agriculture news in Marathi tur crop under threat due to cloudy weather Maharashtra | Agrowon

ढगाळ वातावरणामुळे तूर पीक संकटात

टीम अॅग्रोवन
शनिवार, 21 नोव्हेंबर 2020

गत तीन-चार दिवसांपासून सतत ढगाळ वातावरण असल्याने बहरात असलेल्या तुरीच्या पिकावर संकटाचे ढग अधिक गडद झाले आहेत.

औरंगाबाद : गत तीन-चार दिवसांपासून सतत ढगाळ वातावरण असल्याने बहरात असलेल्या तुरीच्या पिकावर संकटाचे ढग अधिक गडद झाले आहेत. तुरीवर शेंग माशी व शेंगा पोखरणारी अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने  शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

मराठवाड्यात तुरीचे सर्वसाधारण क्षेत्र ४ लाख ९७ हजार ६०० हेक्‍टर आहे. त्या तुलनेत प्रत्यक्षात ४ लाख ७० हजार ४७० हेक्टरवर तुरीची पेरणी झाली आहे. तुरीचे आगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लातूर, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत सर्वसाधारण क्षेत्रावर लागवड झालेली नाही. गत तीन चार दिवसांपासून सततचे ढगाळ वातावरण तुरीच्या पिकावर कीड-रोगांना आमंत्रण देणारे ठरते आहे. 

सध्या तुरीवर शेंग माशी आणि शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसतो आहे. कीड, रोगांना पोषक वातावरण आणखी काही दिवस कायम राहिल्यास नुकसान वाढण्याची भीती आहे. रासायनिक कीटकनाशकांची फवारणी पट्टा पद्धतीने अथवा खंड पद्धतीने केल्यास परोपजीवी कीटकांच्या संवर्धनास मदत होते. कीडनाशकांची फवारणी करताना स्वतःच्या सुरक्षेची खबरदारी घ्यावी, असा सल्लाही वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभागाने दिला आहे.

प्रतिक्रिया
शेंग माशी आणि शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्याने शिफारशीत कीडनाशकांचा वापर करावा. फवारणी करताना सुरक्षेची खबरदारी घ्यावी. शक्य असल्यास पिकाला पाण्याची एक पाळी द्यावी.
- डॉ. किशोर झाडे, कार्यक्रम समन्वयक, कृषी विज्ञान केंद्र, औरंगाबाद

तुरीचे जिल्हानिहाय क्षेत्र (हेक्टर)
औरंगाबाद ः
३०२८८.४० 
जालना ः ५०३३४.८५ 
बीड ः ६१३०८ 
लातूर ः ८८९२० 
उस्मानाबाद ः ७६६४३ 
परभणी ः ४६२७४ 
हिंगोली ः ४४६३९ 
नांदेड ः ७२०६३
 


इतर बातम्या
खानदेशात सव्वा लाख हेक्टरवर पेरणीजळगाव : खानदेशात मक्याची लागवड सुरूच आहे. रब्बी...
परभणी जिल्ह्यात कापूस विक्रीच्या...परभणी : ‘‘राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन...
नाशिक विभागात रोज एक लाख टन उसाचे गाळपनगर  ः नाशिक विभागातील ३२ पैकी २५ साखऱ...
औरंगाबाद, नगर जिल्ह्यात कापसाची ३४ हजार...औरंगाबाद : राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाच्या...
कृषी कायद्यांविरोधात साताऱ्यात धरणेसातारा : शेतकरी विरोधी कायदे मागे घेण्यासाठी...
साखरेची ‘एमएसपी’पेक्षा कमी किमतीने मागणीकोल्हापूर : देशांतर्गत बाजारात साखरेची विक्री...
जालना जिल्ह्यात दहा हजार क्‍विंटलवर...जालना : ‘‘जिल्ह्यात मक्याची किमान आधारभूत...
काजू उत्पादकांना दिलासामुंबई : महाविकास आघाडी सरकारने राज्यातील काजू...
का येताहेत चक्रीवादळे? भारताच्या पूर्व भागात असलेला बंगालचा उपसागर,...
कृषी कायद्यांविरोधात राज्यात...पुणे ः केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी आणि पणन...
किसान समन्वय समितीचा अकोले येथे मोर्चा नगर ः केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांना...
महिनाभर जमीन आरोग्य सुधार अभियानऔरंगाबाद : जमिनीच्या सुपीकतेवर भर देण्याची गरज...
दक्षिण भारतात मुसळधार पाऊसपुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेले बुरेवी...
खत विक्रीत वाढपुणे : देशात कोविड १९ ची समस्या तसेच लॉकडाउन...
राज्यात सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग...मुंबई : राज्यात पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया...
कृषी प्रवेशासाठी सीईटीचा निकाल जाहीरपुणे : महाराष्ट्र शासनाच्या ‘स्टेट कॉमन...
बहिरम यात्रा अखेर रद्दअमरावती : लाखो भाविकांचे कुलदैवत आणि विदर्भात...
महाद्वार काल्याने कार्तिकी यात्रेची...सोलापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात...
विधान परिषदेच्या सहा जागांचा आज निकालमुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या तीन पदवीधर,...
सरसकट पीकविम्यासाठी महाजनआंदोलन उभारणारनांदेड : खरिपातील पिकांचा सरसकट विमा...