`बोंड अळी नियंत्रणासाठी होणार ट्रायकोग्रामाचा वापर`

अतिरिक्त मुख्य सचिवांची जैविक किटक प्रयोगशाळेला भेट
अतिरिक्त मुख्य सचिवांची जैविक किटक प्रयोगशाळेला भेट

नागपूर : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठअंतर्गत असलेल्या स्थानिक कृषी महाविद्यालयातील जैविक कीटक उत्पादन प्रयोगशाळेला अतिरिक्‍त मुख्य सचिव (कृषी) विजयकुमार यांनी नुकतीच भेट दिली. बोंड अळी नियंत्रणासाठी ट्रायकोग्रामा या मित्रकीटकावर आधारित ट्रायकोर्डसची गरज हंगामात भासणार असल्याने त्याचा पुरवठा व तयार करण्यासंबंधीच्या प्रशिक्षण उपक्रमांना सहकार्याची अपेक्षा त्यांनी या वेळी व्यक्‍त केली.

गेल्या हंगामात कपाशीवर गुलाबी बोंड अळी त्यासोबतच धानावर (भात) मावा, तुडतुडे यांचा प्रादुर्भाव झाला होता. या किडीच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कीटकनाशकांचा वापर केला. परंतु, किडींमध्ये प्रतिकारशक्‍ती वाढीस लागल्याने पर्याय म्हणून जैविक उपायांचा वापर करण्याचे प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती या वेळी विजय कुमार यांनी दिली. बोंड अळीच्या नियंत्रणासाठी ट्रायकोग्रामा हा मित्रकीटक प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे.

ट्रायकोकार्डस शेतात एकरी दोन या पद्धतीने लावले जातात. साधारणतः ४२ रुपयांना एक याप्रमाणे त्याची किंमत असते. यामाध्यमातून शेतकऱ्यांना वाजवी दरात बोंड अळी नियंत्रणाचा पर्याय उपलब्ध होणार आहे. ट्रायकोकार्डसचा पुरवठा तसेच कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांना ते कसे तयार करावे, या संबंधीचे प्रशिक्षण देण्याकरिता कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे विजयकुमार या वेळी म्हणाले.

विभागीय कृषी सहसंचालक एन. टी. शिसोदे, विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी प्रज्ञा गोडघाटे, समिती उपसंचालक डॉ. अर्चना कडू, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलींद शेंडे, कीटकशास्त्र विभागाचे डॉ. हरिष सवाई, डॉ. के. बी. उंदिरवाडे, कीटकशास्त्र विभागाचे सहायक प्राध्यापक प्रा. राम गावंडे, कृषी उपसंचालक एस. टी. लोखंडे, डॉ. आर. एम. वडस्कर, डॉ. जया उघाडे, डॉ. आर. ओ. देवतळे या वेळी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com