नांदेड जिल्ह्यात पाच हजारावर शेतकऱ्यांना तूर, हरभऱ्याचे चुकारे

लॉकडाऊनमध्ये खरेदी आणि चुकारे अदा करण्याची प्रक्रिया सोबतच सुरु आहे. वखार महामंडळाने गोदामे उपलब्ध केल्यास शेतकऱ्यांना चुकारे अदा करण्याच्या प्रक्रियेत गती येईल. - सुधीर पाटील, जिल्हा पणन अधिकारी,नांदेड.
 tur`, grams payment gave to five thousand farmers in Nanded district
tur`, grams payment gave to five thousand farmers in Nanded district

नांदेड : किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गंत राज्य सहाकरी पणन महासंघाच्या सहा केंद्रांवर १९ हजार ८५ क्विंटल तूर खरेदी झाली. त्यासाठी ४ हजार २२५ शेतकऱ्यांना ११ कोटी ६ लाख ९४ हजार ६२४ रुपये दिले गेले. तसेच १७ हजार ९६ क्विंटल हरभऱ्याचे १ हजार २३ शेतकऱ्यांना ८ कोटी ३३ लाख ४४ हजार ७०६ रुपये दिले. असे एकूण ५ हजार २४८ शेतकऱ्यांना १९ कोटी ४० लाख ३९ हजार ३३० रुपयांचे चुकारे देण्यात आले, अशी माहिती जिल्हा पणन अधिकारी सुधीर पाटील यांनी दिली. 

नांदेड (अर्धापूर), हदगाव, किनवट, बिलोली, देगलूर, मुखेड येथील केंद्रावर सोमवार (ता.२५) पर्यंत ४ हजार ४३ शेतकऱ्यांची २० हजार ४० क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. त्यापैकी ४ हजार २२५ शेतकऱ्यांना १९ हजार ८५ क्विंटल तुरीचे ११ कोटी ६ लाख ९४ हजार ६२४ रुपयांचे चुकारे दिले गेले. अद्याप २०८ शेतकऱ्यांचे ९५५ क्विंटल तुरीचे ५५ लाख ४० हजार ५०८ रुपयांचे चुकारे येणे बाकी आहे. 

नांदेड (अर्धापूर), हदगाव, किनवट, बिलोली, देगलूर, मुखेड येथील केंद्रावर बुधवार (ता.२७) पर्यंत ३ हजार ३०५ शेतकऱ्यांचा ५७ हजार ४९० क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला. त्यांपैकी १ हजार २३ शेतकऱ्यांना १७ हजार ९६ क्विंटल हरभऱ्याचे ८ कोटी ३३ लाख ४४ हजार ७०६ रुपयांचे चुकारे दिले आहेत. अजून २ हजार २८२ शेतकऱ्यांचे ४० हजार ३९३ क्विंटल हरभऱ्याचे १९ कोटी ६९ लाख २ हजार १८ रुपयांचे चुकारे येणे बाकी आहेत.  केंद्रनिहाय तूर स्थिती 

केंद्र तूर (क्विंटल) शेतकरी संख्या चुकारे रक्कम (कोटी) 
नांदेड ३१५५ ५१६ १.८३०३०६० 
हदगाव ४४५१ १४३४ २.५८१८७०० 
किनवट ४६८० ९९४ २.७१४४००० 
बिलोली ३८९ ६२ ०.२२६१६५२ 
देगलूर ११११ १३९ ०.६४४६७०० 
मुखेड ५२९६ ५२६ १.८३०३ 

केंद्रनिहाय हरभरा स्थिती 

केंद्र हरभरा (क्विंटल) शेतकरी संख्या चुकारे रक्कम (कोटी) 
नांदेड ५९८३ ३७५ २.९१६९५६२ 
हदगाव २६५५ १४४ १.२९४५५६२ 
किनवट १८१२ ११८ ०.८८३७६४३ 
बिलोली २३९८ १४५ १.१६९०२५० 
देगलूर ३३१९ १८९ १.६१८०१२५ 
मुखेड ९२७ ५२ ०.४५२१५६२   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com