agriculture news in Marathi trouble in irrigation scheme due to electricity arrears Maharashtra | Agrowon

वीजबिल थकबाकीमुळे ताकारी सिंचन योजनेत अडथळा

टीम अॅग्रोवन
सोमवार, 23 नोव्हेंबर 2020

कडेगाव, पलूस, खानापूर, तासगाव तालुक्ं‍यासह दुष्काळी भागास वरदाई ठरलेल्या ताकारी योजनेची सुमारे १८ कोटी वीजबिल थकबाकी आहे.

सांगली ः कडेगाव, पलूस, खानापूर, तासगाव तालुक्ं‍यासह दुष्काळी भागास वरदाई ठरलेल्या ताकारी योजनेची सुमारे १८ कोटी वीजबिल थकबाकी आहे. साखर कारखान्यांकडून गतवर्षीची पाच कोटी पाणी पट्टी थकली आहे. परंतु साखर कारखान्यांकडून पाणीपट्टी भरण्यासाठी कोणत्याही हालचाली सुरू केल्या नसल्याचे चित्र आहे. कारखान्यांकडून वेळेत पाणी पट्टी मिळाली तरच थकीत वीजबिलाचा प्रश्‍न मार्गी लागू शकतो. अन्यथा, भविष्यात योजनेचे आवर्तन सुरू करण्यासाठी अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. 

ताकारी उपसा सिंचन योजनेत पाच तालुक्यांचा समावेश आहे. सुमारे १८ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येते. या योजनेच्या लाभ क्षेत्रात साखर कारखाने देखील आहेत. ताकारी योजनेची पाणीपट्टी शेतकऱ्यांच्या ऊसबिलातून जमा करून साखर कारखान्यांकडून पाटबंधारे विभागाकडे वर्ग केली जाते. गतवर्षी योजनेतून तीन आवर्तन सोडण्यात आली होती. त्याचे वीजबिल अठरा कोटींपर्यंत पोहोचले आहे. साखर कारखान्यांकडून योजनेस सुमारे पाच कोटी येणे बाकी आहे.

कारखानदारांनी योजनेची वसुली रक्कम भरावी यासाठी ताकारी योजनेच्या प्रशासनाने पाठपुरवठाही केला आहे. मात्र थकीत असलेली पाणीपट्टी जमा करण्यासाठी प्रतिसाद मिळत नाही. परिणामी, वीजबिलाच्या थकीत रकमेत वाढ होईल. रब्बी हंगाम सुरू झाला आहे. सध्या ताकारी उपसा सिंचन योजनेच्या लाभ क्षेत्रात पाणीटंचाईचे चित्र नाही. परंतु पाणीपट्टी वसुलीची मोहीम राबवणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांसह साखर कारखानदारांकडून वेळेत पाणीपट्टी वसूल झाली नाही, तर थकीत असलेल्या वीजबिलापोटीची रक्कम वेळेत भरता येणार नाही. त्याचा परिणाम भविष्यात सुरू होणाऱ्या आवर्तनावर होणार आहे.

कारखान्यांकडून बिल जमा करण्यास विलंब 
शेतकऱ्यांचा ऊस गाळपाला आल्यानंतर शेतकऱ्यांची बिले अदा केली जातात. त्यातूनच योजनेच्या पाणीपट्टीचे बिल कपात केले जाते. ती पाणीपट्टी पाटबंधारे विभागाकजे वर्ग केली जाते. परंतु गतवर्षीची पाणीपट्टी कारखान्यांनी पाटबंधारे विभागाकडे वर्ग केलेली नाही. साखर कारखान्यांकडून पाणीपट्टी भरण्यास विलंब होत असल्याने वीजबिलाच्या थकबाकीत वाढ होत आहे.


इतर ताज्या घडामोडी
अमरावती विभागात कर्जवाटपात...यवतमाळ : पीककर्ज वाटपासाठी शासनाने बँकांना...
आदिवासींच्या जमिनींचा शोध घेण्यासाठी ‘...बुलडाणा : संग्रामपूर तालुक्यातील चिचारी येथील...
यवतमाळमध्ये ६५ लाखांचे बोगस बीटी...यवतमाळ : जिल्ह्यात खरिपाची लगबग सुरू आहे. याचा...
काळ्याफिती लावून किसानपुत्रांचे आंदोलनआंबेजोगाई, जि. बीड : किसानपुत्र आंदोलनाच्या...
हमीभावाने एक हजार क्विंटल मका खरेदीऔरंगाबाद : आधारभूत किमतीने शेतीमाल खरेदी...
नांदेडमध्ये खरीप पेरणी सुरूनांदेड : जिल्ह्यात जून महिन्याच्या प्रारंभापासून...
पुणे जिल्ह्यातील आठवडी बाजार बंदचपुणे : ग्रामीण भागातील अर्थ व्यवस्थेचा कणा असलेले...
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत तीन...औरंगाबाद : यंदाच्या खरीप हंगामात १५ जून...
जळगाव जिल्ह्यातील कृषी केंद्रांची तपासणीजळगाव ः जिल्ह्यात कृषी केंद्रांमधील बियाणे साठा,...
नगरमध्ये साडेपाच हजार हेक्टरवर फळबाग... नगर : नगर जिल्ह्यात गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही...
मराठवाड्यात पीककर्ज वाटप धीम्या गतीनेच औरंगाबाद : मराठवाड्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी...
कोल्हापुरात पाऊस सुरूच; नद्यांच्या...कोल्हापूर : जिल्ह्याच्या बहुतांशी भागात पावसाच्या...
साखर कारखान्यांच्या कर्जांची चौकशी करानगर : शेतकऱ्यांना पीककर्ज द्यायचे झाल्यास अत्यंत...
राष्ट्रीयीकृत बँकांच्या मदतीने...नाशिक : नाशिक जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून कर्ज...
‘किसानपुत्र आंदोलन’कडून काळ्या...औरंगाबाद : किसानपुत्र आंदोलनाच्या वतीने शुक्रवारी...
द्राक्ष सल्ला : प्रतिकूल ढगाळ हवामानात...यावर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून ढगाळ...
थायलंडचे शेतमजूर अन् मध्यम मार्गावरील...शेती म्हटली की सर्वत्र कमी जास्त प्रमाणात त्याच...
विदर्भात अडीच कोटींचा ‘एचटीबीटी’ साठा...नागपूर : गेल्या हंगामात अनधिकृत कापूस बियाण्याचे...
वैयक्तिक वनदाव्यांचा जलदगतीने निपटारा...नाशिक : जिल्ह्यातील वैयक्तिक वनदाव्यांचा वनसमिती...
कोल्हापुरातील शिवारे जलमयकोल्हापूर : जिल्ह्याला बुधवारी (ता. १६)...