पतंग वर्गीय किडींच्या नियंत्रणासाठी ट्रायकोग्रामा उपयुक्त

ट्रायकोग्रामा शेतातील पिकांचे कुठलेही नुकसान करीत नाही. हा कीटक पिकावर असणाऱ्या बोंडअळ्याचे अंडे शोधून त्यामध्ये स्वतःचे अंडे टाकतो.अशा पद्धतीने कीड नियंत्रणासाठी मदत होते.
Trichogramma insect and Trichocard
Trichogramma insect and Trichocard

ट्रायकोग्रामा शेतातील पिकांचे कुठलेही नुकसान करीत नाही. हा कीटक पिकावर असणाऱ्या बोंडअळ्याचे अंडे शोधून त्यामध्ये स्वतःचे अंडे टाकतो.अशा पद्धतीने कीड नियंत्रणासाठी मदत होते. ट्रायकोग्रामा हा एक परोपजीवी कीटक पतंग वर्गीय कीटकांची अंडी नष्ट करतो. कापसावरील ठिपक्याची बोंडअळी, हेलिकोवर्पा (अमेरिकन बोंडअळी) आणि गुलाबी बोंडअळी यांच्या अंड्याचा नाश ट्रायकोग्रामा करतो. याचबरोबरीने तुरीवरील शेंगा पोखरणारी अळी,उसावरील खोडकिडास, टोमॅटो, भेंडी, वांग्यावरील फळ पोखरणारी अळी, भुईमूग, सूर्यफुलावरील अळी भात, ज्वारी, मका या पिकावरील येणारे पतंग वर्गीय किडींच्या नियंत्रणासाठी उपयुक्त आहे. याचबरोबरीने धान्य, भाजीपाला आणि फळ झाडावरील कीटकांच्या अंड्याचा नाश ट्रायकोग्रामाच्या विविध प्रजाती करतात. अशी आहे कार्यपद्धती

  • ट्रायकोग्रामा हा गांधील माशी सारखा दिसणारा कीटक आहे. अतिशय सूक्ष्म आकाराचा (०.४० ते ०.७० मिमी.) असतो.
  • ट्रायकोग्रामा शेतातील पिकांचे कुठलेही नुकसान करीत नाही. हा कीटक पिकावर असणाऱ्या बोंडअळ्याचे अंडे शोधून त्यामध्ये स्वतःचे अंडे टाकतो.
  • ट्रायकोग्रामाची अंडी अवस्था १६ ते २४ तास असते. त्यानंतर त्यातून अळी बाहेर पडते. अळी अवस्था २ ते ३ दिवस असते. ही अळी किडींच्या अंड्यातील घटकांवर जगते. त्यामुळे त्यातून किडीची उत्पत्ती होऊ शकत नाही. त्यानंतर अळी कोषावस्थेत जाते. कोषावस्था २ ते ३ दिवस असते.७ व्या किंवा ८ व्या दिवशी ट्रायकोग्रामा प्रौढ किडीच्या अंड्यातून बाहेर पडतो.
  • प्रौढ कीटक २ ते ३ दिवस शेतात फिरून अळी वर्गीय किडीच्या अंड्याचा शोध घेऊन, त्यात आपली अंडी घालतो. अशा पद्धतीने कीड नियंत्रणासाठी मदत होते.
  • ट्रायकोकार्ड वापरण्याचे प्रमाण

  • भुईमूग, कापूस, तूर, भात, सूर्यफूल, ऊस, वांगी, ज्वारी व मका या पिकावरील येणारे पतंग वर्गीय किडींचे नियंत्रणासाठी:  पिकावर एकरी २ ते ३ कार्ड दर १० ते १५ दिवसांनी २ ते ३ वेळा लावावे. पीक ४० ते ५० दिवसांचे झाल्यावर पहिल्यांदा कार्ड लावावे.
  • टोमॅटो, भेंडी, वांगी,भाजीपाला पिके:  दहा दिवसांनी एकरी २ कार्ड लावावेत.
  • उसावरील सर्व प्रकारच्या खोड किडींचे नियंत्रण:  ट्रायकोग्रामा चिलोनिस एकरी १ ते २ कार्ड दर दहा दिवसांनी ८ ते १० वेळा लावावेत. हे कार्ड उसाला ४५ दिवसांपासून वापरावे.
  • कापसावरील बोंडअळ्यांचे नियंत्रण:  ट्रायकोग्रामा चिलोनिस आणि ट्रायकोग्रामा बॅक्ट्री वापरावे. पेरणीपासून ४० ते ४५ दिवसापासून ट्रायकोकार्ड लावायला सुरुवात करावी. एकरी २ ते ३ कार्ड दर दहा दिवसांच्या अंतराने ४ ते ५ वेळा लावावे. गुलाबी बोंडअळीच्या अंडी अवस्थेमध्ये नियंत्रण होते.
  • मका, ज्वारी पीक:  एकरी १ ते २ कार्ड दर दहा दिवसांच्या अंतराने पेरणी पासून ४० ते ४५ दिवसांनी लावावे.
  • भातावरील खोडकिड्याचे नियंत्रण:  ट्रायकोग्रामा जापोनिकमचे १ ते २ कार्डस ६ आठवडे लागोपाठ लावावेत. परत रोवणी केल्यानंतर ३० दिवसापासून कार्ड लावण्यास चालू करावे.
  • टीप-  ट्रायकोकार्डचे प्रसारण केल्यानंतर रासायनिक कीडनाशकांचा वापर टाळावा. ट्रायकोकार्ड विषयी

  • ट्रायकोकार्डस हे चांगल्या प्रतीचे असावेत.
  • उत्तम प्रतीचे निकष १ सी.सी. के कार्ड असावे. त्यावरील पॅरासिटीझमचे प्रमाण ८० ते ९० टक्के असावे.
  • ट्रायकोकार्ड हे काळ्या रंगाच्या अंड्याचे दिसेल. त्यानंतर ४ ते ५ दिवसापर्यंतच वापर करावा.
  • निसर्गात आढळणारे अनेक मित्र कीटक क्रायसोपा, लेडीबर्ड बीटल (ढालकिडा), ब्रॅकॉन, अॅपॅनटीलीस, पेंटॅटोमिड ढेकूण, मॅन्टिड, भक्षक कोळी, क्रिप्टोलिमस, सिरफिड माशी, कॅम्पोलेटीस, कॅरोप्स, इक्निमोनिड, रोगस असे अनेक मित्र कीटक निसर्गात आढळून येतात. या मित्र कीटकांची ओळख करून घ्यावी. हे मित्र कीटक शेतामध्ये दिसल्यास किडीच्या नियंत्रणासाठी रासायनिक कीडनाशकांचा वापर शक्यतो टाळावा. संपर्क- डॉ. शिवाजी तेलंग, ९४२१५६९०१८ (कापूस संशोधन केंद्र, नांदेड)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com