agriculture news in marathi, Troubleshooting the Honeycomb Horticulture Plans | Agrowon

दुष्काळी परिस्थितीने फळबाग लागवड योजना अडचणीत

टीम अॅग्रोवन
बुधवार, 31 ऑक्टोबर 2018

अकोला : कमी पावसामुळे राज्यात विविध भागांत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली अाहे. त्यामुळे या हंगामापासून राबविण्यात येत असलेली भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना अडचणीत सापडण्याची शक्यता अाहे. काही दिवसांपासून पूर्वसंमती पत्रवाटप सुरू करण्यात अाले. मात्र रोपे जगविण्याविषयी शंका शेतकरी उपस्थित करू लागले अाहेत.   

अकोला : कमी पावसामुळे राज्यात विविध भागांत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली अाहे. त्यामुळे या हंगामापासून राबविण्यात येत असलेली भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना अडचणीत सापडण्याची शक्यता अाहे. काही दिवसांपासून पूर्वसंमती पत्रवाटप सुरू करण्यात अाले. मात्र रोपे जगविण्याविषयी शंका शेतकरी उपस्थित करू लागले अाहेत.   

शासनाने सन २०१८-१९ पासून ही योजना नव्याने सुरू केली. योजनेमध्ये केंद्र शासनाच्या महात्मा गांधी, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत लाभ घेऊ न शकणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. या योजनेची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी शासनाच्या कृषी खात्यावर देण्यात अाली अाहे. योजनेत आंबा, पेरू, डाळिंब, संत्रा, मोसंबी, कागदी लिंबू, नारळ, सीताफळ, चिंच, जांभूळ, फणस, कोकम, अंजीर, अावळा, चिकू अादी फळपिकांचा समावेश अाहे. झाडे लागवडीसाठी खड्डे खोदणे, रोपांची लागवड, पीकसंरक्षण, ठिबक सिंचन बसविणे, नांग्या भरणे अादींसाठी अनुदान दिले जाईल.    

राज्यात ठिकठिकाणी कृषी विभाग शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी पूर्वसंमती देत अाहे. ही प्रक्रिया अाधीपासून करणे अपेक्षित असताना त्यासाठी
मागील महिन्यापासून वेग देण्यात अाला.

योजनेत निवड झालेल्या शेतकऱ्यांना मंजूर अनुदान पहिल्या वर्षी ५० टक्के, दुसऱ्या वर्षी ३० आणि तिसऱ्या वर्षी २० टक्के असे मिळेल. दुसऱ्या व तिसऱ्या वर्षातील अनुदान झाडे जगविण्यावर अवलंबून अाहे. भूजल पातळीत कमालीची घट अाहे. लागवड केलेल्या शेतकऱ्यांना बागायती झाडे ९० टक्के, तर कोरडवाहू झाडे ८० टक्के जिवंत ठेवणे आवश्यक आहे.
या हंगामात कुठल्याच जिल्ह्यात पीकपरिस्थिती चांगली नाही. परतीच्या पावसाअभावी हंगाम अडचणीत आहे. विहिरींची पाणीपातळी घटल्याने सिंचनावर परिणाम झालेला अाहे.


इतर अॅग्रो विशेष
अभियान नको, योजना हवीकेंद्र सरकारने आत्मनिर्भर योजनेंतर्गत शेतमाल...
इर्व्हिनिया रॉट रोगाची केळी पिकात समस्या जळगाव ः जिल्ह्यात केळी पिकात...
`पोकरा`मधून शेतमजुरांना प्रशिक्षण द्याऔरंगाबाद: नानाजी देशमुख कृषी संजीवनी...
ऑगस्टमध्ये प्रथमच भरले सीना धरण नगर: दुष्काळी कर्जत, श्रीगोंदा आणि आष्टी...
कोल्हापूर : जनावरे बाजारातील...कोल्हापूर: `कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमुळे...
साखर निर्यातवाढीसाठी केंद्राची ‘रॅपिड अ...कोल्हापूर: देशातून जास्तीत जास्त साखर निर्यात...
परभणीत सोळा हजार शेतकऱ्यांचे आधार...परभणी ः महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
सोयाबीन बियाणेप्रकरणात शेतकऱ्यांना एक...अमरावती : विभागातील पाच जिल्ह्यांत सोयाबीन बियाणे...
‘ई-नाम’, शीतसाखळी बळकट करण्याची गरज;...पुणे: चीनशी व्यापारी संबंध डळमळीत झाल्यानंतर...
‘सिट्रस नेट’वर केवळ दोनशे शेतकऱ्यांची...नागपूर : प्रशासकीय यंत्रणांच्या उदासीनतेमुळे ‘...
मका खरेदी केंद्रांवर शेतकरी ठाण मांडून औरंगाबाद: हमीभावाने खरेदीसाठी ३१ जुलैपर्यंत...
पावसाचा जोर वाढण्याची शक्यता  पुणे ः  बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे...
भाजीपाला शेतीतून अर्थकारणाला गतीडोंगरगाव (ता.जि.अकोला) शिवारातील योगेश नागापुरे...
राज्यात धरणांमध्ये ३८ टक्के साठापुणे : मॉन्सूनचा पाऊस सुरू झाल्यानंतर जून...
जुलैअखेर पावसाने सरासरी गाठलीपुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) हंगामाची...
सांगली जिल्ह्यात २६ हजार हेक्टरने ऊस...सांगली : जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यासह अन्य...
मुगावर काय फवारायचे?अकोला ः कडधान्य वर्गीय पिकांपैकी एक प्रमुख...
कीडनाशकांवरील बंदी- शेतकऱ्यांसाठी तारक...केंद्रीय कृषी मंत्रालयाने २७ कीडनाशकांवर बंदी...
दूध दर आंदोलनाचा राज्यभर एल्गारपुणे: दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती व...
पीकविमा नोंदणीत महाराष्ट्राची आघाडीपुणे: डिजिटल तंत्राचा वापर करून पंतप्रधान पीकविमा...