शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करा ः पालकमंत्री चव्हाण

नांदेड :‘‘‘लॅाकडाऊन’मुळे शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करावे. अनुदान वाटप करताना बॅंकांतील गर्दी कमी करण्यासाठी उपाययोजना कराव्या’’, असे निर्देश पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिले.
Try to solve the problems of the farmers: Guardian Minister Chavan
Try to solve the problems of the farmers: Guardian Minister Chavan

नांदेड :‘‘‘लॅाकडाऊन’मुळे शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करावे. अनुदान वाटप करताना बॅंकांतील गर्दी कमी करण्यासाठी उपाययोजना कराव्या’’, असे निर्देश पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिले. 

जिल्ह्यातील कोरोना संदर्भातील विविध उपाययोजनांचा आढावा चव्हाण यांनी सोमवारी (ता.६) जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला. आमदार मोहन हंबर्डे, बालाजी कल्याणकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, जिल्हा उपनिबंधक प्रविण फडणीस, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कदम उपस्थिती होते. 

चव्हाण म्हणाले, ‘‘जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. ‘कोरोना’चा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी सर्वांचे प्रयत्न महत्वाचे आहेत. नागरिकांनी जीवनावश्यक वस्तू खरेदी करताना गर्दी करु नये, आवश्यक नसेल तेंव्हा घराबाहेर पडू नये. शेतकरी तसेच विविध योजनेतील गरजू लाभार्थींना मिळणाऱ्या अनुदानाची रक्कम वेळेवर देण्यासाठी बँकांनी आवश्यक त्या उपाययोजना कराव्या. गाव शाखानिहाय अनुदानाची रक्कम वाटप करताना टोकन क्रमांक, दिनांक ठरवून एसएमएसद्वारे लाभार्थ्यांना माहिती दयावी. बँकेतील गर्दी टाळण्यासाठी दक्षता घ्यावी.’’ 

‘‘खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांची तूर, हरभरा खरेदी करताना कोणतीही अडवणूक करु नये. जिल्ह्यातील दुध संकलनाची क्षमता वाढविण्यासाठी लागणारी आवश्यक उपकरणे, मनुष्यबाळाचा आढावा घेऊन जिल्ह्यात दूध संकलनात वाढ करण्यासाठी प्रयत्न करावा, अशी सूचनाही त्यांनी केली.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com