agriculture news in marathi, tur, gram procurement issue, nagar, maharashtra | Agrowon

नगर जिल्ह्यात तूर, हरभरा खरेदीसाठी हवा दोन लाख बारदाना
टीम अॅग्रोवन
शनिवार, 5 मे 2018

नगर  ः तूर खरेदीला मुदतवाढ दिल्यानंतरही तूर खरेदीला फारसा वेग आलेला दिसत नाही. मुदतवाढीनंतर २०० शेतकऱ्यांकडून अवघी दोन हजार क्विंटल तूर खरेदी झाली आहे. जिल्ह्यामध्ये तूर व हरभरा खरेदीसाठी दोन लाख बारदाना गोण्यांची गरज आहे. मात्र, अजून बारदाना उपलब्ध झालेला नसल्याने खरेदीच्या अडचणीत भर पडत असल्याचे खरेदी केंद्रावरून सांगण्यात आले.

नगर  ः तूर खरेदीला मुदतवाढ दिल्यानंतरही तूर खरेदीला फारसा वेग आलेला दिसत नाही. मुदतवाढीनंतर २०० शेतकऱ्यांकडून अवघी दोन हजार क्विंटल तूर खरेदी झाली आहे. जिल्ह्यामध्ये तूर व हरभरा खरेदीसाठी दोन लाख बारदाना गोण्यांची गरज आहे. मात्र, अजून बारदाना उपलब्ध झालेला नसल्याने खरेदीच्या अडचणीत भर पडत असल्याचे खरेदी केंद्रावरून सांगण्यात आले.

जिल्ह्यात गेल्या अडीच ते तीन महिन्यांपासून दहा खरेदी केंद्रांवर तूर खरेदी सुरू आहे. १८ एप्रिलला तूर खरेदी बंद केली होती. तोपर्यंत ११ हजार ५४० शेतकऱ्यांची सुमारे ६२ कोटी रुपये किमतीची एक लाख १३ हजार ७३८ क्विंटल तूर खरेदी झाली होती. त्या वेळी १६ हजार ९३ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केलेली असल्याने चार हजार६५३ शेतकरी तूर विक्रीच्या प्रतीक्षेत होते.

तूर खरेदीस मुदत वाढ दिल्यानंतर खरेदीला पुन्हा सुरवात झाली. मात्र, खरेदीसमोरील अडचणी संपायला तयार नाहीत. मुदतवाढ मिळून आता जवळपास १५ दिवसांचा कालावधी संपला आहे. १५ मेपर्यंत तूर खरेदी सुरू राहणार आहे, मात्र जिल्ह्यामध्ये गेल्या पंधरा दिवसांत अवघ्या २०० शेतकऱ्यांकडून दोन हजार क्विंटल तूर खरेदी झाल्याचे दिसत आहे.

जिल्हाभरात झालेली नोंदणी आणि एकंदर अंदाजानुसार अजून साधारण एक लाख क्विंटल तूर-हरभरा खरेदी होण्याचा मार्केटिंग फेडरेशनचा अंदाज आहे. त्यानुसार नियोजन केले जात असले तरी आता खरेदीला बारदान्याची अडचण आहे. सध्या जवळपास सात ते आठ केंद्रांवर बारदाना उपलब्ध नसल्याने खरेदी थंडावली आहे.

राज्य खाद्य निगम महामंडळाकडे दोन लाख गोण्यांची मागणी केली आहे. मात्र, बारदाना उपलब्ध झालेला नव्हता. जिल्ह्यात अजून साधारण २५ हजार क्विंटल तूर खरेदी अपेक्षित आहे. आतापर्यंत तेरा केंद्रांवर हरभरा खरेदी चालू आहे. जवळपास ७० हजार क्विंटल हरभरा खरेदी झाला आहे. अजून हरभऱ्याची साधारण पन्नास ते साठ हजार क्विंटलच्या जवळपास खरेदी अपेक्षित आहे. मात्र, मुदतवाढ मिळून तूर खरेदीचे शुक्‍लकाष्ट काही संपायला तयार नाही.

मुदतवाढीमुळे तूर खरेदी १५ मेपर्यंत सुरू राहणार आहे. बारदाना मिळावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. हरभऱ्याचीही आवश्‍यक तेवढी खरेदी होणार आहे. तूर-हरभरा खरेदीसाठी बारदान्याची मागणी केलेली आहे, असे मार्केटिंग फेडरेशनचे अधिकारी भारत पाटील यांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली...औरंगाबाद  : मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर...
सांगली जिल्ह्यात पावसाची उघडीपसांगली ः जिल्ह्यात जून आणि जुलैमध्ये झालेल्या...
कंडारी पाणी योजनेतील गैरव्यवहारप्रकरणी...जळगाव ः कंडारी (ता. भुसावळ) येथील ग्राम...
शेततळ्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित...नागपूर ः विकासाच्या संकल्पनांमध्ये रस्ते, नाले व...
सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागातील शेती...सातारा : जिल्ह्यात पश्चिमेकडे दमदार पाऊस, तर...
कापसाच्या हमीभावात ५०० रुपयांनी वाढ...अमरावती   ः राज्याची कमी असलेली कापूस...
दमदार पावसाअभावी पुणे जिल्ह्यातील पूर्व...पुणे  ः जिल्ह्याच्या पूर्व भागातील शिरूर,...
नगर जिल्ह्यात ऐन पावसाळ्यातही...नगर  ः दुष्काळाने होरपळ झालेल्या नगर...
पावसाअभावी धुळे, जळगाव जिल्ह्यांत...जळगाव  ः खानदेशात सुरवातीला पावसाने जोरदार...
नागपूर विभागात पावसाअभावी पिकांची वाढ...नागपूर  ः निम्मा जुलै महिना संपत आला असतानाच...
सांगलीत हळद प्रतिक्विंटल ६००० ते ८९००...सांगली ः येथील बाजार समितीत हळदीची आवक कमी झाली...
भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत...मुंबई  : भाजपचे ज्येष्ठ नेते, मंत्री...
सुधारित सोयाबीन आंतरपीक पद्धती राज्यामध्ये सोयाबीनच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ...
नत्र स्थिरीकरणावर परिणाम करणारे घटक गेल्या भागापासून आपण मार्टीन ॲलेक्झांडर यांच्या...
पशुपालनातील मिथेन उत्सर्जन कमी करणे...मिथेनचे कमी उत्सर्जन करणाऱ्या गायींची पैदास करणे...
गिरणा नदीवरील बलून बंधाऱ्यांसाठी आर्थिक...जळगाव ः जिल्ह्यातील सतत दुष्काळाशी झगडणाऱ्या...
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलेरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच...
गोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर...चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे....
नाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी...नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी...
पेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत...नाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन...