साखरेला ३५०० रुपये दर देण्यासाठी प्रयत्न ः सदाभाऊ खोत

साखरेला ३५०० रुपये दर देण्यासाठी प्रयत्न सुरू ः सदाभाऊ खोत
साखरेला ३५०० रुपये दर देण्यासाठी प्रयत्न सुरू ः सदाभाऊ खोत

कुंडल, जि. सांगली : शेतकऱ्यांना उसाला योग्य भाव देण्यासाठी साखरेला किमान ३ हजार पाचशे रुपये दर देण्यासाठी कारखान्यांची मागणी आहे. त्या दृष्टीने मी प्रयत्न करत आहे, असे मत राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले ते कुंडल (ता. पलूस) येथे क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्यावरती शेतकऱ्यांना १०१ ट्रॅक्टर वितरण प्रसंगी बोलत होते.

या वेळी क्रांती कारखान्याचे अध्यक्ष अरुणअण्णा लाड, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिह देशमुख, जिल्हा परिषद सदस्य शरद लाड, क्रांती दूध संघाचे अध्यक्ष किरण लाड आदी प्रमुख उपस्थिती होते.

या परिसरात महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखानदारी मुळे कायापालट झाला आहे, काही सहकारी साखर कारखाने राजकीय अड्डे झाले आहेत. परंतु, त्यांचे भवितव्य बिकट आहे. आज ही सहकार चळवळ क्रांतिअग्रणी सारख्या कारखान्यांमुळे टिकून आहे. राज्याच्या साखर उताऱ्या पेक्षा एकट्या सांगली जिल्ह्याचा उतारा जास्त आहे, कारण येथील वातावरण ऊस शेतीसाठी अनुकूल आहे, साखरेची किंमत जागतिक बाजारात ठरते, त्यामुळे शेतकऱ्यांनी जागतिक बाजारपेठेचा अभ्यास करणे आवश्यक आहे.

इंधनाच्या आयात कारणासाठी बरेच चलन खर्ची पडते, क्रूड ऑइल आयातवर खर्च करण्यापेक्षा देशात साखर कारखान्यातून इथेनॉल निर्मितीसाठी चालना देण्यासाठी पाऊले उचलली आहेत आणि भविष्यात इंधनामध्ये जास्तीत जास्त इथेनॉल मिसळून चलन वाचवण्याचा प्रयत्न चालू केला आहे. आजवर १७ हजार कोटींची कर्जमाफी केली आहे, नैसर्गिक आपत्तीसाठी १६ हजार कोटींचा निधी दिला आहे, अनेक सिंचन योजना फक्त घोषणांमध्ये अडकून पडल्या होत्या. त्या कार्यान्वित करण्यासाठी ४० हजार कोटी रुपये निधी खर्च केला आहे.

या वेळी अरुणअण्णा लाड म्हणाले, शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त यांत्रिकीकरणाचा उपयोग करून शेती करावी, आज इंधनामध्ये जेवढे इथेनॉल वापरण्यासाठी शासनाने आदेश दिले आहेत तेवढे इंधन कंपन्या वापरात नाहीत, ते वापरण्यासाठी शासनाने त्यांना बंधन घालावे. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक क्रांती दूध संघाचे अध्यक्ष किरण लाड यांनी केले. सूत्रसंचालन श्रीकांत माने यांनी केले. तर कुंडलिक एडके यांनी आभार मानले.

या कार्यक्रमासाठी तहसीलदार राजेंद्र पोळ, मानसिंग उद्योग समूहाचे प्रमुख जे. के. बापू जाधव, संदीप पाटील, सर्जेराव पवार, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बडेकर, योगेश लाड, कृषी विभागाचे अधिकारी, यांच्यासह बहुतांश शेतकरी उपस्थित होते.

अरुणअण्णांना चळवळीचा वारसा आहे. त्यामध्येच ते घडले आहेत. ते नेहमी समाज कारण करत असतात, त्यामुळे त्यांनी मला कधीही हाक मारावी, त्या वेळी मी नक्की मदत करेन. - सदाभाऊ खोत, राज्यमंत्री

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com