agriculture news in Marathi, Try to increase the area of ​​dry fruit seedlings | Agrowon

कोरडवाहू फळपिकांच्या क्षेत्र वाढीसाठी प्रयत्न करा : डोंगरे
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 25 एप्रिल 2019

नांदेड ः जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शाश्वत उत्पन्नासाठी फळपिकांचे विशेषतः सीताफळ, बोर, चिंच, जांभूळ आदी कोरडवाहू फळपिकांच्या तसेच हळदीच्या क्षेत्रात वाढ करण्यासाठी प्रयत्न करावेत. रेशीम शेतीवर लक्ष केंद्रित करावे. शेतकऱ्यांना दर्जेदार निविष्ठा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले.

नांदेड ः जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शाश्वत उत्पन्नासाठी फळपिकांचे विशेषतः सीताफळ, बोर, चिंच, जांभूळ आदी कोरडवाहू फळपिकांच्या तसेच हळदीच्या क्षेत्रात वाढ करण्यासाठी प्रयत्न करावेत. रेशीम शेतीवर लक्ष केंद्रित करावे. शेतकऱ्यांना दर्जेदार निविष्ठा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित खरीप हंगाम २०१९ आढावा बैठक श्री. डोंगरे यांच्या अध्यक्षेतेखाली झाली. या वेळी ते बोलत होते. या वेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. शरद कुलकर्णी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, जिल्हा कृषी विकास अधिकारी संतोष नादरे, महाबीजचे विभागीय व्यवस्थापक एस. पी. गायकवाड, पशुसंवर्धन उपायुक्त डाॅ. आर. बी. रत्नपारखी, कापूस संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डाॅ. के. एस. बेग, डाॅ. के. टी. तेलंग, जिल्हा अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक विजय उशीर, कार्यकारी अभियंता ए. व्ही. पत्तेवार, एन. पी. गव्हाणे आदी उपस्थित होते.

श्री. डोंगरे पुढे म्हणाले, ‘‘कापूस पिकांवर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी शेतकऱ्यांमध्ये व्यापक प्रमाणात प्रचार आणि प्रसिद्धी मोहीम राबविण्यात यावी. शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, खते, कीटकनाशके योग्य दरात उपलब्ध होण्यासाठी गुण नियंत्रण पथके स्थापन करावित. शेतकऱ्यांनी निंबोळी अर्काचा जास्तीत जास्त वापर करावा. जमीन आरोग्यपत्रिकेतील शिफारशीनुसार खतांच्या मात्रा द्याव्यात. त्यासाठी कृषी विभागातर्फे माहिती देण्यात यावी. कपाशीच्या एका विशिष्ट वाणाचा आग्रह धरू नये. यंदाच्या वर्षात जिल्ह्यात फळबाग लागवडीवर भर देण्यात यावा. सीताफळ, बोर, चिंच, जांभूळ या कोरडवाहू फळपिकांच्या तसेच हळद पिकाच्या क्षेत्रात वाढ करावी. हळद आणि उसाचे संपूर्ण क्षेत्र ठिंबक सिंचनाखाली आणावे. रेशीम शेतीवर भर देण्यात यावा.’’ 

आत्मा अंतर्गत चारा पीक लागवडीचे काम चांगल्या प्रकारे झाल्याबद्दल श्री. डोंगरे यांनी समाधान व्यक्त केले. श्री. नादरे म्हणाले, यंदाच्या खरीप हंगामासाठी बियाणे, खते वेळेवर आणि मुबलक प्रमाणात उपलब्ध होणार आहेत. खरिपासाठी एकूण २ लाख ७७ हजार ६६० टन खतसाठा उपलब्ध होणार आहे. 

श्री. चलवदे म्हणाले, ‘‘या वर्षी जिल्ह्यात कापूस, तूर, सोयाबीन, हळद आदी पिकांच्या व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांच्या शेतावर माहिती देण्यासाठी ४०० शेतीशाळा घेण्यात येणार आहेत.’’ या वेळी श्री. देशमुख यांनी गुलाबी बोंड अळी निर्मूलन कार्यवाही, नियोजन याबाबत सादरीकरण केले.

इतर बातम्या
मेहकर तालुक्यात कृषी कर्मचाऱ्यांनी...अकोला ः मेहकर तालुक्यात यावर्षी समाधानकारक...
खामगावात टेक्सटाइल पार्क होणारच ः...बुलडाणा  ः तरुणांना रोजगार उपलब्ध करून...
खारपाण पट्ट्यात रब्बीत हजार हेक्टरवर...अकोला  ः जिल्ह्यात असलेल्या खारपाण पट्ट्यात...
जळगाव जिल्ह्यात हमीभाव खरेदी केंद्रांत...जळगाव  ः जिल्ह्यात शासकीय हमीभाव कडधान्य व...
वाघाच्या दहशतीखालील गावे टाकणार...वर्धा  ः कारंजा घाडगे तालुक्‍यातील अनेक...
शेतकऱ्यांना न्याय मिळण्याची आशा धूसर :...‘लोकांच्या डोळ्यांवर धर्मांधतेची झापड चढविण्यात...
वीजग्राहकांच्या समस्यांबाबत भूमिका...मुंबई ः राज्यातील महावितरण कंपनीच्या...
सोलापुरातील ६९५ दूध संस्थांना नोटिसासोलापूर : सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाला दूध...
एचएएल कर्मचाऱ्यांच्या देशव्यापी बेमुदत...नाशिक  : प्रलंबित वेतन करारासह इतर...
आटपाडी तालुका पाऊस, ‘टेंभू’मुळे पाणीदारसांगली : आटपाडी तालुक्यात टेंभूच्या योजनेचे...
सांगलीतील निवडणूक प्रचारात शेती प्रश्‍न...सांगली: विधानसभा निवडणुकीचा प्रचार चांगलाच रंगू...
कर्जफेडीची क्षमता देणाऱ्या धोरणांची गरजविधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये राजकीय...
महामंडळाने ‘उद्योग’ बंद केले तरच विकासराज्यातील कृषी उद्योगाला चालना देण्यासाठी ‘...
हजारो नाशिककरांनी चाखली रानभाज्यांची चवनाशिक : आदिवासी भागात उपलब्ध होणाऱ्या विषमुक्त...
`मी काय केले, हे विचारणाऱ्या अमित...कन्नड जि. औरंगाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी व...
नाशिक जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर...नाशिक : जिल्ह्यासह बागलाण तालुक्यात अतिवृष्टीमुळे...
जालन्यात मूग खरेदी केंद्रांकडे...जालना : हमीदराने शेतीमाल खरेदीसाठी जिल्ह्यात...
नवरात्रोत्सवात पुणे बाजारसमितीत फुलांची...पुणे  ः नवरात्र आणि दसऱ्याला पुणे बाजार...
वैविध्यपूर्ण विचारांनी विद्यार्थी...परभणी : ‘‘विद्यार्थ्‍यांची सांस्‍कृतिक, भाषिक व...
दूध पावडर अनुदानाचा प्रस्ताव फेटाळलापुणे : राज्यातील दूध पावडर (भुकटी) प्रकल्पांना...