agriculture news in marathi, TS University and SIILC goes on Educational contract | Agrowon

टीस विद्यापीठ-एसआयआयएलसी शैक्षणिक करार
टीम अॅग्रोवन
रविवार, 18 मार्च 2018

पुणे : शैक्षणिक क्षेत्रातील नामांकित टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स (टीस) विद्यापीठ आणि कौशल्य, उद्योजकता प्रशिक्षणांचे आयोजन करणाऱ्या सिमॅसेस इंटरनॅशनल इंटरडिसीप्लिनरी लर्निंग सेंटर (एसआयआयएलसी) यांच्यादरम्यान एक वर्षाच्या ‘पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन अॅग्री बिजनेस मॅनेजमेंट’ या विशेष अभ्यासक्रमासाठी खास शैक्षणिक करार करण्यात आला. या करारामुळे इंडस्ट्री आणि विद्यार्थ्यांमधील दरी कमी होऊन अभ्यासक्रमाच्या सुरवातीपासूनच विद्यार्थ्यांना थेट इंडस्ट्रींसोबत काम करण्याचा अनुभव; तसेच टीस विद्यापीठाची पदवी मिळविण्याची संधीसुद्धा उपलब्ध होणार आहे.

पुणे : शैक्षणिक क्षेत्रातील नामांकित टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स (टीस) विद्यापीठ आणि कौशल्य, उद्योजकता प्रशिक्षणांचे आयोजन करणाऱ्या सिमॅसेस इंटरनॅशनल इंटरडिसीप्लिनरी लर्निंग सेंटर (एसआयआयएलसी) यांच्यादरम्यान एक वर्षाच्या ‘पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन अॅग्री बिजनेस मॅनेजमेंट’ या विशेष अभ्यासक्रमासाठी खास शैक्षणिक करार करण्यात आला. या करारामुळे इंडस्ट्री आणि विद्यार्थ्यांमधील दरी कमी होऊन अभ्यासक्रमाच्या सुरवातीपासूनच विद्यार्थ्यांना थेट इंडस्ट्रींसोबत काम करण्याचा अनुभव; तसेच टीस विद्यापीठाची पदवी मिळविण्याची संधीसुद्धा उपलब्ध होणार आहे.

भारतातील अव्वल श्रेणीतील अग्रगण्य टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स विद्यापीठ (टीस) गेल्या ५३ वर्षांपासून उच्च दर्जाचे शिक्षण प्रदान करणारे विद्यापीठ आहे. सकाळ माध्यम समूह एसआयआयएलसीच्या माध्यमातून विविध कौशल्य क्षेत्रातील अभ्यासक्रम प्रदान करत आहे. आतापर्यंत २०,००० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी एसआयआयएलसीच्या माध्यमातून त्यांचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. कृषी क्षेत्राशी निगडित खते, बी-बियाणे, कीडनाशके, इरिगेशन, टिश्‍यूकल्चर, यंत्रे-अवजारे इ. इंडस्ट्रींना कुशल मनुष्यबळ लागते. कौशल्य (स्किल्स) असणाऱ्या विद्यार्थ्यांना या इंडस्ट्रीमध्ये चांगल्या पगाराच्या नोकऱ्याही उपलब्ध आहेत.

या इंडस्ट्रीला लागणारे उमेदवार घडविणारा "ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट'' हा खास अभ्यासक्रम असून त्याची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. ॲग्रीकल्चर वा अन्य कोणत्याही विषयांतील पदवीधर विद्यार्थी ज्यांना ॲग्रीकल्चर सेक्टरमध्ये बिझनेस वा करिअर करायचे आहे इ.यात प्रवेश घेऊ शकतात. ज्या विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्रात नोकरी व व्यवसाय करायचा आहे, त्यांच्यासाठी हा एक वर्षाचा खास अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. यात अधिक वेळ प्रात्यक्षिकांवर भर दिला जाणार आहे. ‘ऑन द जॉब ट्रेनिंग’ म्हणजे अभ्यासक्रमादरम्यान इंडस्ट्रींमध्ये काम करण्याचा अनुभव मिळविणे हे अनिवार्य असणार आहे. यामुळे विद्यार्थी पहिल्या दिवसापासूनच कृषी उद्योगात काम करण्यासाठी पूर्णपणे तयार होऊ शकतील.

हा अभ्यासक्रम आंतरराष्ट्रीय पातळीच्या मानकावर आधारित असून, या अभ्यासक्रमात कृषी व सलंग्न विषयांचा सखोल समावेशासह ६८० तासांचे व्यावसायिक प्रशिक्षणसुद्धा देण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमाचे मूल्यांकन टीस विद्यापीठासोबतच उद्योगातील तज्ज्ञाकडून केले जाणार आहे. या अभ्यासक्रमाचे नोंदणी अर्ज एसआयआयएलसीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अभ्यासक्रमाबाबत अधिक माहिती हवी असल्यास संपर्क : ९१४६०३८०३२.

  • ‘पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ॲग्री बिजनेस मॅनेजमेंट’ हा एक वर्षाचा अभ्यासक्रम
  • टीस विद्यापीठाची पदवी मिळविण्याची संधी
  • विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमांतर्गत थेट इंडस्ट्रींमध्ये कामाची संधी
  • अभ्यासक्रमासाठी नावनोंदणी सुरू
  • संपर्क :
    वेबसाईट : www.siilc.edu.in  
    मोबाईल : ९१४६०३८०३२

इतर ताज्या घडामोडी
सुधारित सोयाबीन आंतरपीक पद्धती राज्यामध्ये सोयाबीनच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ...
नत्र स्थिरीकरणावर परिणाम करणारे घटक गेल्या भागापासून आपण मार्टीन ॲलेक्झांडर यांच्या...
पशुपालनातील मिथेन उत्सर्जन कमी करणे...मिथेनचे कमी उत्सर्जन करणाऱ्या गायींची पैदास करणे...
गिरणा नदीवरील बलून बंधाऱ्यांसाठी आर्थिक...जळगाव ः जिल्ह्यातील सतत दुष्काळाशी झगडणाऱ्या...
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलेरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच...
गोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर...चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे....
नाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी...नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी...
पेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत...नाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन...
जळगावात लाल कांद्याचे दर आणि आवक टिकूनजळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये...
नाशिकमध्ये हिरवी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक ः नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
पुणे, नगर जिल्ह्यात पावसाअभावी चारा...पुणे  : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण...
`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...
आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई   : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...
नवती केळी दरात सुधारणाजळगाव  ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...
रत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी   ः जिल्ह्यात उशिरा पण...
रत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
नगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर  ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...
नाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...
दक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...
सांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...