agriculture news in marathi, tur payment delay, amaravati, maharashtra | Agrowon

अमरावतीत तुर चुकाऱ्यासाठी हवे ८७ कोटी; मिळाले ३८ कोटी
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 25 एप्रिल 2019

 अमरावती : चुकाऱ्यांसाठी यंदा शेतकऱ्यांना त्रास होणार नाही, असे शासनाने जाहीर केले असले तरी चुकाऱ्यांसाठीचा शासकीय जाच या हंगामातही कायम आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १० हजार ६६८ शेतकऱ्यांपैकी निम्म्याच शेतकऱ्यांना चुकारे मिळाले आहेत. उर्वरित शेतकऱ्यांना चुकाऱ्यांसाठी चकरा माराव्या लागत आहेत. 

 अमरावती : चुकाऱ्यांसाठी यंदा शेतकऱ्यांना त्रास होणार नाही, असे शासनाने जाहीर केले असले तरी चुकाऱ्यांसाठीचा शासकीय जाच या हंगामातही कायम आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १० हजार ६६८ शेतकऱ्यांपैकी निम्म्याच शेतकऱ्यांना चुकारे मिळाले आहेत. उर्वरित शेतकऱ्यांना चुकाऱ्यांसाठी चकरा माराव्या लागत आहेत. 

नाफेडने विदर्भ व जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून तूर खरेदी केली. ‘विदर्भ’च्या पाच व जिल्हा मार्केटिंगच्या सात अशा एकूण १२ केंद्रांवरून खरेदीस सुरवात झाली. या माध्यमातून एक लाख ५३ हजार ५७० क्‍विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. या खरेदीपोटी ८७ कोटी १५ लाख रुपयांचे चुकारे अदा करायचे आहेत. ११ हजार ४२८ शेतकऱ्यांची ही तूर आहे. यापैकी विदर्भ मार्केटिंग फेडरेशनने २४७० शेतकऱ्यांचे १८ कोटी ६३ लाख व जिल्हा मार्केटिंगने २४८९ शेतकऱ्यांचे १९ लाख ७२ हजार रुपये असे एकूण ४९५९ शेतकऱ्यांचे ३८ कोटी ३५ लाख रुपये बॅंकेत जमा केले आहेत. 

या हंगामात नाफेडने गतवर्षीचा अनुभव लक्षात घेत चुकाऱ्यांची पद्धत सोपी केल्याचा दावा केला आहे. यंदा चुकारे खरेदी झाल्यानंतर पंधरा दिवसांत दिले जातील, असा त्यांचा दावा होता. मात्र शेतकऱ्यांना क्‍लेशदायक अनुभवाचा सामना करण्याची वेळ आली आहे. खरेदी करताना शेतकऱ्यांकडून बॅंक खात्याची सत्यप्रत, आधार लिंक व सातबारा उतारा मागविण्यात आला होता. नाफेडकडून चुकाऱ्याची रक्‍कम बॅंकांमध्ये जमा करण्यात आल्याचे सांगण्यात येते; तरी शेतकऱ्यांच्या खात्यात रक्‍कम जमा झाली नाही हे वास्तव आहे. पैसे मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी विर्दी व जिल्हा मार्केटिंगच्या कार्यालयात चकरा मारणे सुरू केले आहे. तेथे त्यांचे अधिकाऱ्यांसोबत खटके उडू लागल्याने अधिकारी त्रस्त झाले आहेत.

इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात `सन्मान`ची पाच लाख...सोलापूर : जिल्ह्यात ‘आठ अ’नुसार असलेल्या ११...
सोलापुरात यंदाही खरीप कोरडाचसोलापूर : खरीप हंगाम सुरू होऊन दीड महिना उलटला....
नाशिक बाजार समितीची सुरक्षा वाढविण्याचा...नाशिक : नाशिक कृषी बाजार समितीत वाढलेल्या...
नाशिक जिल्ह्यात पावसाअभावी फळबागांवर...नाशिक : कळवण, देवळा, मालेगाव, नांदगाव,...
परभणी जिल्ह्यात १३ लघू तलावांतील...परभणी : यंदा पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी...
टंचाईस्थितीची वस्तुनिष्ठ माहिती सादर...हिंगोली : टंचाईस्थितीत शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत...
जालना जिल्ह्यात दुधाचे पैसे दोन...जालना : जिल्ह्यातील जामवाडी, गणेशपूर, नळणी, येवता...
औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली...औरंगाबाद  : मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर...
सांगली जिल्ह्यात पावसाची उघडीपसांगली ः जिल्ह्यात जून आणि जुलैमध्ये झालेल्या...
कंडारी पाणी योजनेतील गैरव्यवहारप्रकरणी...जळगाव ः कंडारी (ता. भुसावळ) येथील ग्राम...
शेततळ्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित...नागपूर ः विकासाच्या संकल्पनांमध्ये रस्ते, नाले व...
सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागातील शेती...सातारा : जिल्ह्यात पश्चिमेकडे दमदार पाऊस, तर...
कापसाच्या हमीभावात ५०० रुपयांनी वाढ...अमरावती   ः राज्याची कमी असलेली कापूस...
दमदार पावसाअभावी पुणे जिल्ह्यातील पूर्व...पुणे  ः जिल्ह्याच्या पूर्व भागातील शिरूर,...
नगर जिल्ह्यात ऐन पावसाळ्यातही...नगर  ः दुष्काळाने होरपळ झालेल्या नगर...
पावसाअभावी धुळे, जळगाव जिल्ह्यांत...जळगाव  ः खानदेशात सुरवातीला पावसाने जोरदार...
नागपूर विभागात पावसाअभावी पिकांची वाढ...नागपूर  ः निम्मा जुलै महिना संपत आला असतानाच...
सांगलीत हळद प्रतिक्विंटल ६००० ते ८९००...सांगली ः येथील बाजार समितीत हळदीची आवक कमी झाली...
भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत...मुंबई  : भाजपचे ज्येष्ठ नेते, मंत्री...
सुधारित सोयाबीन आंतरपीक पद्धती राज्यामध्ये सोयाबीनच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ...