Agriculture news in marathi The trumpet of the Junnar Market Committee election sounded | Page 3 ||| Agrowon

जुन्नर बाजार समितीच्या निवडणुकीचे बिगुल वाजले

टीम अॅग्रोवन
रविवार, 24 ऑक्टोबर 2021

जुन्नर, जि. पुणे ः जिल्ह्यातील महत्त्वाच्या जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे बिगूल वाजले आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने मतदार यादी व निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.

जुन्नर, जि. पुणे ः जिल्ह्यातील महत्त्वाच्या जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे बिगूल वाजले आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने मतदार यादी व निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार १७ जानेवारी रोजी मतदान आणि १८ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. 

बाजार समितीची संचालक मंडळाची मुदत मागील वर्षी ३ ऑक्टोबर २० रोजी संपली होती. मात्र कोरोनामुळे सुमारे एक वर्ष संचालक मंडळास मुदतवाढ मिळाली. राज्यातील बाजार समित्यांच्या निवडणूक दोन टप्प्यांत होत आहेत. जुन्नर बाजार समितीची निवडणूक पहिल्या टप्प्यात होईल, असे जुन्नरचे सहायक निबंधक सचिन सरसमकर यांनी सांगितले. 

मतदार यादी कार्यक्रमानुसार प्रारूप मतदार यादी करण्याचे काम सुरू आहे. मतदार यादी १० नोहेंबरला प्रसिद्ध होईल. मतदार यादीवर २२ नोहेंबरपर्यंत आक्षेप व हरकती नोंदविता येतील. त्यावर १ डिसेंबर रोजी निर्णय घेण्यात येऊन ६ डिसेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. निवडणूक कार्यक्रम १६ डिसेंबर रोजी प्रसिद्ध होईल. २२ डिसेंबरपर्यंत नामनिर्देश पत्र दाखल करता येतील. २३ डिसेंबरला छाननी होऊन २४ डिसेंबरला वैध नामनिर्देशन पत्रांची यादी प्रसिद्ध होईल. त्यांनतर ७ जानेवारी २२ पर्यंत उमेदवारी अर्ज माघारीची मुदत आहे. त्यानंतर १७ जानेवारीला मतदान व १८ जानेवारीला मतमोजणी होईल. 

या निवडणुकीत बाजार समितीच्या संचालक मंडळाची संख्या एकने कमी होईल. सोसायटी मतदार संघातून ११, ग्रामपंचायत मतदार संघातून ४, व्यापारी मतदार संघातून २ व हमाल मापाडी मतदार संघात एक अशा एकूण अठरा जागांसाठी निवडणूक होईल. पणन मतदार संघातील एक जागा कमी झाली असल्याचे बाजार समितीचे सचिव रूपेश कवडे यांनी सांगितले.


इतर बातम्या
मेंढ्यांच्या संरक्षणासाठी लवकरच योजना ...सुपे, जि. पुणे ः पावसाची संततधार, अतिवृष्टी व...
शेतकऱ्यांनी करून दाखवलं : डॉ. गौहर रझा नाशिक : नव्या भारताचे स्वप्न साकारण्यासाठी शेतकरी...
द्राक्ष पीकविमा योजना  विभागनिहाय...नाशिक : दोन दिवसांपासून राज्यात झालेल्या...
सोयाबीन दरातील सुधारणा  आठवड्याच्या...पुणे ः चालू आठवड्यात बुधवारनंतर सोयाबीन दरात...
‘जवाद’ चक्रीवादळाची  तीव्रता कमी होणारपुणे : बंगालच्या उपसागरातील ‘जवाद’ चक्रीवादळ...
दर्जेदार कृषी विद्यापीठांत  राज्याला...पुणे ः देशातील पहिल्या २० दर्जेदार कृषी...
पुणे जिल्ह्यात १,२४५ ‘विकेल ते पिकेल’...पुणे : शेतीमालाला केवळ हमीभाव नाही तर हमखास भाव...
पुणे जिल्ह्यात धरणांत एक टीएमसी...पुणे : जिल्ह्यात दोन दिवसांपासून धुमाकूळ...
कोल्हापूर जिल्हा बँकेसाठी ३६८...कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा बॅंकेच्या...
सांगली जिल्ह्यातील नुकसानग्रस्त पिकांचे...सांगली : जिल्ह्यामध्ये दोन दिवसांपूर्वी मुसळधार...
सांगली जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष पदाची...सांगली ः जिल्हा बँकेत अध्यक्षपदी आमदार मानसिंगराव...
नंदुरबार : पशुसंवर्धन विभागाच्या...नंदुरबार : पशुसंवर्धन विभागामार्फत सन २०२१-२२ या...
नंदुरबार : रब्बीचे अनुदानित बियाणे...नंदुरबार : कृषी विभागाच्या राष्ट्रीय अन्नसुरक्षा...
खानदेशात मका लागवड घटणार  गहू, बाजरीची...जळगाव ः खानदेशात मका लागवड घटेल, असे संकेत आहेत....
नांदेड जिल्ह्यात नुकसानीच्या मदतीचे...नांदेड : अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी...
नगर जिल्ह्यात रब्बी पेरणी पोहोचली ३१...नगर ः रब्बी हंगामातील बहुतांश पिकांच्या पेरणीचा...
सातारा जिल्ह्यात मॉन्सूनोत्तर पावसाचा...सातारा ः जिल्ह्यात शुक्रवारी (ता.३) पावसाचा जोर...
रब्बी, उन्हाळी हंगामांत पिकांखालील...वर्धा : या वर्षी पाऊस लांबल्याने प्रकल्पांमध्ये...
सोलापूर :शेतकऱ्यांना दुधाळ गाई,...सोलापूर : पशुसंवर्धन विभागामार्फत दुधाळ गाई-...
वीज प्रश्‍नांवर सकारात्मक तोडगा काढणार...वाशीम : जिल्ह्यात विजेची समस्या दिवसेंदिवस गंभीर...