तुबची-बबलेश्वरच्या पाण्याचे मृगजळच

तुबची-बबलेश्वरच्या पाण्याचे मृगजळच
तुबची-बबलेश्वरच्या पाण्याचे मृगजळच

सांगली : जत तालुक्याच्या पूर्व भागातील बहुचर्चित व राजकीय गर्तेत अडकलेली कर्नाटकातील तुबची-बबलेश्वर योजना म्हणजे मृगजळच ठरत आहे. या पाणी योजनेच्या प्रतीक्षेत तालुक्यातील ६५ गावे अद्यापही तहानलेलीच आहेत.

तुबची-बबलेश्वर या योजनेसाठी महाराष्ट्र व कर्नाटक राज्याचे शासन सकारात्मक आहे; परंतु ही सकारात्मकता अद्यापही सत्यात उतरताना दिसत नाही. ही योजना अगदी कमी वेळात, कमी खर्चात पूर्ण होईल. महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांच्या सीमावर्ती भागात अवघ्या पाच ते सात किलोमीटवर अंतरावर आहे.

तुबची-बबलेश्वर पाणीयोजनेतून बाबानगर, कनमडी, ते सुमद्रहट्टीपर्यंत आले आहे. नैसर्गिक उतारानाने हे पाणी भिवर्गी, तिकोंडी, पांडोझरी, जालिहाळ बुद्रुक, सिध्दनाथ, संख दोड्डानाल्ला मध्यम प्रकल्प, धुळकरवाडी, मोटेवाडी येथील तलाव व बंधारे भरून घेता येणे शक्य आहे. त्यातून ३० हजार एकर शेती ओलिताखाली येईल. 

अनेक राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चेचा विषय बनविला आहे. घोषणा न करता पाणी द्या, अशी एकच मागणी जनतेतून होत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जनतेची दिशाभूल करण्याचा घाट घातला जात का आहे, असा सवाल नागरिकांकडून होत आहे.

जत पूर्व भागात अनेक छोट्या मोठ्या योजना खेटून गेल्या आहेत. यात तुबची-बबलेश्वर, उजनीचे पाणी मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती या गावापर्यंत आले आहे. ही योजना उमदी गावापासून केवळ दहा किलोमीटर अंतराजवळ आहे. ज्याप्रमाणे जत तालक्यातील आतापर्यंत ४० गावांत फिरवले आहे त्याच धर्तीवर या योजनेचा पाठपुरावा करावा, अशी मागणी आहे.

बोर नदीतून अनेक गावांना फायदा

जत तालुक्याच्या पूर्व भागात बोर नदीत पाणी सोडल्यास अनेक गावांना याचा फायदा होऊ शकतो. ही नदी नेहमीच कोरडी असते. या नदीत पाणी सोडल्यास धुळकरवाडी ते संख मध्य प्रकल्पात पाणी येऊ शकते. या प्रकल्पातून बेंळोगडी, बालगाव, हळ्ळी, बोर्गी बुद्रुक, बोर्गी खुर्द करजणीसह इतर गावांना फायदा होईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com