मंडल अधिकाऱ्यावर पेट्रोल टाकून जिवे मारण्याचा प्रयत्न

मंडल अधिकाऱ्यावर पेट्रोल टाकून जिवे मारण्याचा प्रयत्न
मंडल अधिकाऱ्यावर पेट्रोल टाकून जिवे मारण्याचा प्रयत्न

सांगोला : ‘अवैध वाळूचा पकडलेला ट्रॅक्‍टर सोडून द्या’ असे म्हणत मंडल अधिकारी व कर्मचाऱ्यावर पेट्रोल टाकून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांविरुद्ध आज गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हाही दाखल केला आहे. मात्र, वाळूसह ट्रॅक्‍टर घेऊन ते पसार झाले.

गुरुवारी (ता. ५) रात्री पावणेनऊच्या सुमारास हणमंतगाव व लोणविरे गावादरम्यान काशीद वस्तीजवळ अवैध वाळू वाहतूक करणारा बिननंबरचा ट्रॅक्‍टर वाळू भरलेल्या ट्रॉलीसह फिर्यादी मंडल अधिकारी दत्तात्रय मल्लिकार्जुन कांबळे व कर्मचाऱ्यांनी पकडला. तो कारवाईसाठी सांगोला तहसील कार्यालयाकडे घेऊन येत असताना तिघेजण मोटरसायकलवरून आले. त्यांनी ‘तुम्ही ट्रॅक्‍टर कसे घेऊन जाता तेच बघतो’ असे म्हणून शिवीगाळ व दमदाटी सुरू केली. सोबत आणलेल्या बाटलीमधील पेट्रोल ट्रॅक्‍टर व ट्रॅक्‍टरमधील कर्मचाऱ्यांच्या अंगावर टाकून ‘ट्रॅक्‍टरसह तुम्हाला जाळून टाकतो’ अशी धमकी दिली. त्यानंतर वाळूने भरलेला ट्रॅक्‍टर घेऊन ते पळून गेले.

शासकीय कामात अडथळा आणला म्हणून संशयित आरोपी ट्रॅक्‍टर मालक नितीन अरुण पाटील, दादासाहेब बागल, संभाजी दादासाहेब काशीद (सर्व राहणार सोनंद, ता. सांगोला) यांच्याविरुद्ध सांगोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com