हरभरा, तूर विक्रीसाठी गावातच नोंदणीची सुविधा देण्याचा प्रयत्न : जिल्हाधिकारी डॉ. इटनकर

अर्धापूर, जि. नांदेड : ‘‘‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर खरेदी केंद्रांवरील गर्दी कमी करण्यासाठी किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गंत हरभरा, तूर विक्रीसाठी गावपातळीवर शेतकऱ्यांना नोंदणीची सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्न केले जातील. त्यासाठी आपले सरकार, सेतु सुविधांचे सहकार्य घेतले जाईल’’, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी बुधवारी (ता.८) दिली.
Try to facilitate registration in village for sale of green gram, tour : Dr. Itankar

डॉ. इटनकर यांनी अर्धापूर येथील शासकीय शेतमाल खरेदी केंद्रास भेट दिली. जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) प्रवीण फडणीस, जिल्हा मार्केटिंग अधिकारी सुधीर पाटील, जिल्हा सहकारी खरेदी व विक्री संस्थेचे अध्यक्ष धर्मराज देशमुख, किशोर देशमुख, संचालक अवधुत शिंदे, सचिव सुनेगावकर हजर, नायब तहसीलदार मारोती जगताप, मंडळ अधिकारी संजय खिल्लारे, तलाठी रमेश गिरी, भुजंग कसबे आदी उपस्थित होते. 

डॉ. इटनकर म्हणाले,‘‘हमीभावाने शेतमाल नोंदणी ते खरेदी केंद्रातील शेतकऱ्यांची अडचण दूर करा. शेतमालाच्या खरेदीनंतर चुकारे तत्काळ द्या. तालुक्याच्या ठिकाणी केंद्रावर जाऊन नोंदणी करण्यात शेतकऱ्यांचा वेळ वाया जातो. खर्च होतो. त्यामुळे नवीन सॉफ्टवेअरद्वारे प्रत्येक गावात ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. खरेदी केंद्रांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी गावातच नोंदणी होणे गरजेचे आहे.’’ 

नांदेड जिल्हा सहकारी फळे व भाजीपाला खरेदी- विक्री संस्थेतर्फे कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांतर्गंत मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ५१ हजार रुपयांचा धनादेश संस्थेचे अध्यक्ष देशमुख यांनी इटनकर यांच्याकडे सुपुर्द केला.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com