Agriculture news in marathi tur`, grams payment gave to five thousand farmers in Nanded district | Agrowon

नांदेड जिल्ह्यात पाच हजारावर शेतकऱ्यांना तूर, हरभऱ्याचे चुकारे

टीम अॅग्रोवन
सोमवार, 1 जून 2020

लॉकडाऊनमध्ये खरेदी आणि चुकारे अदा करण्याची प्रक्रिया सोबतच सुरु आहे. वखार महामंडळाने गोदामे उपलब्ध केल्यास शेतकऱ्यांना चुकारे अदा करण्याच्या प्रक्रियेत गती येईल. 
- सुधीर पाटील, जिल्हा पणन अधिकारी, नांदेड. 

नांदेड : किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गंत राज्य सहाकरी पणन महासंघाच्या सहा केंद्रांवर १९ हजार ८५ क्विंटल तूर खरेदी झाली. त्यासाठी ४ हजार २२५ शेतकऱ्यांना ११ कोटी ६ लाख ९४ हजार ६२४ रुपये दिले गेले. तसेच १७ हजार ९६ क्विंटल हरभऱ्याचे १ हजार २३ शेतकऱ्यांना ८ कोटी ३३ लाख ४४ हजार ७०६ रुपये दिले. असे एकूण ५ हजार २४८ शेतकऱ्यांना १९ कोटी ४० लाख ३९ हजार ३३० रुपयांचे चुकारे देण्यात आले, अशी माहिती जिल्हा पणन अधिकारी सुधीर पाटील यांनी दिली. 

नांदेड (अर्धापूर), हदगाव, किनवट, बिलोली, देगलूर, मुखेड येथील केंद्रावर सोमवार (ता.२५) पर्यंत ४ हजार ४३ शेतकऱ्यांची २० हजार ४० क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. त्यापैकी ४ हजार २२५ शेतकऱ्यांना १९ हजार ८५ क्विंटल तुरीचे ११ कोटी ६ लाख ९४ हजार ६२४ रुपयांचे चुकारे दिले गेले. अद्याप २०८ शेतकऱ्यांचे ९५५ क्विंटल तुरीचे ५५ लाख ४० हजार ५०८ रुपयांचे चुकारे येणे बाकी आहे. 

नांदेड (अर्धापूर), हदगाव, किनवट, बिलोली, देगलूर, मुखेड येथील केंद्रावर बुधवार (ता.२७) पर्यंत ३ हजार ३०५ शेतकऱ्यांचा ५७ हजार ४९० क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला. त्यांपैकी १ हजार २३ शेतकऱ्यांना १७ हजार ९६ क्विंटल हरभऱ्याचे ८ कोटी ३३ लाख ४४ हजार ७०६ रुपयांचे चुकारे दिले आहेत. अजून २ हजार २८२ शेतकऱ्यांचे ४० हजार ३९३ क्विंटल हरभऱ्याचे १९ कोटी ६९ लाख २ हजार १८ रुपयांचे चुकारे येणे बाकी आहेत. 

केंद्रनिहाय तूर स्थिती 

केंद्र तूर (क्विंटल) शेतकरी संख्या चुकारे रक्कम (कोटी) 
नांदेड ३१५५ ५१६ १.८३०३०६० 
हदगाव ४४५१ १४३४ २.५८१८७०० 
किनवट ४६८० ९९४ २.७१४४००० 
बिलोली ३८९ ६२ ०.२२६१६५२ 
देगलूर ११११ १३९ ०.६४४६७०० 
मुखेड ५२९६ ५२६ १.८३०३ 

केंद्रनिहाय हरभरा स्थिती 

केंद्र हरभरा (क्विंटल) शेतकरी संख्या चुकारे रक्कम (कोटी) 
नांदेड ५९८३ ३७५ २.९१६९५६२ 
हदगाव २६५५ १४४ १.२९४५५६२ 
किनवट १८१२ ११८ ०.८८३७६४३ 
बिलोली २३९८ १४५ १.१६९०२५० 
देगलूर ३३१९ १८९ १.६१८०१२५ 
मुखेड ९२७ ५२ ०.४५२१५६२ 
 

 


इतर बातम्या
कृषी आयुक्त दिवसेंची बदली, गायकवाड...मुंबई : राज्य सरकारने शनिवारी महत्त्वपूर्ण...
कृषी निविष्ठा विक्रेत्यांना आरोपी नव्हे...पुणे : राज्यात खते, बियाणे, कीटकनाशकांची विक्री...
आनंदाची पातळी बदलतेय उत्पन्नांनुसारआजच्या जगामध्ये सामाजिक आर्थिक निकषांमध्ये वेगाने...
सजीव प्रजातींची सर्वमान्य यादी...पृथ्वीवरील सर्व ज्ञात प्रजातींची जागतिक पातळीवर...
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यात कृषी...औरंगाबाद : मागण्यांबाबत कार्यवाही होत नसल्याने...
परभणी जिल्ह्यात आधार प्रमाणिकरणाचे २९...परभणी : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
परभणी, नांदेड, हिंगोलीत निविष्ठा...परभणी : कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी विविध...
सांगली जिल्ह्यात खते, बियाण्यांच्या ६९...सांगली :‘कृषी विभागाने जिल्ह्यातील ६९ किटकनाशके,...
सांगली जिल्ह्यात दोन लाख १९ हजार हेक्‍...सांगली : जिल्ह्यात पावसांचा खंड असला तरी  ...
कोल्हापुरात दिड हजार, खते, बियाणे...कोल्हापूर  : बियाण्यांच्या उगवणीप्रश्नी...
विदर्भात दहा हजार कृषी केंद्रांना टाळेनागपूर : कृषी विक्रेत्यांच्या न्याय्य...
नाशिक जिल्ह्यात कृषी निविष्ठा...नाशिक : कृषी निविष्ठा विक्री केंद्रांवरील...
वऱ्हाडात कृषी विक्रेत्यांचा कडकडीत बंदअकोला : सोयाबीन बियाणे न उगवल्या प्रकरणी...
नाशिक जिल्ह्यात सोयाबीन बियाणे न...नाशिक : खरिपाच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाला....
राज्यात कृषी सेवा केंद्रांचा बंद सुरूपुणेः सोयाबीन बियाणे न उगवल्या प्रकरणी...
सोलापुरात कृषी सेवा केंद्रांचा बंद...सोलापूर : बियाणे उगवणीबाबत झालेल्या तक्रारीच्या...
शेती क्षेत्रातील बदल टप्याटप्याने...नागपूर ः शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत कृषी...
पुणे जिल्ह्यात कृषी सेवा केंद्रे बंदपुणे : महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टीसाईड्स...
‘जिल्हा परिषद, ग्रामपंचायत अधिकारी, ...मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
बेलखेडा होणार संत्रा उत्पादक गावरिसोड, जि. वाशीम ः तालुक्यातील दोन हजार लोकसंख्या...