agriculture news in marathi Tur needs Government MSP repurchase support | Page 2 ||| Agrowon

तुरीला हवा हमीभाव खरेदीचा आधार

वृत्तसेवा
बुधवार, 3 नोव्हेंबर 2021

मोठी आयात आणि नुकत्याच संपलेल्या साठामर्यादेमुळे दर दबावात होते. सध्या बाजारात तुरीला ५९०० ते ६२०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे.

पुणे : पुढील महिन्यापासून नवीन तुरीची बाजारात आवक सुरू होईल... यंदा तुरीच्या उत्पादनात १५ ते २० टक्क्यांपर्यंत घट आल्याचे विविध भागांतील शेतकऱ्यांनी सांगितले मात्र मोठी आयात आणि नुकत्याच संपलेल्या साठामर्यादेमुळे दर दबावात होते. सध्या बाजारात तुरीला ५९०० ते ६२०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. तूर उत्पादकांना चांगला दर मिळावा असे वाटत असेल, तर केंद्राने साठा मर्यादा लावू नये आणि हमीभावाने खरेदीला मान्यता द्यावी, अशी मागणी होत आहे.

सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसाने तुरीच्या पिकाला काही प्रमाणात फटका बसला. मात्र उत्पादनात किती घट येईल हे आताच सांगणे घाईचे ठरेल. पुढच्या महिन्यापासून बाजारात तुरीची आवक वाढेल. महाराष्ट्र आणि कर्नाटकात पिकाला फटका बसला, तरी सध्या मालाची गुणवत्ता टिकून आहे. मात्र नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात हवामान विभागाने देशातील तूर उत्पादक पट्ट्यांत पावसाचा अंदाज दिल्याने शेतकरी काहीसे चिंतेत आहेत. 

पुढील महिन्यापासून बाजारात नवीन तुरीची आवक सुरू होणार आहे. जानेवारी महिन्यापासून तुरीच्या आवकेत मोठी वाढ होईल. त्यामुळे उपलब्ध वाढणार आहे. तुरीची आवक सुरू झाल्यानंतर पुरवठा वाढून दरावर दबाव येण्याची शक्यता लक्षात घेऊन व्यापारी आणि स्टॉकिस्ट साठ्यातील माल बाजारात आणत आहेत... 

देशातील पीक हातात येण्याच्या काळात आयातही मोठ्या प्रमाणात होत आहे. या आयात केलेल्या तुरीमुळेच दिवाळीसारखा महत्त्वाचा सण असूनही तुरीसह इतर डाळींचे दरबावात आहेत. परिणामी, कडधान्याचे दरही हमीभावाच्या आसपास आहेत. तुरीच्या डाळीचा व्यापारही सुस्त पडलेला दिसतोय... आफ्रिकेतील देशांतून तुरीची आयात वाढल्याने बंदरांवर साठा वाढताना दिसतोय... तर नवीन वर्षात म्यानमारमधून तुरीची आयात वाढण्याची भीती व्यापारी सूत्रांनी व्यक्त केलीय... 

हमीभावाने खरेदी आवश्यक
सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांमुळे बाजारात कडधान्य दर दबावात असतानाच नवीन हंगामातील तूर बाजारात येतेय. त्यातच आयात माल मोठ्या प्रमाणात असल्याने दर हमीभाव किंवा हमीभावाच्याही खाली राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने हमीभावाने खरेदी करणे गरजेचे आहे. यंदा केंद्र सरकारने तुरीसाठी ६ हजार ३०० रुपये हमीभाव जाहिर केला आहे. गेल्या हंगामात तुरीचे दर हमीभावाच्या दरम्यान राहिले. परंतु यंदा केंद्राने मुक्त आयात, साठा मर्यादा लावल्याने दर दबावात आहेत. त्यामुळे यंदा तुरीला हमीभाव खरेदीचा आधार गरजेचा आहे. 

तूर पिकाचे १५ ते २० टकक्के नुकसान झाल्याचे विविध भागांतून रिपोर्ट येत आहेत. सध्या बाजारात तुरीला ६१०० ते ६२०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. नवीन हंगामात शेतकऱ्यांना चांगला दर द्यायचा असेल, तर केंद्राने पुन्हा साठामर्यादा लावू नये. सध्या बाजारात तुरीची डाळ ९० ते ९५ रुपये किलो मिळत आहे. पेट्रोल, डिझेल आणि इतर वस्तूंच्या तुलनेत अन्नधान्य आणि डाळींचे दर वाढलेले नाहीत. त्यामुळे सरकारने साठा मर्यादा लावू नये, अन्यथा व्यापारी कमी खरेदी करतील आणि दर पुन्हा दबावात येतील.
- अशोक अगरवाल, तूर व्यापारी, लातूर


इतर अॅग्रोमनी
तुरीचे दर स्थिरावले; नवीन तूर पुढील...पुणे : देशातील नवीन तूर डिसेंबरपासून बाजार येणार...
खानदेशात कापसाच्या खेडा खरेदी दरात वाढजळगाव : खानदेशात कापसाची किमान ८६०० व कमाल ९२००...
कापूस उत्पादक देशांमध्ये पुरवठा २०...जळगाव : जगात कापसाचा मोठा तुटवडा तयार होत आहे....
कंटेनर्सची टंचाई पुढील वर्षीही...पुणे : चालू वर्षीत शेतीमालासह इतर वस्तूंच्या...
धनत्रयोदशीला जळगावात ३० किलो सोने विक्रीजळगाव : जळगावची केळी व अस्सल सोन्यासाठी सुवर्ण...
जगभरात कापसाचे दर चढेच राहतीलपुणे : जागतिक कापूस वापरात होणारी वाढ, कमी शिल्लक...
तुरीला हवा हमीभाव खरेदीचा आधारपुणे : पुढील महिन्यापासून नवीन तुरीची बाजारात आवक...
दिवाळीमुळे हळदीला उठावपुणे : दिवाळीमुळे हळदीच्या मागणीत वाढ झाली आहे....
गुजरातमधून गुळाला मागणी वाढलीकोल्हापूर : यंदा गुजरातमधून गुळाला मागणी वाढत आहे...
खाद्यतेलाच्या दराऐवजी सोयाबीन दरात मोठी...पुणे : निवडणुका आणि सणांच्या पार्श्‍वभूमीवर...
मोदीजी, तुमच्यासारख्या व्यक्तीकडून ही...अहमदाबाद, गुजरात : खरिपातील तेलबिया बाजारात...
मागणीमुळे कापसाला यंदा दराची झळाळीपुणे : कोरोनानंतरच्या काळात वाढलेली मागणी आणि...
खाद्यतेलाच्या वाढत्या दरामुळे मोहरीच्या...पुणे : खाद्यतेलाच्या वाढत्या दर आणि...
देशांतर्गत कडधान्य उत्पादनवाढ गरजेचीपुणे : गेल्या तीन दशकांत कडधान्य लागवड आणि...
भारतीय साखरेसाठी यंदा ‘फिलगुड’गेल्या महिन्याच्या कालावधीत साखर उद्योगासाठी...
‘महानंद’ला बदनाम करण्याचे प्रयत्न : ...मुंबई : कोरोनाची भयंकर परिस्थिती असताना ‘महानंद’...
‘एम’ अध्यक्षपदी राजकुमार धुरगुडे पाटील...पुणे ः देशपातळीवर कृषी निविष्ठा निर्मिती...
भारतात होणारी सोयापेंड निर्यात...पुणे : भारत सरकारने जणुकीय सुधारित सोयापेंड...
बेदाण्याला उठाव असल्याने दर स्थिरसांगली ः सणांमुळे बेदाण्याला चांगली मागणी आहे....
खरिपात तेलबिया उत्पादनात घट होणारपुणे : खरीप हंगाम २०२१-२२ मध्ये तेलबिया...