तेलंगणमध्ये टीआरएस, काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर

तेलंगणमध्ये टीआरएस, काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर
तेलंगणमध्ये टीआरएस, काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर

हैदराबाद : तेलंगणमध्ये तेलंगण राष्ट्र समिती (टीआरएस) आणि काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. सकाळी साडेनऊपर्यंत मिळालेल्या कौलानुसार टीआरएस 55 आणि काँग्रेस 33 तर भाजप 4 आघाडीवर जागांवर आहेत.  तेलंगणमध्ये 119 जागांसाठी मतदान झाले होते. तेलंगणमध्ये चंद्रशेखर राव यांच्या तेलंगण राष्ट्र समितीसमोर काँग्रेसचे आव्हान होते. अंदाजे तीन कोटी नागरिक मतदानाचा हक्क बजावला होता. तेलंगणामध्ये आमच्या पक्षाला प्रचंड बहुमत मिळून पुन्हा एकदा सत्तेवर येऊ, असा ठाम विश्‍वास तेलंगणा राष्ट्र समितीचे प्रमुख के. चंद्रशेखर राव यांनी यापूर्वी व्यक्त केला होता. विधानसभेची मुदत संपण्यापूर्वी आठ महिने आधीच सभागृह बरखास्त करून निवडणुकीला सामोऱ्या जाणाऱ्या तेलंगणमध्ये मात्र 'टीआरएस' पुन्हा सत्तेवर येण्याचा अंदाज आहे. मात्र, काँग्रेस आणि टीडीपी आघाडीकडून त्यांना कडवी लढत मिळत आहे.

तेलंगण (जागा : 119 बहुमतासाठी : 60)  टीआरएस काँग्रेस भाजप अन्य  रिपब्लिक टीव्ही-जन की बात 50-65 38-52 4-7 8-14  टाइम्स नाऊ-सीएनएक्‍स 66 37 7 9  न्यूज एक्‍स-नेता 57 46 6 10  टीव्ही9 तेलुगू-आरा 75-85 25-35 2-3 7-11  इंडिया टुडे-ऍक्‍सिस माय इंडिया 79-91 21-33 1-3 4-7  टीव्ही5 न्यूज 50-65 38-52 4-7 8-14

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com