॅग्रोवन
सोमवार, 17 जून 2019

परभणी ः येत्या हंगामात मराठवाड्यातील औरंगाबाद, परभणी, नांदेड येथील कृषी विभागाच्या जैविक कीडनियंत्रण प्रयोगशाळा तसेच वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी कीटकशास्त्र विभागाच्या प्रयोगशाळेत ट्रायकोकार्डची निर्मिती करण्यात येणार आहे.

त्या अनुषंगाने कृषी विद्यापीठामधील कृषी कीटकशास्‍त्र विभागातील परोपजीवी कीटक संशोधन योजना आणि कृषी विभाग यांच्यातर्फे क्रॉपसॅप प्रकल्‍पांतर्गत जैविक घटक, त्‍यांची निर्मिती, कीड व्‍यवस्‍थापनातील उपयुक्‍तता या विषयावर एकदिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन बुधवारी (ता. १२) कृषी कीटकशास्‍त्र विभागामध्ये करण्यात आले होते.

परभणी ः येत्या हंगामात मराठवाड्यातील औरंगाबाद, परभणी, नांदेड येथील कृषी विभागाच्या जैविक कीडनियंत्रण प्रयोगशाळा तसेच वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी कीटकशास्त्र विभागाच्या प्रयोगशाळेत ट्रायकोकार्डची निर्मिती करण्यात येणार आहे.

त्या अनुषंगाने कृषी विद्यापीठामधील कृषी कीटकशास्‍त्र विभागातील परोपजीवी कीटक संशोधन योजना आणि कृषी विभाग यांच्यातर्फे क्रॉपसॅप प्रकल्‍पांतर्गत जैविक घटक, त्‍यांची निर्मिती, कीड व्‍यवस्‍थापनातील उपयुक्‍तता या विषयावर एकदिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन बुधवारी (ता. १२) कृषी कीटकशास्‍त्र विभागामध्ये करण्यात आले होते.

वनामकृविचे विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. प्रदीप इंगोले अध्यक्षस्थानी होते. संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर, कीटकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. पुरुषोत्‍तम झंवर, जैविक कीडनियंत्रण प्रयोगशाळाचे प्रभारी अधिकारी बबन वाघ आदीची प्रमुख उपस्थिती होती. 

डॉ. इंगोले म्‍हणाले, ‘‘जैविक निविष्‍ठांची योग्‍य वेळी उपलब्‍धता होत नाही. कापूस पिकात ट्रायकोकार्डचा वापर केल्‍यास निश्चितच शेतकऱ्यांना बोंड अळी व्‍यवस्‍थापन चांगला प्रकारे करता येईल.’’

डॉ. वासकर म्‍हणाले, ‘‘परोपजीवी कीटक संशोधन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात ट्रायकोकार्डची उपलब्‍धता करून देण्‍याचा प्रयत्‍न राहील. त्यामुळे कमी खर्चात अधिक प्रभावीपणे गुलाबी बोंड अळीचे व्‍यवस्‍थापन करता येईल.’’ 

प्रास्‍ताविक डॉ. झंवर यांनी केले. डॉ. एम. एम. सोनकांबळे, डॉ. बी. व्‍ही. भेदे, डॉ. एस. एस. धुरगुडे, डॉ. ए. जी. बडगुजर आदींनी तांत्रिक सादरीकरण करून ट्रायकोकार्ड निर्मितीची माहिती दिली.वनस्‍पती विकृतिशास्‍त्र विभागात बायोमिक्‍स, ट्रायकोडर्मा, जैविक बुरशी निर्मितीचे प्रात्‍याक्षिक करून दाखविण्‍यात आले. या प्रशिक्षणात शासकीय जैविक कीडनियंत्रण प्रयोगशाळा येथील अधिकारी, कर्मचारी, कृषी विज्ञान केंद्रातील शास्‍त्रज्ञ, विद्यापीठातील जिल्‍हा समन्‍वयक, शास्‍त्रज्ञ सहभागी झाले होते.

इतर ताज्या घडामोडी
नांदेड, परभणी, हिंगोलीत पाऊसनांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २८...
सांगली जिल्ह्यातील ४६८ गावांमधील...सांगली  : जिल्ह्यात ४६८ गावांमधील गावठाणांचा...
लातूर, उस्मानाबाद, जालना, बीड...लातूर : लातूर, उस्मानाबाद, जालना आणि बीड...
अकोला जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअकोला ः पावसाचा खंड आणि त्यातच दिवसाचे...
जलसंधारण कामासाठी जलशक्ती योजना :...वाल्हे, जि. पुणे  : राज्यात जलयुक्त...
अनधिकृत बंधारे काढण्यासाठी ‘स्वाभिमानी’...नगर  : भंडारदरा धरणापासून ते ओझर...
बचत गटांना प्रोत्साहनासाठी ‘हिरकणी...सोलापूर  : राज्याच्या औद्योगिक आणि आर्थिक...
केरळच्या धर्तीवर काजू प्रक्रिया ...रत्नागिरी  ः परदेशी चलन मिळवून देणाऱ्या काजू...
`गोकुळ` मल्टिस्टेटमुळे शेतकऱ्यांचा...मुंबई : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
संगमनेर तालुक्यातील लिंबू बागांना घरघर संगमनेर, जि. नगर : दर्जेदार कागदी लिंबांच्या...
दूध वाहतुकीतून रेल्वेला ६ कोटी १२ लाख...दौंड, जि. पुणे  : दौंड रेल्वे स्थानकावरून...
कृषक विकिरण केंद्रातून अमेरिका, ...नाशिक  : जिल्ह्यातील लासलगाव येथील कृषक...
आसाम, बिहारमध्ये पुराचे ११४ बळीनवी दिल्ली: आसाम आणि बिहारमध्ये पुराचे थैमान...
सौरऊर्जेमुळे शेतकऱ्यांना मुबलक वीज...कोल्हापूर ः शेतकऱ्यांना दिवसा व उद्योगांना स्वस्त...
उशिरा पेरणीसाठी पीक नियोजन आतापर्यंत पडलेला पाऊस व पुढे येणारा पाऊस याचा...
परभणी जिल्ह्यात साडेचार लाख हेक्टरवर...परभणी : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे काही आमदार लवकरच...सोलापूर : कॉंग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक विद्यमान...
पीकविमा प्रश्‍न आठ दिवसांत सोडवा : `...सोलापूर : शेतकऱ्यांनी विमा काढावा, यासाठी...
विमा कंपन्यांविरोधात किसान सभेचा तीन...औरंगाबाद : पंतप्रधान पीकविमा योजनेतील सदोष तरतुदी...
बागलाणात खरीप हंगामातील पिके धोक्यात नाशिक : या वर्षी बागलाण तालुक्यातील रोहिणी, मृग व...