कांदा घेऊन जाणाऱ्या ट्रक ड्रायव्हरची फिरली नियत..अन् पुढे काय झाले पहा...

कांद्याची ट्रकचालकाकडून परस्पर विक्री
कांद्याची ट्रकचालकाकडून परस्पर विक्री

नाशिक : परराज्यांत होणाऱ्या कांद्याच्या व्यवहारापोटी येवला येथील कांदा व्यापाऱ्याने ट्रान्सपोर्ट कंपनीच्या माध्यमातून मालट्रकद्वारे पश्चिम बंगालमध्ये १२५ क्विंटल उन्हाळ कांदा पाठविला होता. मात्र, ट्रकचालकाने वाहतुकीदरम्यान परस्पर कांदा विक्री केल्याची घटना समोर आली. येवला शहर पोलिसांनी यासंदर्भात ट्रकमालकासह चालकास ताब्यात घेतले. पुढील चौकशी सुरू आहे. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गेल्या दीड-दोन महिन्यांपासून देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याचे दर वाढले आहेत. पश्चिम बंगालमध्ये येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा व्यापारी विनायक बाळकृष्ण ठाकूर यांनी त्यांच्या आशिष ट्रेडिंग कंपनीच्या माध्यमातून ४ ऑक्टोबरला १२५ क्विंटल उन्हाळ कांदा देशांतर्गत बाजारपेठेतील पश्चिम बंगाल येथील एका कांदा व्यापाऱ्याकडे पाठवला होता. यासाठी कांदा व्यापारी ठाकूर यांनी आडगाव येथील सुनील रामचंद्र ओझा यांच्या अर्पित रोडलाइन ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून आलेल्या ट्रकमधून (एमएच ०५, डीके ७०४१) आपला कांदा पश्चिम बंगालच्या दिशेने रवाना केला होता. मात्र, तो पोहचला नाही. याबाबत ठाकूर यांनी शहर पोलिस ठाणे गाठत रितसर तक्रार नोंदवली होती. 

याबाबत पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक युवराज चव्हाण, पोलिस नाईक राकेश होलगडे, कॉन्स्टेबल डी. एम. जाधव आदींचे पथक ठाणे जिल्ह्यातील बदलापूर ईस्ट, अंबरनाथ येथे पोहोचून ट्रक मालक षण्मुगम श्रीनिवासन श्रीरंगन (५२, रा. कल्याण) व चालक खुर्रम नसीरुसल्ला शेख (५५, रा. विठ्ठलवाडी उल्हासनगर, कल्याण) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांना २० तारखेपर्यंत कोठडी सुनावण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com