ढगाळ वातावरणामुळे तूर पीक संकटात

गत तीन-चार दिवसांपासून सतत ढगाळ वातावरण असल्याने बहरात असलेल्या तुरीच्या पिकावर संकटाचे ढग अधिक गडद झाले आहेत.
ढगाळ वातावरणामुळे तूर पीक संकटात
ढगाळ वातावरणामुळे तूर पीक संकटात

औरंगाबाद : गत तीन-चार दिवसांपासून सतत ढगाळ वातावरण असल्याने बहरात असलेल्या तुरीच्या पिकावर संकटाचे ढग अधिक गडद झाले आहेत. तुरीवर शेंग माशी व शेंगा पोखरणारी अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने  शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. मराठवाड्यात तुरीचे सर्वसाधारण क्षेत्र ४ लाख ९७ हजार ६०० हेक्‍टर आहे. त्या तुलनेत प्रत्यक्षात ४ लाख ७० हजार ४७० हेक्टरवर तुरीची पेरणी झाली आहे. तुरीचे आगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लातूर, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत सर्वसाधारण क्षेत्रावर लागवड झालेली नाही. गत तीन चार दिवसांपासून सततचे ढगाळ वातावरण तुरीच्या पिकावर कीड-रोगांना आमंत्रण देणारे ठरते आहे.  सध्या तुरीवर शेंग माशी आणि शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसतो आहे. कीड, रोगांना पोषक वातावरण आणखी काही दिवस कायम राहिल्यास नुकसान वाढण्याची भीती आहे. रासायनिक कीटकनाशकांची फवारणी पट्टा पद्धतीने अथवा खंड पद्धतीने केल्यास परोपजीवी कीटकांच्या संवर्धनास मदत होते. कीडनाशकांची फवारणी करताना स्वतःच्या सुरक्षेची खबरदारी घ्यावी, असा सल्लाही वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभागाने दिला आहे.

प्रतिक्रिया शेंग माशी आणि शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्याने शिफारशीत कीडनाशकांचा वापर करावा. फवारणी करताना सुरक्षेची खबरदारी घ्यावी. शक्य असल्यास पिकाला पाण्याची एक पाळी द्यावी. - डॉ. किशोर झाडे, कार्यक्रम समन्वयक, कृषी विज्ञान केंद्र, औरंगाबाद

तुरीचे जिल्हानिहाय क्षेत्र (हेक्टर) औरंगाबाद ः ३०२८८.४०  जालना ः ५०३३४.८५  बीड ः ६१३०८  लातूर ः ८८९२०  उस्मानाबाद ः ७६६४३  परभणी ः ४६२७४  हिंगोली ः ४४६३९  नांदेड ः ७२०६३  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com